‘हलवा’ ही भारताची नाही, तर अरबांची डिश, भारतीयांच्या मनावर राज्य! काय आहे कहाणी?

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Halwa is not an Indian dish but an Arab dish ruling the hearts of Indians What is the history of it
Halwa is not an Indian dish but an Arab dish ruling the hearts of Indians What is the history of it
social share
google news

History of Halwa : आपल्या देशात स्वीट डिशमध्ये हलवा (Halwa), मग तो गाजर असो, दुधी असो किंवा मूग डाळीचा असो अतिशय चवीने खाल्ला जातो. पाहुणे आले की रव्याचा हलवा, हिवाळ्यात गाजराचा हलवा आणि इतर अनेक प्रकारचा हलवा बनवला जातो. आज आपण याच हलव्याच्या स्वीट डिशबद्दल जाणून घेणार आहोत जी भारतात शतकानुशतके बनवली जाते. पण ही रेसिपी आपली नसून याचं कनेक्शन अरबी देशाशी जोडलेलं आहे. मग हलवा भारतीय परंपरेचा इतका महत्त्वाचा भाग कसा बनला? जाणून घेऊयात. (Halwa is not an Indian dish but an Arab dish ruling the hearts of Indians What is the history of it)

ADVERTISEMENT

हलवा हा अरबी शब्दापासून बनलेला

असं म्हटलं जाते की, ‘हलवा’ हा शब्द अरबी शब्द ‘हुलाव’ पासून आला आहे, ज्याचा अर्थ गोड आहे आणि असे मानले जाते की ते 1840 ते 1850 दरम्यान ते इंग्रजी भाषेत आले. 20 व्या शतकातील लेखक आणि इतिहासकार अब्दुल हलीम शरार यांच्या ‘गुजिष्टा लखनौ’ या पुस्तकानुसार, हलव्याचा उगम अरबी भूमीतून झाला आणि तो पर्शियामार्गे भारतात आला.

वाचा : Maratha Reservation : “ज्यांच्या नोंदी आहेत, त्यांनाच OBC आरक्षण”, CM शिंदे स्पष्टच बोलले

ही मूळ मध्य पूर्वातील मिठाई खजुराची पेस्ट आणि दुधापासून बनवली होती. कॉलीन टेलर सेन तिच्या ‘फेस्ट्स अँड फास्ट्स’ या पुस्तकात लिहितात की, दिल्ली सल्तनतच्या काळात 13व्या शतकाच्या सुरूवातीपासून ते 16व्या शतकाच्या मध्यापर्यंत हलवा भारतात आला. इतर काही पौराणिक कथांनुसार, हलवा रेसिपीची मुळे ऑट्टोमन साम्राज्यात आहेत. साम्राज्याचा दहावा आणि प्रदीर्घ काळ राज्य करणारा सुलतान सुलेमान यांना मिठाईची इतकी आवड होती की त्यांनी फक्त गोड पदार्थांसाठी एक वेगळे स्वयंपाकघर बांधले, हलवा त्यापैकी एक होता.

हे वाचलं का?

13 व्या शतकातील पुस्तकात हलव्याचा उल्लेख

खाद्य इतिहासकारांच्या मते, हलव्याची पहिली ज्ञात पाककृती 13व्या शतकातील अरबी मजकुरात दिसते, ‘किताब अल-ताबीख’ (पाककृतींचे पुस्तक), जे मुहम्मद इब्न अल-हसन इब्न अल-करिम यांनी लिहिलेले आहे. त्यात हलव्याच्या आठ वेगवेगळ्या प्रकारांचा आणि त्यांच्या पाककृतींचा उल्लेख आहे. याशिवाय, अरब प्रभाव असलेली दोन प्राचीन भारतीय शहरे ही कराची आणि कोझिकोड ही किनारपट्टीची शहरे होती आणि त्यामुळे हलवा हा या शहरांमधील खाद्य परंपरांचा अविभाज्य भाग आहे.

वाचा : Pune Crime : प्रेम, संशय आणि हत्या, IT इंजिनियर गर्लफ्रेंडला लॉजवरच घातल्या गोळ्या

आज देशभरात हलव्याचे असंख्य प्रकार उपलब्ध आहेत. पुण्याचा ‘हिरव्या मिरचीचा हलवा’, पश्चिम बंगालचा ‘छोलार दाल हलवा’, उत्तर प्रदेश आणि बिहारचा ‘आंदा हलवा’, कर्नाटकचा ‘काशी हलवा’, केरळचा ‘करुठा हलवा’ या हलव्याचे काही प्रकार आहेत जे भारतात आढळतात. देशभरात आवडलेला ‘गाजर चा हलवा’ जागतिक स्तरावरही पोहोचला आहे. गाजर हे मूळचे अफगाणिस्तानचे होते आणि डचमार्गे भारतात पोहोचले. ते पंजाबमध्ये उगवले जाऊ लागले आणि नंतर हलव्यासाठी वापरले गेले.

ADVERTISEMENT

वाचा : Maratha Reservation : जरांगे-पाटलांची पहिली मोठी घोषणा, ‘नोंदींच्या आधारे एक तरी…’

हलव्याने भारतीयांची जिंकले मन

हलव्याचा उगम जरी अरबस्तानात झाला असला तरी यापेक्षा जास्त गोड दुसरा कोणताही भारतीय पदार्थ असू शकत नाही. कारण त्याचा प्रभाव भारतात इतका आहे की मिठाई बनवणाऱ्यांना ‘हलवाई’ या नावाने आजही ओळखले जाते आणि ते कायम राहीले. हलव्याने भारतात येऊन सर्व गोड प्रेमींची मने जिंकली. त्यामुळेच दरवर्षी अर्थसंकल्पासारख्या देशातील महत्त्वाच्या कार्यक्रमापूर्वी हलवा समारंभ आयोजित केला जातो.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT