15 August : भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिली सकाळ कशी होती?

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Freedom Movement Of India : 14 ऑगस्ट 1947 च्या संध्याकाळी, जवाहरलाल नेहरू (Jawaharlal Nehru) काही तासांनंतर दिल्लीतील त्यांच्या 17 यॉर्क रोडवरील घरी देशातील जनतेला जे भाषण देणार होते ते तयार करण्यात व्यस्त होते. अचानक त्यांचा फोन वाजतो. यावर लाहोरहून ट्रंक कॉल येतो. फोनवर दुसरीकडून बोलणाऱ्या व्यक्तीचा आवाज ऐकूनही नेहरू बराच वेळ फोन धरून राहिले. नेहरूंच्या चेहऱ्यावरील हावभाव पूर्णपणे बदलले होते. फोनचा रिसिव्हर ठेवल्यावर त्यांनी दोन्ही हात चेहऱ्यावर ठेवले. हात काढल्यावर त्यांचे डोळे भरून आले. (How was the first morning after India’s independence On 15 August 1947)

ADVERTISEMENT

मुलगी इंदिरा यांनी विचारल्यावर ते म्हणतात, ‘लाहोरमधील नवीन प्रशासनाने हिंदू आणि शीख भागांचा पाणीपुरवठा खंडित केला आहे. लहान मुलांनाही तहान लागली आहे. ज्या काही महिला आणि लहान मुले पाण्यासाठी बाहेर पडत आहेत, त्यांची हत्या होत आहे. नरसंहार झाला आहे.’

PM Modi Speech : लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी भारतीयांना काय दिला संदेश?

हे वाचलं का?

नेहरू कंठ दाटून म्हणाले, ‘आज मी देशाला कसे संबोधित करू शकेन? जेव्हा मला कळते की माझ्या हृदयाचा तुकडा, माझा लाहोर जळत आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी मी आनंदी आहे हे कसे दाखवू?’

यानंतर इंदिराजींनी बराच वेळ वडिलांचे सांत्वन करण्याचा प्रयत्न केला. काही वेळानंतर नेहरूंनी स्वतःला सांभाळलं आणि बरोबर 11.55 मिनिटांनी संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये भाषणाला सुरुवात केली ज्याला जग ‘ट्रिस्ट विथ डेस्टिनी’ या नावाने ओळखते.

ADVERTISEMENT

Nagpur Crime : … म्हणून त्याने सना खानशी केलं होतं लग्न, हत्येची Inside Story

यावेळी नेहरू म्हणाले, ‘अनेक वर्षांपूर्वी आम्ही नियतीला वचन दिले होते. आता ते वचन पूर्ण करण्याची वेळ आली आहे. मध्यरात्री जेव्हा संपूर्ण जग झोपलेले आहे, तेव्हा भारत स्वातंत्र्याचा श्वास घेत आहे.’ यादरम्यान जवाहरलाल नेहरूंच्या मनात लाहोर-पाकिस्तानही होते. ते पुढे म्हणाले, ‘राजकीय सीमांमुळे आपल्यापासून दुरावलेल्या आणि आज आपल्याला मिळालेले स्वातंत्र्य साजरे करू न शकलेल्या आपल्या बंधू-भगिनींचीही या निमित्ताने आठवण येते. ते लोकही आपलेच आहेत आणि काहीही झाले तरी आपलेच राहतील.’

ADVERTISEMENT

भारताला स्वातंत्र्य मिळाल्याच्या घोषणेनंतर संपूर्ण संसदेत जल्लोषाचे वातावरण

रात्री 12 वाजता शंख वाजू लागले. नेहरूंसह संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू होते. संपूर्ण संसद अचानक महात्मा गांधी की जय, भारत माता की जय, जवाहरलाल नेहरू की जयच्या घोषणांनी दुमदुमली. पुढच्या संपूर्ण दिवशी देशात स्वातंत्र्याचा जल्लोष होणार होता.

30 हजारांची व्यवस्था आणि लाखोंची गर्दी, सर्वकाही कसं झालं मॅनेज?

15 ऑगस्ट 1947 म्हणजे आजची तारीख. डॉमिनिक लॅपियर आणि लॅरी कॉलिन्स यांनी त्यांच्या ‘फ्रीडम अॅट मिडनाईट’ या पुस्तकात या दिवसाच्या स्थितीचे वर्णन केले आहे.

