विवेक ओबेरॉयनंतर ‘हा’ अभिनेता साकारणार पंतप्रधान मोदींची भूमिका

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यार अजून एका सिनेमा येणार आहे. यापूर्वीही पंतप्रधान मोदी यांच्या जीवनावर आधारित सिनेमे तयार झाले आहेत. यापूर्वी विवेक ओबेरॉय तसंच महेश ठाकूर यांनी मोदींची भूमिका साकारली आहेत. तर आता आगामी पंतप्रधान मोदींच्या सिनेमात गजेंद्र चौहान मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

ADVERTISEMENT

‘एक और नरेन’ असं या आगामी सिनेमाचं नाव असणार आहे. गजेंद्र चौहान यांनी महाभारत या मालिकेत युधिष्ठीर याची भूमिका पार पाडली होती. तर आता गजेंद्र चौहान पंतप्रधान मोदी म्हणून प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. चौहान यांनी स्वतः सोशल मीडियाच्या माध्यमातून यासंदर्भात माहिती दिली आहे.

गजेंद्र चौहान पंतप्रधान मोदी यांची भूमिका साकारण्यासाठी फार उत्सुक आहेत. गजेंद्र चौहान यांनी ट्विटरद्वारे एक और नरेन सिनेमातील एक संवाद शेअर केलाय. ते म्हणतात, “मी त्यांचे विचार तसंच त्यांच्या बोलण्याची शैली समजून घेईन. त्यातप्रमाणे पंतप्रधान मोदींची व्यक्तिरेखा साकारत असल्याचा मला गर्व आहे.”

हे वाचलं का?

बंगाली दिग्दर्शक मिलन भौमिक या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहेत. दरम्यान एक और नरेन हा सिनेमा प्रेक्षकांना दोन भागांमध्ये पहायला मिळेल. यामधील एका भागात स्वामी विवेकानंद यांचं काम दाखवण्यात येणार आहे. तर सिनेमाच्या दुसऱ्या भागात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कशा पद्धतीने स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचं अनुकरण केलं हे दाखवण्यात येणार आहे. या सिनेमाच्या शूटींगला सुरुवात होणार असून गुजरात आणि कोलकातामध्ये ही शूटींग होईल. तर येत्या 17 सप्टेंबरला सिनेमा रिलीज होण्याची शक्यता आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT