Maharashtra Weather: कोकणात पावसाचा जोर, पाहा कसं असेल संपूर्ण राज्यातील वातावरण
Maharashtra Weather Today: भारतीय हवामान विभागाच्या (IMD) अंदाजानुसार, 11 सप्टेंबर रोजी राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

भारतीय हवामान विभाग

11 सप्टेंबर रोजी राज्यात पावसाचा जोर

काय सांगतं हवामान विभाग?
Maharashtra Weather : भारतीय हवामान विभागाच्या (IMD) अंदाजानुसार, 11 सप्टेंबर रोजी राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. विशेषत: विदर्भ आणि मराठवाडा या भागांत विजांच्या गडगडाटासह वादळी वारे आणि मुसळधार पावसाचा अंदाज जारी केला आहे. कोकण किनारपट्टी आणि मुंबई परिसरात पावसाची तीव्रता तुलनेने कमी राहील, परंतु वातावरण ढगाळ आणि दमट राहण्याची हवामान विभागाने शक्यता वर्तवली आहे.
हे ही वाचा : Uddhav-Raj Thackeray: 'तू परत ये.. मला भेटायला!', उद्धव ठाकरेंना 'शिवतीर्था'वर पुन्हा कोणी आणि का बोलावलेलं? अखेर आलं समोर!
कोकण विभाग :
राज्यातील कोकणभागात ठाणे, पालघर यासारख्या भागात हलका ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. तर काही ठिकणी ढगाळ वातावरणामुळे आर्द्रता वाढण्याची शक्यता आहे, परंतु अतिवृष्टीचा धोका कमी असल्याचं हवामान विभागाने शक्यता जारी केली आहे.
मध्य महाराष्ट्र :
मध्य महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर यासारख्या भागात मध्यम ते जोरदार पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी मेघगर्जनेसह हलक्या वादळी वाऱ्यांचा हवामान विभागाचा अंदाज आहे.
विदर्भ आणि मराठवाडा विभाग :
राज्यातील विदर्भ आणि मराठवाड्यात 11 सप्टेंबर रोजी हवामान विभागाने मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. तर काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता जारी केली आहे. जोरदार वादळी वाऱ्यासह स्थानिक भागात पूरजन्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. नागरिकांना सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
हे ही वाचा : बाईचा नाद लय बेकार! नर्तिकेच्या नादी लागला उपसरपंच, जमीन जुमला अन् सोनं नाणं सारंच लुटलं, अखेर स्वत:च्याच डोक्यावर बंदुक...
उत्तर महाराष्ट्र :
उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव, धुळे येथे हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे, परंतु काही भागात वातावरण ढगाळ राहील, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.