लाइव्ह

MLA Disqualification: ‘एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपद मिळणार हे माहीत नव्हतं’

मुंबई तक

सुनावणीत काय घडलं, पाहण्यासाठी व्हिडीओवर क्लिक करा

हिवाळी अधिवेशन आणि आमदार अपात्रता प्रकरणाशिवाय धारावी पुनर्विकास प्रकल्पासह इतर काही मुद्दे चर्चेत आहेत. अधिवेशन अंतिम टप्प्यात असून, सरकार मराठा आरक्षणाबद्दल काय भूमिका मांडणार… त्याबरोबर इंडिया आघाडीत लोकसभा निवडणुकीसंदर्भात काय निर्णय होणार? सगळ्यांकडे लक्ष आहे… या सगळ्यांबद्दलचे अपडेट वाचा एकाच ठिकाणी…

 

ADVERTISEMENT

mla disqualification case maharashtra : Devdatta kamat arguing by uddhav thackeray faction
mla disqualification case maharashtra : Devdatta kamat arguing by uddhav thackeray faction
social share
google news

लाइव्हब्लॉग बंद

  • 10:22 PM • 19 Dec 2023

    उद्धव ठाकरे, अनिल परब आणि सुनील प्रभू या तिघांच्या मनाप्रमाणे कारभार सुरू होता- जेठमलानी

    उद्धव ठाकरे, अनिल परब आणि सुनील प्रभू या तिघा व्यक्तींच्या मनात आलेली गोष्ट होती.. त्या त्यांनी कळवल्या होत्या. यावेळी राष्ट्रीय कार्यकारिणी कोणताही निर्णय घेत नव्हती. मनात येईल तसे हे वागत होते. या तिघांच्या मर्जीप्रमाणे सगळ्या गोष्टी सुरू होत्या. - जेठमलानी
  • 10:18 PM • 19 Dec 2023

    MLA Disqualification: एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपद मिळणार आहे असं काही माहीत नव्हतं - जेठमलानी

    खरं आहे पण हे मतदारांच्या निर्णयावरही अवलंबून आहे. उद्धव ठाकरेंचा दावा होता की, त्यांना मुख्यमंत्री पदाबाबत आश्वासन देण्यात आले होते. एकनाथ शिंदेंना मात्र मुख्यमंत्रीपद मिळणार आहे असं काही माहीत नव्हतं. पण मुख्यमंत्री होण्यासाठी उद्धव ठाकरेंनी निवडणूकपूर्व युती तोडली - जेठमलानी
  • 10:15 PM • 19 Dec 2023

    MLA Disqualification: राजकीय विचारसरणीत फरक पडला का?- नार्वेकर

    राजकीय विचारसरणीत फरक पडण्याबाबत मी म्हणतोय - नार्वेकर
  • 10:14 PM • 19 Dec 2023

    MLA Disqualification: एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंना सोबत घेऊन जाण्यास तयार होते - जेठमलानी

    एकनाथ शिंदेंना युती तोडायची होती, ते उद्धव ठाकरेंना सोबत घेऊन जाण्यात तयार होते. एकनाथ शिंदेंनी महाविकास आघाडी सोडली तर ते अपात्र ठरत नाहीत - जेठमलानी
  • ADVERTISEMENT

  • 10:09 PM • 19 Dec 2023

    MLA Disqualification: आम्हाला कधीच प्रभूंकडून समाधानकारक उत्तरं मिळाली नाही: जेठमलानी

    प्रभू यांना हे पत्र इंग्रजीत का लिहिले आहे असं विचारले होते, सुनील प्रभू यांनी उत्तर दिलेलं की, भविष्यातील कायदेशीर प्रक्रियेसाठी त्याचा वापर होणार आहे. उलटतपासणीत ते म्हणालेले की, मी ईमेलद्वारे व्हीप पाठवला होता. नंतर त्यांनी हा व्हीप व्हॉट्सअॅपद्वारे पाठवला असं सांगितलं होतं. नंतर प्रभूंनी विजय जोशींनी हा व्हीप पाठवला असं सांगितलं.. आम्हाला कधीच प्रभूंकडून उलट तपासणीत समाधानकारक उत्तरं मिळाली नाहीत.
  • 10:03 PM • 19 Dec 2023

    MLA Disqualification: उद्धव ठाकरेंनी अधिकारांचा वापर करत पक्षाची बैठक का नव्हती बोलावली: नार्वेकर

    उद्धव ठाकरेंनी त्यांच्या अधिकारांचा वापर करत पक्षाची बैठक का बोलावली नाही? पक्षाची बैठक न बोलवता विधानसभेची बैठक का बोलावली?: नार्वेकर
  • ADVERTISEMENT

  • 10:01 PM • 19 Dec 2023

    MLA Disqualification: 22 जून 2022 रोजी अजय चौधरींच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली: जेठमलानी

    'वर्षा'वर विधीमंडळ बैठकीत 14 आमदारांनी सही केली, 22 जून 2022 रोजी अजय चौधरींच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीला अनुपस्थित राहणाऱ्या आमदारांवर कारवाई करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला- जेठमलानी
  • 09:36 PM • 19 Dec 2023

    Marathi Live News : राणा दांपत्याला न्यायालयाचा दणका, हनुमान चालीसा प्रकरणातून दोषमुक्त नाहीच

    खासदार नवनीत राणा यांनी 2022 मध्ये मातोश्री बाहेर पोलिसांचा विरोध झुगारून हनुमान चालिसा पठण करण्याचा प्रयत्न केला होता. त्याप्रकरणी नवनीत राणा व रवी राणा यांनी सादर केलेली याचिका मुंबई सत्र न्यायालयाकडून फेटाळण्यात आली आहे. नवनीत आणि रवी राणा यांनी या प्रकरणातू दोषमुक्ती करावे यासाठी याचिका दाखल केली होती.
  • 07:10 PM • 19 Dec 2023

    Marathi Live News : मराठा प्रश्नाला सरकारकडून हरताळ फासण्याचं काम, विजय वडेट्टीवार यांची टीका

    मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सरकारकडून कोणतंही ठोस उत्तर देण्यात आले नाही. जी तारीख आणि जो वेळ देण्यात आला होता, त्याला हरताळ फासण्याचं काम या सरकारने केले असल्याची टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. अधिवेशनाच्या काळात फक्त त्यांनी चर्चा करण्यापलिकडे काहीच केले नसल्याचेही त्यांनी सांगितले.
  • 06:20 PM • 19 Dec 2023

    मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी फेब्रुवारी महिन्यात विधिमंडळाचे विशेष अधिवेशन- CM शिंदे

    "राज्य मागासवर्ग आयोग महिनाभरात आपला अहवाल सादर करेल, त्यानंतर त्याचे अवलोकन केले जाईल, आणि मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी फेब्रुवारी महिन्यात विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलाविण्यात येईल. मराठा समाजाला हे आरक्षण देताना कुठल्याही समाजावर अन्याय होणार नाही याची मी ग्वाही या ठिकाणी देतो."
  • 06:16 PM • 19 Dec 2023

    मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन वचन दिलं- CM शिंदे

    'मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत मी जाहिरपणे छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन तसं वचन दिलं आहे आणि आजही मी त्यावर ठाम आहे. मराठा समाजाशिवाय इतर कोणताही समाज अडचणीत राहिला असता तर मी अशीच शपथ घेतली असती, त्यामुळे मी कुठेही मागे हटणार नाही, अशी ग्वाही पुन्हा एकदा देतो.' असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधानसभेत म्हणाले.
  • 06:13 PM • 19 Dec 2023

    तज्ज्ञ समिती नेमली जात प्रमाणपत्र देण्याची कार्यपद्धती निश्चित केली- CM शिंदे

    "७ सप्टेंबर २०२३ रोजी निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली. मराठवाड्यातील मराठा-कुणबी, कुणबी-मराठा, जात प्रमाणपत्र देण्याची कार्यपद्धती निश्चित केली. तज्ज्ञ समितीची नियुक्ती केली. निजामकालीन पुरावे, वंशावळी, शैक्षणिक पुरावे, महसुली पुरावे, निजामकालीन करार, त्यावेळच्या सनदी, राष्ट्रीय दस्तावेज या पुराव्यांची तपासणी कशी करायची हे या समितीने ठरविले. न्या. शिंदे समितीस सादर करण्यात आलेले १२ विभागांचे पुरावे, ४८ दस्ताऐवज ग्राह्य धरण्यासाठी तशी सुधारणा सामाजिक न्याय विभागाच्या नियमांत करण्यात येत आहे." असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधानसभेत म्हणाले.
  • 06:13 PM • 19 Dec 2023

    मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही- CM शिंदे

    'ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला टिकणारं आणि कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण देण्यात येईल. त्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. त्यासाठी जे-जे काही करायचं आहे, ते सगळं करण्याची आमची तयारी आहे.' असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधानसभेत म्हणाले.
  • 05:38 PM • 19 Dec 2023

    मराठा आरक्षणाच्या विषयावर आमच्या एकूण 30 बैठका - CM शिंदे

    "मराठा आरक्षणाच्या विषयावर माझ्या अध्यक्षतेखाली १० बैठका झाल्या, उपसमितीच्या १२ बैठका झाल्या, मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली १ आणि सल्लागार मंडळाच्या ७ अशा एकूण ३० बैठका आमच्या कार्यकाळात झाल्या. सर्वपक्षीय बैठका देखील घेतल्या आहेत." असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधानसभेत म्हणाले.
  • 05:33 PM • 19 Dec 2023

    मराठा समाजाला टिकणारे आरक्षण मिळाले पाहिजे- CM शिंदे

    "या सर्वोच्च सभागृहातून आपल्याला आणि राज्यातील जनतेला माझे एकच सांगणे आहे. मराठा समाजाला टिकणारे आरक्षण मिळाले पाहिजे, अशी आम्हा सर्वांची भावना आणि भूमिका आहे. इतर समाजाच्या आरक्षणाचा अधिकार न डावलता, मराठा समाजाचा जो अधिकार आहे, तो आपल्याला मिळाला पाहिजे, त्यावर मराठा समाजाचा नैसर्गिक हक्क आहे.अन्य कुणावरही अन्याय न करता मराठा समाजाला आरक्षण देण्यास सरकार कटिबद्ध आहे." असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधानसभेत म्हणाले.
  • 05:31 PM • 19 Dec 2023

    ज्यांचे पुरावे मिळाले आहेत त्यांना कुणबी प्रमाणपत्रं द्यायला विरोध नाही- CM शिंदे

    "ज्यांचे पुरावे मिळाले आहेत त्यांना कुणबी प्रमाणपत्रं द्यायला आपला कुणाचाही विरोध नाही. सभागृहातही सर्व सदस्यांनी तशीच भूमिका मांडलेली आहे. कुणबी दाखले देण्याबाबतचा जीआर जुनाच आहे. परंतु, ते दाखले दिले जात नव्हते. आम्ही ती प्रक्रिया गतिमान केली आहे." असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधानसभेत म्हणाले.
  • 05:27 PM • 19 Dec 2023

    मराठा समाजाला आरक्षण मिळू शकतं, त्यासाठी...- CM शिंदे

    "मला शेतकऱ्यांच्या प्रश्नांची आणि मराठा समाजाला भेडसावणाऱ्या समस्यांचीही जाण आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळू शकतं, त्यासाठी नेटाने आणि कायदेशीर पद्धतीने काम करावं लागेल, जे आम्ही करतोय. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर जेव्हा हा प्रश्न पेटला तेव्हा मी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती." असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधानसभेत म्हणाले.
  • 05:24 PM • 19 Dec 2023

    मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार सर्व पातळींवर लढा देण्यास सज्ज- CM शिंदे

    "मी या राज्याचा मुख्यमंत्री आहे, राज्यातील सर्व समाजबांधव माझ्यासाठी एकसमानच आहेत. प्रत्येक समाज घटकाला राज्याच्या प्रगतीत त्याचा योग्य तो वाटा मिळालाच पाहिजे, अशी आमची धारणा आहे. आज मराठा समाजाला प्रगतीसाठी आरक्षण देण्याची गरज निर्माण झाली आहे. ते आरक्षण देण्यास आमचं सरकार कटिबद्ध आहे. त्यासाठी सर्व पातळींवर सरकार लढा देण्यास सज्ज आहे." असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधानसभेत म्हणाले.
  • 05:21 PM • 19 Dec 2023

    मराठा आरक्षणासाठी जे आंदोलन सुरु आहे त्याचा अपप्रवृत्तींनी फायदा घेऊ नये- CM शिंदे

    "महाराष्ट्रामध्ये कुठेही तणाव वाढणार नाही याची काळजी राज्यकर्त्यांनी, विरोधी पक्षांनी आणि एकूणच समाजानेही आजवर घेतली आहे. आपण आज घेतोय आणि यापुढेही घेत राहू. त्यामुळेच, मराठा आरक्षणासाठी जे आंदोलन सुरु आहे, त्याचा काही अपप्रवृत्तींनी फायदा घेऊ नये यासाठी सर्वांनीच सावध राहण्याची, विचार करण्याची वेळ आली आहे. राज्यात शांतता, कायदा सुव्यवस्था, बंधुभाव कायम राहिला पाहिजे. कोणत्याही निमित्ताने समाजा-समाजात वितुष्ट येता कामा नये. चर्चेतून आणि योग्य भूमिका घेतली गेली तर सर्व प्रश्न सुटतात. आजही मी तेच आवाहन सगळ्यांना यानिमित्ताने करू इच्छितो." असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधानसभेत म्हणाले.
  • 05:18 PM • 19 Dec 2023

