RSS : ‘कधी जॉईन करणार भाजप?’ फडणवीस-गडकरी भेटीनंतर प्राजक्ता माळी चर्चेत

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

prajakta mali actress join bjp speculation on social media rss dasahara program devendra fadnavis nitin gadkari
prajakta mali actress join bjp speculation on social media rss dasahara program devendra fadnavis nitin gadkari
social share
google news

मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta mali) सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. सोशल मीडियावर व्हिडिओ आणि फोटो पोस्ट करून ती चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. आता अशीच एक प्राजक्ता माळीची पोस्ट समोर आली आहे. या पोस्टने सोशल मीडियावर खळबळ माजवली आहे. कारण या पोस्टमुळे प्राजक्ता माळीने भाजपमध्ये प्रवेश केल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे खरचं प्राजक्ताने भाजपात एन्ट्री केली आहे का? हे जाणून घेऊयात. (prajakta mali actress join bjp speculation on social media rss dasahara program devendra fadnavis nitin gadkari)

ADVERTISEMENT

देशभरात मंगळवारी 24 ऑक्टोबरला दसरा साजरा करण्यात आला. तर महाराष्ट्रात नागपूरच्या रेशीमबाग मैदानात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी आणि शस्त्रपुजनाचा उत्सव पार पडला. या कार्यक्रमाला सरसंघचालक मोहन भागवत, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थिती होते. यासह या कार्यक्रमाला प्रसिद्ध गायक व संगीतकार शंकर महादेवन यांनी हजेरी लावली होती.

हे ही वाचा : Gadchiroli : 20 दिवस, 5 हत्या! सुनेच्या खुनी खेळाने हादरला महाराष्ट्र, वाचा Inside Story

या कार्यक्रमाला हजेरी लावल्यानंतर प्राजक्ताने या संबंधित एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. या व्हिडिओच्या कॅप्शनला तिने लिहले की, आज आयूष्यात पहिल्यांदा ”राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा- विजयादशमी उत्सव” अनुभवता आला. तो देखील केंद्रिय मंत्री नितीन गडकरी आणि उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याी समवेत. त्यामुळे समस्त संघ परिवाराचे मनापासून आभार, असा आशयाची पोस्ट प्राजक्ताने इन्स्टाग्रामवर केली होती.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

प्राजक्ताची ही पोस्ट आणि व्हिडिओ पाहून अनेकांच्या भूवय्या उंचावल्या होत्या. तसेच अनेकांनी तिच्या या पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पाडला आहे. प्राजक्ताच्या या पोस्टवर एका युझरने लिहले की, हे संकेत आहेत, लवकरच तुझी भाजपात एन्ट्री होणार. दुसऱ्या एका युझरने लिहले की, तिकीट फिक्स आहे. तर तिसऱ्या एका युझरने लिहले की, हार्दिक अभिनंदन, आता तुम्ही खूप लोकांच्या नावडत्या होणार, पण काही हरकत नाही, आगे बढ चलो, अशा अनेक प्रतिक्रिया तिच्या पोस्टवर येऊ लागल्या आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Prajaktta Mali (@prajakta_official)

ADVERTISEMENT

दरम्यान प्राजक्ताने देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यांची वैयक्तिक भेट देखील घेतली.या भेटीदरम्यानचे फोटो तिने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. देवेंद्रजींच्या मतदारसंघातील गरबा कार्यक्रमासाठी नागपूरला गेले होते आणि त्यांच्याकडे एक कामही होतं. विजयादशमी उत्सवात भेटीसाठी थोडा वेळ हवा असे मी म्हणताच, त्यांनी त्यांच्या व्यग्र वेळापत्रकातून वेळ काढून दिला. “काहीही मदत लागली तर सांगा,आम्ही तुम्हाला मदत करण्यासाठी येथे आहोत, आम्हाला तुमचे काम आवडते”.. इति – देवेंद्रजी. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री असं म्हणतात तेव्हा खरच खूप आधार वाटतो, त्यांच्या या अनमोल वाक्यांसाठी त्यांचे आभार मानायले शब्द अपूरे पडतायेत, असे प्राजक्ता माळी तिच्या पोस्टमध्ये म्हणाली आहे.

ADVERTISEMENT

हे ही वाचा : भावाच्या कृत्याने अलिबाग हादरलं! सख्ख्या बहिणींना ‘सूप’मधून दिला विषाचा ‘घोट’

दरम्यान प्राजक्ता माळी नितीन गडकरी यांची देखील भेट घेतली आहे. या भेटीबद्दल ती पोस्टमध्ये लिहते की, नवमीला नितीनजींच्या निवासस्थानी ‘ग्रेट भेट’ झाली. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा, माझे आगामी projects, श्री श्री रविशंकरजी, प्राजक्तराज, समृद्धी महामार्ग’ .. अशा अनेक विषयांवर अर्ध्या तासाहून अधिक वेळ गप्पा झाल्या. ‘आम्ही तुमची हास्यजत्रा रोज बघतो’ हे ऐकून मला विशेष आनंद झाला.. आयूष्यभर स्मरणात राहील अशा या भेटीसाठी वेळ दिल्याबद्दल नितीनजींचे मनापासून आभार, असे प्राजक्ता माळी तिच्या पोस्टमध्ये लिहते.

 

 

 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT