तौक्ते चक्रीवादळाचा फटका बसला सलमान खानला, भाईजानच्या या आगामी सिनेमाच्या सेटचं झालं वादळामुळे नुकसान
नुकत्याच झालेल्या तौक्ते चक्रीवादळाचा मुंबईला मोठ्या प्रमाणात तडाखा बसला. यात सिनेइंडस्ट्रीचं देखील नुकसान झालं आहे. सध्या महाराष्ट्रात लॉकडाऊन सुरू असल्याने महाराष्ट्रात चित्रिकरण करण्यास परवानगी नाही. मात्र लॉकडाऊनआधी बॉलिवूडच्या काही सिनेमांचं चित्रिकरण मुंबईतील चित्रनगरीत सुरू होतं. अनेक बिग बजेट सिनेमांचे सेटसही आजही चित्रनगरीत आहेत. दोन दिवसांपूर्वी आलेल्या तौक्ते चक्रीवादळामुळे सलमान खानच्या आगामी टायगर ३ सिनेमाच्या सेटचं […]
ADVERTISEMENT
नुकत्याच झालेल्या तौक्ते चक्रीवादळाचा मुंबईला मोठ्या प्रमाणात तडाखा बसला. यात सिनेइंडस्ट्रीचं देखील नुकसान झालं आहे. सध्या महाराष्ट्रात लॉकडाऊन सुरू असल्याने महाराष्ट्रात चित्रिकरण करण्यास परवानगी नाही. मात्र लॉकडाऊनआधी बॉलिवूडच्या काही सिनेमांचं चित्रिकरण मुंबईतील चित्रनगरीत सुरू होतं. अनेक बिग बजेट सिनेमांचे सेटसही आजही चित्रनगरीत आहेत. दोन दिवसांपूर्वी आलेल्या तौक्ते चक्रीवादळामुळे सलमान खानच्या आगामी टायगर ३ सिनेमाच्या सेटचं नुकसान झालं आहे. हा सेट गोरेगावच्या चित्रनगरीत उभारण्यात आला होता. त्या सेटचं नुकसान झाल्याने या सिनेमाचं शूटींग परवानगी मिळाल्यानंतरही लगेच सुरू होण्याची शक्यता खूपच कमी आहे.
ADVERTISEMENT
टायगर ३ सिनेमात दुबईमधला बाजार शूट करण्यासाठी गोरेगावमधल्या एसआरपीएफ ग्राउंडवर भलामोठा सेट उभारण्यात आला होता. तौक्ते चक्रीवादळात हा भलामोठा सेट उडून गेला. सुदैवाने सध्या मालिका आणि सिनेमाच्या शूटिंगना परवानगी नसल्यामुळे चक्रीवादळाच्यावेळी कोणतंही शूटींग इथे सूरू नव्हतं. त्यामुळे यावेळी कोणीही सेटवर नसल्यामुळे यात कोणालाही दुखापत झालेली नाही.मात्र टायगर ३ सिनेमाच्या निर्मात्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.
हे वाचलं का?
ज्यावेळी महाराष्ट्रात चक्रीवादळाची घोषणा करण्यात आली होती, त्यानंतर काही फिल्ममेकर्सनी आपल्या चित्रपटाच्या सेट्सना कवर कऱण्यासाठी काही मजूर त्या ठिकाणी पाठवले होते. चक्रीवादळामुळे फिल्म सिटीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. निदान सध्याच्या सुरू असलेल्या लॉकडाउनमुळे शूटिंग बंद होतं. त्यामुळे केवळ मालमत्तेचं नुकसान झालंय. कुणाला इजा झाली नाही. संजय लीला भन्साळी त्यांची आगामी फिल्म ‘गंगूबाई काठियावाड़ी’च्या सेटला तर वाचवू शकले. गेल्या पावसाळ्यात त्यांनी त्यांच्या सेटला कवर केलं होतं.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT