रात्र पाळीवरून पती आला घरी, बायको दीरासोबत रंगात आली, पतीनं विचारला जाब अन् भावानेच डोक्यात...
chhatrapati sambhajinagar crime : पती नाईट शिफ्टला गेला असताना घरी पत्नी दीरासोबत झोपली होती. त्याचदरम्यान, पतीची नाईट शिफ्ट अचानकपणे रद्द झाल्याने पती घरी आला असता, पतीने आपल्या पत्नीला सख्ख्या भावासोबत एकाच खोलीत रंगेहाथ पकडले.

बातम्या हायलाइट

छत्रपती संभाजीनगरात खळबळ

सख्ख्या भावाचा सख्या वहिनीवर डोळा

खलबत्त्याची मुसळ डोक्यात घातली

नेमकं काय घडलं?
Chhatrapati Sambhajinagar Crime : छत्रपती संभाजीनगरातील वाळूज एमआयडी परिसरातून धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. पती नाईट शिफ्टला गेला असताना घरी पत्नी दीरासोबत झोपली होती. त्याचदरम्यान, पतीची नाईट शिफ्ट अचानकपणे रद्द झाल्याने पती घरी आला असता, पतीने आपल्या पत्नीला सख्ख्या भावासोबत एकाच खोलीत रंगेहाथ पकडले. पतीने विचारणा केली असता, सख्ख्या भावानेच आपल्या भावाच्या डोक्यात खलबत्याची मुसळ घातली. त्यानंतर तो आपल्या वहिनीला घेऊन पसार झाला. भावाच्या तक्रारीवरून पोलीस ठाण्यात संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे ही वाचा : मुंबई हादरली! नवऱ्याला बायकोसोबत एकांत मिळेना, मुलगी यायची सतत नात्याच्याआड, नंतर गळा दाबून मृतदेह फेकला समुद्रात
नेमकं काय घडलं?
दरम्यान, सुनील द्विवेदी आणि पत्नी स्मिता द्विवेदी अशी मारहाण करून पसार झालेल्यांची नावे आता समोर आली आहेत. तर पीडित गंभीर जखमी झालेल्या पतीचं नाव पुष्पेंद्र द्विवेदी असे आहे. संबंधित प्रकरणात त्याने पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानं फिर्यादीत म्हटलं की, मी पत्नी मुलांसह विटावा परिसरातील रहिवासी आहे. कंपनीत नोकरी करत कुटुंबाचा मी उदरनिर्वाह भागवतो.
'जर तू पुन्हा घरी परतलास तर तुला...' भावाकडून सख्या भावाला धमकी
गेल्या काही दिवसांपासून पुष्पेंद्रंची पत्नी स्मिता द्विवेदी आणि सुनील द्विवेदी यांचं अनैतिक संबंध असल्याचा संशय पुष्पेंद्रला होता. त्यानंतर 18 ऑगस्ट रोजी रात्री 10 वाजता पुष्पेंद्र हा रात्र पाळी करून घरी आला होता. तेव्हा त्याने आपली मुलं झोपलेली पाहिली होती. तर तिथेच पत्नीला सख्ख्या भावासोबत पाहिलं. दोघांनाही पुष्पेंद्रने विचारपूस केली असता, पत्नी व भावाने फिर्यादीला मारहाण करण्यास सुरुवात केली. तेव्हा सख्ख्या भावाने पुष्पेंद्रला बेदम मारहाण केली. खलबत्त्याची मुसळ डोक्यात घालत धमकी दिली की, जर तू पुन्हा घरी परतलास तर तुला जीवेच मारून टाकेन.
हे ही वाचा : आज 21 ऑगस्ट लक्ष्मी नारायण योग झाला तयार, 'या' राशीतील लोकांचं भाग्य चमकणार, काय सांगतं राशीभविष्य
त्यानंतर सुशील द्विवेदीन भावच्याच पत्नीला मोटारसायकलवर बसवले आणि तिथून पळ काढला. संबंधित प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.