इंडिया गेटवर होणाऱ्या स्वातंत्र्याच्या कार्यक्रमाची रणनीती लॉर्ड माउंटबॅटन यांच्या सल्लागारांनी बनवली होती. ब्रिटीश राजवटीत झालेल्या कार्यक्रमांच्या अनुभवावरून त्यांनी अंदाज केला होता की 15 ऑगस्टच्या कार्यक्रमासाठी इंडिया गेटवर जास्तीत जास्त 30 हजार लोक जमतील. पण, या अंदाजपत्रकात काही हजारांची नाही तर 5 लाखांहूनही जास्त गर्दी झाली. यापूर्वी भारताच्या राजधानीत एवढी मोठी गर्दी कधीच दिसली नव्हती.

आजूबाजूला पसरलेल्या प्रचंड जनसमुदायाने ध्वजाच्या शेजारी बांधलेल्या छोट्या मंचाला सगळीकडून वेढलं होतं. गर्दी रोखण्यासाठी लावलेले दंडुके, बँडसाठी बांधलेला मंच, व्हीआयपींची बसण्याची व्यवस्था, रस्त्यांवर बांधलेल्या दोऱ्या, सर्व काही लोकांनी धुडकावलं. सगळे अडथळे तोडून ते पुढे सरकत होते.

PM Modi Speech : ‘मी पुन्हा येईन’, नरेंद्र मोदींनी फुंकले निवडणुकीचे रणशिंग

पामेला माउंटबॅटन लोकांवर चढून व्यासपीठापर्यंत पोहोचली!

संध्याकाळचे 4 वाजले होते. माउंटबॅटन यांची मुलगी पामेला वडिलांच्या स्टाफसोबत इंडिया गेटवर पोहोचली. समोरचे दृश्य यापूर्वी कधीच पाहिले नव्हते. स्टेजभोवती तीळ ठेवायला जागा नव्हती. स्टेजच्या 100 यार्ड आधी लोक जमिनीवर बसले होते. पामेलाला असे वाटले की जणू एक भक्कम भिंत आहे जी ती फोडू शकत नाही. त्यामुळे स्टेजवर बसलेल्या जवाहरलाल नेहरूंनी पामेलाकडे पाहिले. नेहरूंनी पामेलाला मोठ्याने हाक मारली आणि म्हणाले, ‘लोकांवर चढून या.’ पामेला म्हणाली, ‘मी हाय हिल्स घालतेत, लोकांना ते टोचतील.’ नेहरू पुन्हा म्हणाले, ‘चप्पल काढा.’

लॅरी कॉलिन्सच्या म्हणण्यानुसार, अशा ऐतिहासिक प्रसंगी असे असभ्य वर्तन करण्याचे पामेला स्वप्नातही पाहू शकत नाही. तिने दीर्घ श्वास घेतला आणि पुन्हा येण्यास नकार दिला. पण नेहरू पुन्हा म्हणाले, ‘लहान मुलांसारखं बोलू नका, चप्पल काढा आणि लोकांवर पाय ठेवून या. कोणी काहीही बोलणार नाही.’

यानंतर भारताच्या शेवटच्या व्हाईसरॉयच्या मुलीने दीर्घ श्वास घेतला. चप्पल काढून, हातात धरली, स्टेजवर बसलेल्या लोकांवर पाय ठेवत ती पुढे आली. लोक आनंदाने हसत होते आणि पामेलाला पुढे जाण्यास मदत करत होते.

पामेलाने तिच्या ‘इंडिया रिमेम्बर्ड’ या पुस्तकात त्या दिवसाबद्दल काय लिहिलं?

पामेला माऊंटबॅटन स्टेजवर पोहोचल्यावर तिने जे दृश्य पाहिले ते कधीच न विसरता येईल असे होते. स्टेजभोवती जमलेल्या लोकांच्या गर्दीत अशा अनेक महिला होत्या. स्वातंत्र्याच्या आनंदात त्या आपल्या तान्ह्या मुलांना हवेत झेलत होत्या. अशा प्रकारे शेकडो महिला असं करत होत्या.

दरम्यान, काही अंतरावर, लॉर्ड माउंटबॅटनच्या गाडीभोवती फिरत असलेल्या अंगरक्षकांच्या चमकदार पगड्या दिसल्या. जमावाने माउंटबॅटन आणि त्यांची पत्नी अॅडमिनाला येताना पाहिले तेव्हा ते लाटेसारखे पुढे सरकू लागले. आज वादाला जागा नव्हती. कुठेही द्वेषाचे चिन्ह नव्हते. इंग्रजांच्या त्रासाला वर्षे उलटून गेली होती आज, सर्व एका इंग्रजालाच डोक्यावर घ्यायला तयार होते. परिस्थिती अशी होती की माउंटबॅटनच्या अंगरक्षकांना कोचचा दरवाजाही उघडता येत नव्हता. यावेळी स्टेजपर्यंत जाऊन झेंडा फडकवणं हे माउंटबॅटनला शक्य नाही समजलं होतं.

यावेळी माउंटबॅटन तिथून नेहरूंना ओरडून म्हणाले, ‘फक्त ध्वजारोहण करा. बँड वाजण्याची वाट पाहू नका, बँडचे सदस्य गर्दीत कुठेतरी हरवले आहेत. आणि सलाम करणारे सैनिक त्यांच्या जागेवरून हलू शकणार नाहीत.

स्टेजवर उपस्थित नेहरूंना माउंटबॅटनचा आवाज ऐकू आला आणि त्यांनी इशारा करताच हिरवा, पांढरा आणि भगवा रंगाचा तिरंगा पोस्टवरून जाऊ लागला. तोफांमधून गोळे सेडण्यात आले. लाखो लोकांनी वेढलेल्या माउंटबॅटनने आपल्या गाडीवर उभे राहून तिरंग्याला सलामी दिली. असे म्हणतात की तिरंगा फडकवताच पश्चिमेकडे आकाशात एक मोठा ‘इंद्र धनुष’ निर्माण झाला. यावेळी माउंटबॅटनने बोट वर करून आकाशाकडे बोट दाखवले.

 

डॉमिनिक लॅपियर लिहितात, ‘ग्रह आणि नक्षत्रांच्या स्थितीवरून माणसाचे भवितव्य ठरवले जाते, असे मानणाऱ्या भारतीयांसाठी इंद्रधनुष्य दिसणे हे दैवी लक्षण होते. सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे इंद्रधनुष्याचे हिरवे, पिवळे आणि निळे रंग देखील इंद्रधनुष्याच्या मध्यभागी फडकत असलेल्या तिरंग्याच्या रंगांसारखे दिसत होते.’

15 ऑगस्ट 1947 रोजी महात्मा गांधी कुठे होते?

‘नॉट सो इनफाइनाइट’ विश्वाच्या या छोट्याशा भागात, जेव्हा इतिहास खूप मोठं वळण घेत होतं. या आनंदात एक व्यक्ती गायब होती. महात्मा गांधी त्यांचे नामकर्ता गुरुदेव टागोरांच्या धरतीवर जळलेल्या घराच्या पहिल्या मजल्यावर झोपले होते.

गांधी 5 दिवसांपूर्वी कलकत्त्यात पोहोचले होते. पोहोचताच त्यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली, गांधी परत जा. गांधी आपली काठी घेऊन रस्त्यावर उतरले. लोकांना भेटले, नेत्यांना भेटले. चेतावणी दिली.

‘आजपासून तुम्हाला काट्यांचा मुकुट घालायचा आहे. सत्य आणि अहिंसेच्या प्रचारासाठी सतत प्रयत्न करत राहा. नम्र पणे वागा. धीर धरा. ब्रिटीश राजवटीने तुम्हाला खडतर परीक्षेला सामोरे जावे लागले आहे यात शंका नाही, पण भविष्यात ही परीक्षा पुन्हा पुन्हा होत राहील. सत्तेपासून सावध रहा. सत्ता भ्रष्ट करते. स्वतःला त्याच्या चकाकीत अडकू देऊ नका. भारतातील खेड्यापाड्यात राहणाऱ्या गरिबांची सेवा करण्यासाठी तुम्हाला ही शक्ती मिळाली आहे हे लक्षात ठेवा. देव तुम्हाला मदत करेल.

यानंतर गांधींनी बेलियाघाट रोडवरील प्रार्थना सभेला संबोधित केले. त्या दिवशी शंख फुंकत प्रार्थना सभेत सुमारे ३० हजार लोक सहभागी झाले होते, असे सांगितले जाते. कलकत्त्याच्या जनतेचे अभिनंदन करताना ते म्हणाले, ‘शांतता राखल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार, मला आशा आहे की पंजाबला तुमच्या अद्भुत उदाहरणातून काही प्रेरणा मिळेल…आणि पाकिस्तानींनाही…देव त्यांना बुद्धी देवो.’

 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT