OYO हॉटेल आणि वासनेचा खेळ, पती-पत्नीने अवघ्या नागपूरला केलं हैराण, कांड समजला तर तुम्हीही...
नागपूरमधील एका OYO हॉटेलमध्ये चक्क पती-पत्नी मिळून सेक्स रॅकेट चालवत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी दोघांना अटकही करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT

नागपूर: नागपूरमध्ये गजबजलेल्या रस्त्यांवर एक हॉटेल होतं जिथे सुरू होता वासनेचा बाजार. ती दुनिया जिथे सुरू होता एक गोरखधंदा. तिथल्या चमकणाऱ्या खोल्या, एसीची थंड हवा आणि बाहेरून येणारे आवाज यामुळे सगळं सामान्य दिसत होतं, पण आतलं दृश्य मात्र भयंकर होतं.
ऑपरेशन शक्तीची गुप्त तयारी
नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेचा सामाजिक सुरक्षा विभाग गेल्या अनेक दिवसांपासून एका गुप्त माहितीवर लक्ष ठेवून होता. शहरातील यशोधरानगर परिसरातील OYO हॉटेलच्या खोलीत येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांच्या हालचाली सतत संशयास्पद दिसत होत्या. ऑपरेशन 'शक्ती' अंतर्गत या हॉटेलवर अचानक छापा टाकण्याचा निर्णय घेण्यात आला.
धक्कादायक खुलासा
11 सप्टेंबर रोजी दुपारी पोलीस पथक हॉटेलमध्ये प्रवेश करताच, तिथले दृश्य पाहून सर्वांना धक्का बसला. बाहेरून हे हॉटेल राहण्यासाठी एक सामान्य ठिकाण होते, पण आत सुरू असलेला व्यवसाय हा हादरवून टाकणारा होता. त्या खोलीत पोलिसांनी दोन तरुणींना वेश्या व्यवसायाच्या दलदलीतून वाचवलेच नाही तर हे संपूर्ण रॅकेटच उद्ध्वस्त केलं. पण या संपूर्ण प्रकरणातील धक्कादायक बाब म्हणजे हे संपूर्ण रॅकेट एखादी टोळी नव्हे तर एक जोडपं म्हणजेच पती-पत्नी मिळून चालवत होते.
हे ही वाचा>> विधवा महिलेसोबत 4 वर्ष केले शारीरिक संबंध..प्रेग्नंट झाल्यावर दुसऱ्या तरुणीसोबत केलं लग्न, बलात्कार प्रकरणात आरोपी गजाआड!
पैशाचा लोभ
पोलिसांच्या तपासात असे दिसून आले की, मनिषपाल सिंग सुदर्शन राजपूत आणि त्यांची पत्नी सिमरनी मनिषपाल राजपूत हे या रॅकेटचे सूत्रधार होते. दोघेही मिळून गरीब आणि असहाय्य मुलींना पैशाचे आमिष दाखवून त्यांना या व्यवसायात ढकलत असत.
दलालाची भूमिका आणि त्याचे पलायन
या रॅकेटमध्ये एक दलालही सामील होता, जो संपूर्ण शहरातील ज्या तरुणींची आर्थिक परिस्थिती वाईट होती आणि ज्यांना पैशाची नितांत गरज होती अशा तरुणींचा शोध घेत असे. पोलिसांच्या छाप्यादरम्यान, हा दलाल घटनास्थळावरून पळून गेला. त्याच्या शोधात आता पथक सतत छापे टाकत आहे.
हॉटेलच्या खोलीतून पुरावे जप्त
पोलिसांना खोलीतून 1.5 लाख रुपये रोख सापडले, ज्यामुळे या बेकायदेशीर व्यवसायाची पुष्टी झाली. याशिवाय अनेक मोबाइल फोन आणि कागदपत्रेही जप्त करण्यात आली आहेत. हे रॅकेट केवळ नागपूरपुरते मर्यादित नसून आसपासच्या जिल्ह्यांमध्येही पसरले असल्याचा संशय आहे.
हे ही वाचा>> भाचीने मामीचे 'ते' गुपित उघड पाडले, पुतण्याचं प्रेम टिकवण्यासाठी नेमकं काय केलं?
मुलींची दुर्दशा
सुटका करण्यात आलेल्या दोन्ही मुलींची स्थिती पाहून पोलीस अधिकारीही त्रस्त झाले. चौकशीदरम्यान त्यांनी सांगितले की, त्यांना कामाचे आमिष दाखवून नंतर या व्यवसायात भाग पाडण्यात आले. त्यांच्या डोळ्यात भीती आणि निराशा स्पष्टपणे दिसत होती. सध्या त्यांना पुनर्वसन केंद्रात पाठवण्यात आले आहे, जेणेकरून त्या सामान्य जीवनात परत येऊ शकतील.
नागपूर शहर पोलिस पथकाच्या डीसीपी मेहक स्वामी यांनी सांगितले की, OYO हॉटेलच्या नावाखाली सेक्स रॅकेट सुरू असल्याची गुप्त माहिती आम्हाला मिळाली होती. आम्ही छापा टाकून पती-पत्नीला अटक केली आहे. घटनास्थळावरून दीड लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणात फरार दलालाचा शोध सुरू आहे आणि हॉटेल व्यवस्थापनाची भूमिका देखील तपासली जात आहे.
पती-पत्नीला अटक
पोलिसांनी मनिषपाल सिंह सुदर्शन राजपूत आणि त्यांची पत्नी सिमरानी मनिषपाल राजपूत यांना घटनास्थळावरून अटक केली. दोघांचीही चौकशी सुरू आहे. त्यांचा संबंध एखाद्या मोठ्या टोळीशी असू शकतो, असे मानले जात आहे. तपास जसजसा पुढे जाईल तसतसे आणखी मोठी नावे समोर येऊ शकतात.