राज कुंद्राच्या अटकेमुळे शिल्पा शेट्टी सुपर डान्सरच्या सेटवर गेलीच नाही.करिश्मा कपूर घेऊ शकते शिल्पा शेट्टीची जागा
सोमवारी रात्री अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योगपती राज कुंद्रा याला अश्लील फिल्म तयार करणं आणि त्या काही APP वर रिलिज करणं या प्रकरणात पोलिसांनी अटक केली. आणि यामुळे अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्याही अडचणीत आता वाढ झाली आहे. मंगळवारी शिल्पा शेट्टी जज असलेल्या सुपर डान्सरचं या रियालीटी शोचं ही शूटींग होतं. मात्र पतीच्या अटकेमुळे शिल्पा शेट्टी […]
ADVERTISEMENT
सोमवारी रात्री अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योगपती राज कुंद्रा याला अश्लील फिल्म तयार करणं आणि त्या काही APP वर रिलिज करणं या प्रकरणात पोलिसांनी अटक केली. आणि यामुळे अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्याही अडचणीत आता वाढ झाली आहे. मंगळवारी शिल्पा शेट्टी जज असलेल्या सुपर डान्सरचं या रियालीटी शोचं ही शूटींग होतं. मात्र पतीच्या अटकेमुळे शिल्पा शेट्टी शूटींगला आज अनुपस्थित होती. मुंबईतील फिल्मसिटीमध्ये सुपर डान्सर या रियालीटी शोचं शूटींग होतं. पण पतीच्या अटकेमुळे शिल्पा शेट्टी आज शूटला फिरकलीच नाही.
ADVERTISEMENT
राज कुंद्रा हा अश्लील फिल्म तयार करण्याच्या प्रकरणात अडकला असल्याने ,शिल्पा शेट्टी यापुढे सुपर डान्सरच्या जजपदी कायम राहिल की नाही याबद्दल थोडी साशंकता आहे. अजूनही सोनी टीव्ही आणि शो च्या निर्मांत्यानी याबाबत अजूनही कोणतीही अॉफिशियल घोषणा केलेली नाही… मात्र राज कुंद्राला अटक झाल्याने शिल्पा शेट्टी सुपर डान्सरच्या जजपदी कायम राहील याची शक्यता कमी वाटते.. सूत्रांनुसार शिल्पा शेट्टीची जागा अभिनेत्री करिश्मा कपूर घेऊ शकते असा अंदाज आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT