मूल होत नाही म्हणून महिला मांत्रिकाकडे गेली, नंतर पेढा देत अंगारही लावला, तीन लाखांना गंडा घालत... नऊ महिने सुरू होता खेळ

Pune Crime : एका महिलेनं मूल होत नाही म्हणून एका मांत्रिकाची मदत घेतली. मांत्रिकाने महिलेला पेढा खायला देऊन अंगारा लावला. त्यानंतर तब्बल 3 लाख 15 हजार रुपये उकळल्याचे धक्कादायक प्रकरण आता समोर आलं आहे.

ADVERTISEMENT

pune crime
pune crime
social share
google news

बातम्या हायलाइट

point

21 व्या शतकात अंद्धश्रद्धेला लोक बळी पडतात

point

मांत्रिकाने त्या एका कारणासाठी लाखो रुपये उकळले

point

नेमक प्रकरण काय?

Pune Crime : आपण 21 व्या शतकात राहत असलो तरीही आजही काही लोक अंद्धश्रद्धेला बळी पडलेले दिसून येत आहेत. मूल होत नसल्याने अनेकजण डॉक्टरांची मदत घेतात आणि पुढील उपचार सुरुच ठेवतात. पण, एका महिलेनं मूल होत नाही म्हणून एका मांत्रिकाची मदत घेतली. मांत्रिकाने महिलेला पेढा खायला देऊन अंगारा लावला. त्यानंतर तब्बल 3 लाख 15 हजार रुपये उकळल्याचे धक्कादायक प्रकरण आता समोर आलं आहे. या प्रकरणामुळे पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. हे प्रकरण 28 जुलै ते नऊ सप्टेंबर 2025 या काळात घडला आहे.

हे ही वाचा : Maharashtra Weather: कोकणात पावसाचा जोर, पाहा कसं असेल संपूर्ण राज्यातील वातावरण

ही घटना पुण्यातील सहकारनगर परिसरातील आहे. या प्रकरणात पोलिसांनी मांत्रिक गिरीश बलभमी सुरवसे (वय 36) राहणार भोसली यांच्यावर भारतीय संहिता आणि महाराष्ट्र नरबळी-जादूटोणा प्रतिबंधक अधिनियमाखाली गुन्हा दाखल केला आहे. या एकूण घडलेल्या घटनेची तक्रार बालाजीनगर परिसरातील रहिवासी महिलेनं तक्रार दाखल केली.

मांत्रिकाला अटक

दरम्यान आता आरोपी सुरवसे या मांत्रिकाला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात मांत्रिकासोबत एक साथीदाराचाही समावेश असून त्याचा तपास सुरू आहे. हा एकूण प्रकार जुलै ते सप्टेंबर 2025 या महिन्यांदरम्यान घडला.

हे ही वाचा : Personal Finance: SIP सुरू केली म्हणून निवांत होऊ नका, छोट्या चुका लावतील वाट!

3 लाख 15 हजार रुपये उकळले 

महिला मूल होत नसल्याने पूर्णपणे हतबल झाली होती. तिच मानसिकता लक्षात घेत आरोपी मांत्रिकाने पीडितेला विश्वासात घेत मंदिरात नेले. त्यानंतर तिच्यावर मंत्रोच्चार केले आणि अघोरी विधीही केली होती. त्यानंतर अंगाऱ्याचा पेढा खाण्यास दिला होता. नंतर एकूण 3 लाख 15 हजार रुपये उकळल्याचं प्रकरण आता उघडकीस आलं आहे. त्यानंतर सहकारनगर पोलिसांनी मांत्रिकावर गुन्हा दाखल केला.

 

हे वाचलं का?

    follow whatsapp