मारहाणीच्या व्हायरल व्हीडिओवर अजय देवगणने सोडलं मौन..
काही दिवसांपूर्वी दोन गटांमध्ये जोरदार मारामारी झाली होती. दिल्लीत घडलेल्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. दरम्यान या व्हिडीयोमध्ये ज्या व्यक्तीला मारहाण करण्यात येतेय ती व्यक्ती बॉलिवूड अभिनेता अजय देवगण असल्याचा दावा केला जात होता. यानंतर अजय देवगणचं नाव चर्चेत आलं होतं. मात्र यावर अखेर अभिनेता अजय देवगणने स्वतः प्रतिक्रिया दिली आहे. Some […]
ADVERTISEMENT
काही दिवसांपूर्वी दोन गटांमध्ये जोरदार मारामारी झाली होती. दिल्लीत घडलेल्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. दरम्यान या व्हिडीयोमध्ये ज्या व्यक्तीला मारहाण करण्यात येतेय ती व्यक्ती बॉलिवूड अभिनेता अजय देवगण असल्याचा दावा केला जात होता. यानंतर अजय देवगणचं नाव चर्चेत आलं होतं. मात्र यावर अखेर अभिनेता अजय देवगणने स्वतः प्रतिक्रिया दिली आहे.
ADVERTISEMENT
Some ‘doppelgänger’ of mine seems to have got into trouble.
I’ve been getting concerned calls. Just clarifying, I’ve not traveled anywhere. All reports regarding me being in any brawl are baseless. Happy Holi— Ajay Devgn (@ajaydevgn) March 29, 2021
अजयने यासंदर्भात ट्विट केलं आहे. अजय त्याच्या ट्विटमध्ये म्हणतो, “माझ्या सारखी दिसणारी व्यक्ती अडचणीत सापडल्याचं दिसतंय. दरम्यान मला याबाबत सतत कॉल येत आहेत. पण माहितीसाठी सांगतो मी कुठेही प्रवास केलेला नाही. त्याचप्रमाणे माझ्यासंदर्भात दिले जाणारे अहवाल सर्व निराधार आहेत. आणि सर्वांना होळीच्या खूप शुभेच्छा.”
Not really sure if this is #ajaydevgan or not but #Kisanektamorcha agitation seems to be spreading up. Social media floating with this video that drunk @ajaydevgn got beaten up?? #RakeshTikait pic.twitter.com/Fv8j0kG5fv
— lalit kumar (@lalitkumartweet) March 28, 2021
दरम्यान यापूर्वी या व्हिडीयोबाबत अजयच्या प्रवक्त्यांनीही स्पष्टीकरण दिलं होतं. अजयच्या प्रवक्त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, “‘तान्हाजी’ सिनेमाच्या प्रमोशनसाठी अजय देवगण दिल्लीत गेला होता. त्यानंतर तो दिल्लीमध्ये गेला नाही. त्यामुळे मिडीयाद्वारे देण्यात आलेल्या भांडणाच्या बातम्या पूर्णपणे निराधार आणि चुकीच्या आहेत.”
हे वाचलं का?
“गेल्या 14 महिन्यांपासून अजय देवगणने दिल्लीत पाय ठेवलेला नाही. तो गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईमध्ये ‘मैदान’, ‘मायडे’ तसंच ‘गंगुबाई काठियावाडी’ सिनेमाचं शूटींग करतोय. सर्व माध्यमांना विनंती आहे की, काहीही दाखवण्यापूर्वी एकदा क्रॉस चेक करून घ्या.”, असंही अजयच्या प्रवक्त्याचं म्हटलं होतं.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT