अमृता पवार म्हणतेय तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

झी मराठीवर लवकरच एक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं असं या मालिकेचं नाव असून त्यात अभिनेत्री अमृता पवार प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. ३० ऑगस्टपासून रात्री ९ वाजता तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं ही मालिका प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज होणार आहे. नुकतंच या मालिकेचा प्रोमो रिलीज झाला आणि पाहता पाहता या प्रोमोला प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरलं. या प्रोमोमध्ये अमृता नवऱ्या मुलाकडील नातेवाईकांची नाव लक्षात ठेवताना दिसतेय. या मालिकेचं कथानक नक्की काय असणार आहे आणि अमृतासोबत या मालिकेत अजून कोण कलाकार दिसणार आहेत ही सर्व माहिती अजून गुलदस्त्यात आहे, पण या प्रोमोने मालिकेबद्दलची प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला नेली आहे.या मालिकेबद्दल बोलताना अभिनेत्री अमृता पवार म्हणाली, “तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं या मालिकेचं कथानक आजच्या काळातील मुला-मुलींसाठी खूपच रिलेटेबल आहे. मी साकारत असलेली यातील भूमिका देखील खूप आपलीशी वाटणारी आहे. मी माझ्या वयाची आणि साधारण खऱ्या आयुष्यात मी जशी आहे तशी भूमिका पहिल्यांदा छोट्या पडद्यावर साकारते त्यामुळे मला खूप जास्त आनंद होतोय. प्रेक्षक या मालिकेवर खूप प्रेम करतील त्यांना ही ती खूप आवडेल याची मला खात्री आहे.”

ADVERTISEMENT

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT