Animal : रणबीर कपूर-रश्मिकाच्या चित्रपटातील ‘ते’ 5 सीन्स का काढले?

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Why did the Censor Board remove those 5 scenes from Ranbir Kapoor-Rashmika's movie Animal
Why did the Censor Board remove those 5 scenes from Ranbir Kapoor-Rashmika's movie Animal
social share
google news

Animal Movie Scene : रणबीर कपूर स्टारर ‘अ‍ॅनिमल’ (Animal) चित्रपट येत्या 1 डिसेंबर 2023 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाला सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनने (CBFC) A सर्टिफिकेट देऊन पास केले. कारण यात हिंसक वृत्ती दाखवण्यात आली आहे. हा चित्रपट 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी नाही आहे. पण आता ए सर्टिफिकेट देऊनही सेन्सॉर बोर्डाने चित्रपटात आणखी पाच बदल केल्याचे समोर आले आहे. यापैकी एक म्हणजे रणबीर कपूर आणि रश्मिका मंदानाचे क्लोज-अप किसिंग सीन आहेत. (Why did the Censor Board remove those 5 scenes from Ranbir Kapoor-Rashmika’s movie Animal)

ADVERTISEMENT

सेन्सॉर बोर्डाने ‘अ‍ॅनिमल’मध्ये बदल करण्याची मागणी करणाऱ्या दस्तऐवजाची प्रिंट इंटरनेटवर सध्या व्हायरल होत आहे. सेन्सॉर बोर्डाने चित्रपटातून सर्व अपशब्द काढून टाकल्याचे समोर आले आहे.

वाचा: Datta Dalvi : ठाकरेंच्या नेत्याला घरातून अटक, शिंदेंवर काय केली होती टीका?

CBFC ने ‘अ‍ॅनिमल’ मध्ये नेमके कोणते बदल केले?

  • चित्रपटात 1 तास 31 मिनिटे 19 सेकंदावर येणाऱ्या सीनमधून ‘ब्लॅक’ शब्द काढून टाकला.
  • 1 तास 56 मिनिटे 20 सेकंदात येणाऱ्या सीनमध्ये ‘कॉस्ट्यूम’ हा शब्द ‘वस्त्र’ या शब्दाने बदलला . तसेच ‘कभी नही’ आणि ‘क्या बोल रहे हो आप’ या डायलॉग्समध्येही बदल केले.
  • 2 तास 13 मिनिटे 51 सेकंदांनी येणारा ‘नाटक’ हा शब्द म्यूट केला. सबटायटलमध्ये ‘You Change Pads four times a month’ ला बदललं.
  • 2 तास 28 मिनिटे 37 सेकंदात येणाऱ्या सीनमध्ये विजय आणि झोया यांच्यातील इंटिमेट सीनमध्ये बदल करण्यात आले. क्लोज अप शॉट हटवला गेला.
  • चित्रपटात जिथे शिवीगाळ किंवा असभ्य शब्द वापरले गेले आहेत तिथे ते बदलले गेले. अगदी सबटायटल्सच्या माध्यमातून.

Why did the Censor Board remove those 5 scenes from Ranbir Kapoor-Rashmika's movie Animal

हे वाचलं का?

वाचा: Pune Crime : समलैंगिक संबंध अन् भररस्त्यात कोयत्याने हत्या; पुण्यात तरूणासोबत काय घडलं?

सेन्सॉर बोर्डाने ‘अ‍ॅनिमल’मध्ये केलेल्या बदलांची प्रिंट सोशल मीडियावर व्हायरल!

‘अ‍ॅनिमल’ला अ‍ॅडल्ट (ए) प्रमाणपत्र देऊनही, चित्रपटाच्या सीन्समध्ये बदल केल्याने संदीप रेड्डी वंगा यांना थोडं खटकलं. कारण त्यांनी आपल्या करिअरमध्ये वादग्रस्त आणि बोल्ड चित्रपट केले आहेत. मात्र, या प्रकरणी त्यांनी सेन्सॉर बोर्डाशी संघर्ष केला नाही. कारण यामुळे त्यांचा चित्रपट अडकला असता. संदीपला त्याच्या चित्रपटाच्या दर्जाबद्दल खात्री आहे. सर्व बदल करूनही चित्रपटाचे आकर्षण कमी होणार नाही हे त्यांना माहीत आहे. त्यामुळेच त्यांनी सेन्सॉर बोर्डाशी संघर्ष न करण्याचा निर्णय घेतला.

वाचा: Nagpur Crime : IAS, IPS होण्याचं होतं स्वप्न, पण…; अधिकाऱ्याच्या आत्महत्येने खळबळ

प्रदर्शनापूर्वीच ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटाची 11 कोटींची कमाई

‘अ‍ॅनिमल’ 1 डिसेंबर 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे. तो 201 मिनिटे म्हणजेच 3 तास 21 मिनिटांचा चित्रपट आहे. पण व्हायरल सेन्सॉर सर्टिफिकेटनुसार, ‘Animal’ चा रन टाइम 203 मिनिटे 29 सेकंद म्हणजेच 3 तास 23 मिनिटे 29 सेकंद आहे. चित्रपटाचे अॅडव्हान्स बुकिंग जोरात सुरू आहे. प्रदर्शनाला दोन दिवस शिल्लक असतानाही या चित्रपटाची साडेतीन लाखांहून अधिक तिकिटे विकली गेली आहेत. यासह चित्रपटाने पहिला शो सुरू होण्यापूर्वीच जवळपास 11 कोटींची कमाई केली आहे.

ADVERTISEMENT

या चित्रपटात अनिल कपूर, बॉबी देओल, रश्मिका मंदाना, तृप्ती डिमरी, शक्ती कपूर, प्रेम चोप्रा आणि सुरेश ओबेरॉय हे कलाकार रणबीर कपूरसोबत दिसणार आहेत.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT