लाइव्ह

MP Assembly Election Results 2023: मध्य प्रदेशमध्ये जनतेने काँग्रेसला थेट नाकारलं, भाजपच्या हाती पुन्हा सत्तेच्या चाव्या

रोहित गोळे

2018 मध्ये असा होता निकाल

मध्य प्रदेशातील 2018 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने 114 जागा जिंकल्या होत्या, भाजपने 109, बसपा 2 आणि अपक्ष आणि इतरांनी 5 जागा जिंकल्या होत्या.. त्यानंतर बसपा आणि अपक्षांच्या पाठिंब्याने काँग्रेसने सरकार स्थापन केले होते. तथापि, 2020 मध्ये ज्योतिरादित्य सिंधिया यांनी काँग्रेस सोडली, त्यामुळे काँग्रेसचे कमलनाथ सरकार पडले आणि शिवराज सिंह चौहान पुन्हा मुख्यमंत्री झाले.

ADVERTISEMENT

madhya pradesh assembly elections 2023 live updates live election results 2023 wining candidates list
madhya pradesh assembly elections 2023 live updates live election results 2023 wining candidates list
social share
google news

लाइव्हब्लॉग बंद

  • 12:20 PM • 03 Dec 2023

    मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसला जनतेने नाकारलं, भाजपकडे सत्ता

    मध्य प्रदेशमध्ये पुन्हा एकदा भाजपची सत्ता.. काँग्रेसला जनतेनं नाकारलं.. सध्या भाजप 157 जागांवर आघाडीवर काँग्रेसला फक्त 70 जागांवर आघाडी
  • 11:06 AM • 03 Dec 2023

    मध्य प्रदेशमध्ये भाजपची लाट

    मध्य प्रदेशमध्ये भाजपला पुन्हा एकदा मोठं यश मिळत असल्याचं पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे काँग्रेसची धूळधाण होत असल्याचं पाहायला मिळत आहे. सध्या मध्य प्रदेशात भाजप 157 जागांवर आघाडीवर आहे. तर काँग्रेस 70 जागांवर आघाडीवर.
  • 09:54 AM • 03 Dec 2023

    मध्य प्रदेशमध्ये भाजपची मजबूत स्थिती

    मध्य प्रदेशमध्ये भाजप सध्या मजबूत स्थितीत असल्याचं पाहायला मिळतं आहे. कारण सध्या भाजप 130 जागांवर आघाडीवर आहे. तर काँग्रेस 98 जागांवर आघाडीवर आहे.
  • 09:47 AM • 03 Dec 2023

    चंबळमध्ये भाजप आणि काँग्रेस समसमान जागांवर आघाडीवर

    मध्य प्रदेशातील चंबळमध्ये भाजप आणि काँग्रेस हे 17-17 अशा समसमान जागांवर आघाडीवर आहे.
  • ADVERTISEMENT

  • 09:38 AM • 03 Dec 2023

    माजी मुख्यमंत्री कमलनाथ पिछाडीवर

    मध्य प्रदेश एकीकडे भाजप सत्तेच्या दिशेने वाटचाल करत असताना दुसरीकडे काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ हे छिंदवाडा मतदारसंघातून पिछाडीवर आहेत.
  • 09:19 AM • 03 Dec 2023

    मध्य प्रदेशमध्ये भाजपची जोरदार मुसंडी

    मध्य प्रदेशमध्ये भाजपला जनतेने चांगला प्रतिसाद दिल्याचं प्राथमिक कलानुसार पाहायला मिळत आहे. आतापर्यंत भाजप 132 जागांवर आघाडीवर आहे तर काँग्रेस फक्त 89 जागांवर आघाडीवर आहे.
  • ADVERTISEMENT

  • 09:13 AM • 03 Dec 2023

    मध्य प्रदेशमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये जोरदार टक्कर

    मध्य प्रदेशमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये जोरदार टक्कर पाहायला मिळत आहे. प्राथमिक कलांमध्ये भाजप काहीसं पुढे असल्याचं पाहायला मिळत आहे.
  • 08:45 AM • 03 Dec 2023

    मध्य प्रदेशमध्ये कोण मारणार बाजी?

    मध्य प्रदेशमधील मतमोजणीला थोड्याच वेळापूर्वी सुरुवात झाली असून सध्या बॅलेट पोस्ट मतमोजणी सुरू झाली आहे.
follow whatsapp

ADVERTISEMENT