नागराज मंजुळे आणि आकाश ठोसरची जोडी पुन्हा जमणार, सैराटनंतर दिसणार या सिनेमात

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

सैराटच्या विक्रमी यशानंतर नागराज मंजुळे आणि अभिनेता आकाश ठोसर ही जोडी पुन्हा एकदा रसिकांसमोर एक नवीन मराठी सिनेमा घेऊन येत आहे. दसऱ्याच्या शुभमुहर्तावर आज या नवीन मराठी सिनेमाचा पहिला टीझर लॉंच करण्यात आला. महत्वाचं म्हणजे आकाश ठोसर सोबत नागराज मंजुळेही या सिनेमात प्रमुख भूमिकेत आहे. नागराज मंजुळेच्या आटपाट प्रॉडक्शन आणि झी स्टुडिओजची निर्मिती असलेला घर बंदूक बिरयानी हा नवीन मराठी सिनेमा २०२२ म्हणजेच पुढच्या वर्षी रसिकांच्या भेटीला येणार आहे.

ADVERTISEMENT

या सिनेमाचं अजून एक आकर्षण म्हणजे अभिनेते सयाजी शिंदेची ही या सिनेमात प्रमुख भूमिका आहे.. सयाजी शिंदे, नागराज मंजुळे आणि आकाश ठोसर अशी तगडी स्टारकास्ट असलेला घर बंदूक बिरयानी हा सिनेमा २०२२ ला प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. सैराट,नाळ,फँड्री नंतर नागराज मंंजुळेचा नवीन मराठी सिनेमा म्हणून घर बंदूक बिरयानी या सिनेमाबद्दल रसिकांना नक्कीच जास्त उत्सुकता आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT