Weight loss: चपाती-भाजी खाऊन 35 किलो घटवलं वजन, ‘ही’ महिला कशी झाली सडपातळ?

मुंबई तक

ADVERTISEMENT

loss diet workout nutrition supreet kaur weight loss fat fat to fit transformation journey
loss diet workout nutrition supreet kaur weight loss fat fat to fit transformation journey
social share
google news

Weight loss: वाढते वजन कमी  करणे आणि कमी झालेल्या वजनावर नियंत्रण ठेवणेही तितकेच महत्वाचे असते. मात्र ज्या लोकांचे वजन वेगाने कमी होते किंवा जी लोकं वजन हळूहळू वजन कमी करतात, त्यांचे वजन मात्र दीर्घ काळासाठी स्थिर राहते. या क्षेत्रातील तज्ञांचे असं मत आहे की, दर आठवड्याला 0.5 ते 1 किलो वजन कमी करणे अपेक्षित असते. मात्र आज आम्ही तुम्हाला एका आईने (Mother) कमी केलेल्या वजनाची गोष्ट सांगणार आहोत.

ADVERTISEMENT

गरोदरपणात वाढते वजन

ज्या मातेचे वजन गरोदरपणानंतर प्रचंड वाढले होते, त्याच मातेने आता सुमारे अडीच वर्षांत 35 किलो वजन कमी केले आहे. हे वजन कमी करण्यासाठी त्यांना बराच काळ गेला आहे. त्यामुळे दीर्घ काळ घेऊन वजन कमी करणाऱ्या या महिला कोण आहेत, त्यांनी वजन कशा प्रकारे कमी केले आहे, तेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. तर मग या महिला कोण आहेत आणि त्यांनी वजन कोणत्या आणि कशा प्रकारे कमी आहे ते जाणून घेऊया.

हे ही वाचा >> ठाकरेंच्या ठाणे दौऱ्याआधीच मोठा राडा! बॅनर फाडले, नोटीसा बजावल्या, जमावबंदीचे आदेश… काय घडलं?

सवयी खाण्यापिण्याची

याबाबत सुप्रीत कौर यांनी सांगितले की, मी पंजाबमधील रहिवासी आहे. त्यामुळे पंजाबच्या माणसांच्या खाण्यापिण्याच्या सवयी साऱ्या जगाला माहिती आहेत. कोणत्याही प्रकारच्या कॅलरी पाहून आम्ही काही खाल्ले नाही. कारण खाण्याची मी प्रचंड शौकीन होते. त्यामुळे मला जे खायचे होते ते मी खात होते. लग्नाच्या आधी इतके खा, माझे वजन 60 किलोच राहिले पाहिजे असं होतं. मात्र ज्या जेव्हा माझं लग्न झालं आणि त्यानंतर गर्भवती राहिले तेव्हा मात्र माझं वजन झपाट्याने वाढू लागले. मुलाला निरोगी ठेवण्यासाठी, तूप, ड्रायफ्रुट्स आणि वजनाबाबत कोणते नियम पाळले जाऊ लागले नाही. त्यामुळे माझे वजन हळू हळू वाढू लागले, आणि ते वाढून सुमारे 92 किलो झाले.

हे वाचलं का?

भविष्यात अनेक समस्या

सुप्रीत सांगतात की, माझ्या मुलाचा जन्म झाला तेव्हा सीझेरियन करावे लागले होते. त्यावेळीही माझं वजन प्रचंड होते, आणि गर्भवती होते, त्यावेळी वजनामुळे माझी मलाच मी ओळखू येत नव्हते. त्यामुळे मला हळूहळू कळू लागले की, मला वजन कमी करणे आवश्यक आहे. नाही तर भविष्यात मला अनेक समस्या येऊ शकतात.

बाळासाठी आहार

त्यावेळी बाळासाठी माझा आहार मी कमी होऊ दिला नव्हता. त्यामुळे मी माझे अन्न कमी करू शकले नाही. गरोदरपणानंतर महिलांचे वजन वाढणे ही सामान्य गोष्ट आहे. परंतु माझे 25-30 किलो वजन वाढले होते.
मात्र त्यानंतर बाळ जसं जसं मोठ होतं गेलं तसतसे मी वजन कमी करण्याचा विचार करु लागले. वजन कमी करण्यासाठी इंटरनेटवरुन धावणे कसे गरजेचे आहे याबद्दलही माहिती घेतली. त्यानंतर तो तसा प्रयोगही मी केला. त्यामुळे मी माझे वजन 6-7 किलोने कमी केले.

ADVERTISEMENT

अडीच वर्षात घटवले वजन

वजन कमी करण्यासाठी मी एका फेसबुकवरील फिटनेस ग्रुपमध्येही सामील झाले. त्यानंतरमी फिटनेससाठीचे मूलभूत प्रमाणपत्रही मिळवले गेले. ते प्रमाणपत्र मिळाल्यानंतर मला वजन कमी करणारी व्यक्ती म्हणून अगदी मला बारकाईने ओळखले जाऊ लागले. त्यानंतरच्या काळात मी अडीच वर्षाच्या काळात सुमारे 35 किलो वजन गठवले. त्यामुळे आज माझे वजन सुमारे 57 किलो झाले आहे.

ADVERTISEMENT

शारीरिक हालचाली वाढवल्या

आहार घेण्याबाबत सुप्रीत सांगतात की, वजन कमी करण्यासाठी मी जड आहार घेत नाही. फक्त माझ्या शरीराला गरजे आहे तेवढाच आहात माझ्याकडून घेतला जातो. आरोग्याची काळजी म्हणून 200-300 कॅलरी कमी घेत होते. त्यानंतर, मी कॅलरी कमी करण्याऐवजी माझी शारीरिक हालचाली वाढवल्या. त्यानंतर माझ्या आहारात घरगुती खाण्याच्या गोष्टी वाढवल्या. याकाळात आणि प्रवासात अंडी, चीज, स्प्राउट्स, डाळी, रोटी, भाज्या घेत होते.

घरातील आहार चुकवला नाही

सुप्रीत आपल्या दिवसाच्या आहाराची माहिती सांगताना म्हणतात की, न्याहारीसाठी ब्रेड-ऑलिट घ्यायची. तर दुपारी जेवणाच्या वेळी डाळ, रोटी खात होते. तर स्नॅक्समध्ये चहा, भाजलेले हरभरा आणि फळंही खाते होते. तर रात्रीच्या जेवणाच्या वेळी डाळ, तांदूळ आणि चिकन असायचे.

हे ही वाचा >> Ashish Shelar : ‘सलीम-जावेद मोठे असतील, पण मराठी कलाकार…’, भाजपाचा राज ठाकरेंना टोला

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT