Birth Tourism : महिला परदेशात जाऊन मुलांना का देतायत जन्म?

रोहिणी ठोंबरे

जेव्हा मुलाच्या नागरिकत्वाचा प्रश्न येतो तेव्हा संपूर्ण जगात फक्त दोनच नियम सापडतात. एक म्हणजे, राइट ऑफ सॉइल आणि दुसरा म्हणजे राइट ऑफ ब्लड. राइट ऑफ सॉइलचा अर्थ असा आहे की जिथे मूल जन्माला येतं, ते आपोआपच त्या ठिकाणचं नागरिक बनतं. आणि राइट ऑफ ब्लडचा अर्थ असा आहे की, ज्याठिकाणी मुलाचे आई-वडील नागरिक आहेत, तेथून मूलही तिथलं नागरिक मानलं जातं. असे अनेक देश आहेत, जे राइट ऑफ सॉइलच्या अधिकारावर अधिक लक्ष केंद्रित करतात.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

Birth Tourism Rules : जेव्हा मुलाच्या नागरिकत्वाचा प्रश्न येतो तेव्हा संपूर्ण जगात फक्त दोनच नियम सापडतात. एक म्हणजे, राइट ऑफ सॉइल आणि दुसरा म्हणजे राइट ऑफ ब्लड. राइट ऑफ सॉइलचा अर्थ असा आहे की जिथे मूल जन्माला येतं, ते आपोआपच त्या ठिकाणचं नागरिक बनतं. आणि राइट ऑफ ब्लडचा अर्थ असा आहे की, ज्याठिकाणी मुलाचे आई-वडील नागरिक आहेत, तेथून मूलही तिथलं नागरिक मानलं जातं. असे अनेक देश आहेत, जे राइट ऑफ सॉइलच्या अधिकारावर अधिक लक्ष केंद्रित करतात. आपल्या मातीत जन्मलेल्या प्रत्येक मुलाला ते त्यांच्या जागेचे नागरिकत्व देतात. यालाच बर्थ टुरिझम म्हणतात. (What is Birth Tourism Pregnant Women Cross the Border For other Country citizenship)

कोणत्या देशांमध्ये जन्माच्या आधारावरून नागरिकत्व आहे?

30 पेक्षा जास्त देश जन्माच्या आधारावरून नागरिकत्वाला मान्यता देतात. यामध्ये अमेरिका आघाडीवर आहे. 19व्या शतकातच त्यांनी राइट ऑफ सॉइलच्या हक्काबद्दल बोलून इथे जन्मलेल्या मुलांना आपले नागरिक म्हणायला सुरुवात केली. याशिवाय कॅनडा, अर्जेंटिना, बोलिव्हिया, इक्वेडोर, फिजी, ग्वाटेमाला, क्युबा आणि व्हेनेझुएला यांसारख्या अनेक देशांनी हे अधिकार दिले. अनेक देशांमध्ये, नागरिकत्वासाठी मुलांचे दोन्ही पालक तिथले असणे आवश्यक आहे.

‘बायको आत्महत्या करेल सांगून शिंदेंकडून घेतलं मंत्रिपद’, भरत गोगावलेंनी टाकला बॉम्ब

अँकर बेबी कोणत्या देशातून येते?

अनेक गरीब देश किंवा ज्या ठिकाणी सतत युद्ध चालू असते, तिथले लोक स्वतःसाठी अशी जागा शोधू लागले, जिथे राइट ऑफ सॉइलचा नियम आहे. त्यांचा शोध अमेरिकेत संपला. हा देश जन्माच्या आधारावर नागरिकत्वही देतो आणि तो सर्वात शक्तिशाली देशही आहे. कमकुवत देशांतून पळून गेलेले पालक इथे येऊन मुलांना जन्म देऊ लागले.

या मुलांना अँकर बेबी म्हणतात. मुलांमार्फत पालकही अमेरिकेत राहू लागले. अमेरिकन सरकार कडक होईपर्यंत ही प्रक्रिया चालू होती. यानंतर संख्येत मोठी घट झाली, पण ही प्रक्रिया थांबली नाही.

हे वाचलं का?

    follow whatsapp