    महाराष्ट्राच्या विकासाला मराठा समाजाचा मोठा हातभार- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    "राज्यातल्या इतर सर्व समाजाशी मिळून मिसळून मराठा समाजानं आजवर महाराष्ट्राची सांस्कृतिक, सामाजिक बांधणी घट्ट केली आहे. महाराष्ट्राच्या विकासाला मोठा हातभार लावला. पण, गेल्या काही दिवसांपासून राज्यातील सामाजिक वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न होत आहे. कुठल्याही दोन समाजामध्ये तेढ निर्माण होणे हे राज्याला भूषणावह नाही. पुरोगामी महाराष्ट्राला हे तर आजिबातच शोभणारे नाही." असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधानसभेत म्हणाले.
  • 05:17 PM • 19 Dec 2023

    मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत बसणारं आणि टिकणारं आरक्षण मिळायला पाहिजे - CM शिंदे

    "आपण मराठा आरक्षण या अत्यंत महत्वाच्या विषयावर गांभीर्यपूर्वक चर्चा केली आहे. गेले तीन-चार दिवस आणि कित्येक तास सभागृहातील सर्व सदस्यांनी मराठा आरक्षण या विषयावर अत्यंत पोटतिडिकीने मतं मांडली आहेत. सर्वांना धन्यवाद देतो, अतिशय सविस्तर चर्चा या सभागृहात झाली आहे. यात आपल्या सर्वांची एकच भावना आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळायला पाहिजे आणि मुख्यमंत्री म्हणून पहिल्या दिवसापासूनच ही इच्छा मी व्यक्त केलेली आहे. मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी किंवा अन्य कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत बसणारं आणि टिकणारं आरक्षण मिळायला पाहिजे, हीच आमची भावना आहे." असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधानसभेत म्हणाले.
  • 04:54 PM • 19 Dec 2023

    आपण मुख्यमंत्री होऊ हे शिंदेंना कधीच वाटलं नसेल -जेठमलानी

    "एकनाथ शिंदेंनी पहिला ठराव भाजपसोबत जाण्याचा मंजूर केला होता. हे असं घडलं त्याचं कारण मुख्यमंत्री बनणे नव्हते. मला वाटत नाही की शिंदेंनी कधी विचार केला असेल की ते मुख्यमंत्री बनतील", असं जेठमलानी यांनी सांगितलं.
  • 04:51 PM • 19 Dec 2023

    ठाकरे म्हणालेले पुन्हा भाजपसोबत जाऊ -जेठमलानी

    "2019 मध्ये निवडणुकीआधी शिवसेना आणि भाजप यांची युती झाली होती. शिवसेना विधिमंडळ पक्षाच्या सदस्यांनी बैठक बोलावली आणि एकनाथ शिंदे यांची विधिमंडळ गटनेते म्हणून निवड केली. त्यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, आपण काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी करायला हवी. पक्षाचे कार्यकर्ते याविरोधात होते. पण, ठाकरेंनी विश्वास दिला की पक्ष पुन्हा भाजपसोबत जाईल. त्यानंतर ठाकरे मुख्यमंत्री झाले", असे जेठमलानी यांनी नार्वेकरांना सांगितलं.
  • 04:17 PM • 19 Dec 2023

    दोन आमदारांच्या खोट्या सह्या -जेठमलानी

    "त्यांनी (ठाकरे गट) अपात्रता याचिकेत म्हटलं आहे की, पक्षात डॅमेज कंट्रोल करण्यासाठी विधान परिषद निवडणुकीनंतर शिवसेना विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावली होती. त्या बैठकीतील पत्रावर 55 पैकी 14 आमदारांच्या सह्या आहेत. त्या दोन जणांनी सांगितलं की त्यांच्या सह्या खोट्या आहेत. ठराव मंजूर झाल्याची मूळ प्रतच नाहीये. उदय सामंतांनीही सांगितलं आहे की, त्यांनी कुठल्याही प्रस्तावावर सही केली नाही", असं जेठमलानी यांनी सांगितलं.
  • 04:12 PM • 19 Dec 2023

    अजय चौधरी उलटतपासणीलाच आले नाही, जेठमलानींनी काय म्हटलं?

    जेठमलानींनी पुढे सांगितलं की, "रवींद्र वायकरांनी एकनाथ शिंदे यांना काढून टाकण्याचा आणि त्या जागेवर अजय चौधरी यांची नियुक्ती करण्याचा ठराव मांडला. पण, अजय चौधरी उलटतपासणीलाच आले नाही. मिलिंद नार्वेकर आणि रवींद्र फाटक चर्चेसाठी सुरतला गेले. त्याचवेळी दुसऱ्या बाजूला व्हीप काढण्यात आला", असा मुद्दा जेठमलानी यांनी मांडला.
  • 04:07 PM • 19 Dec 2023

    नार्वेकर म्हणाले, त्या बैठकीबद्दल तुम्ही कसं बोलता?

    विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले, "वर्षा बंगल्यावरील बैठकीसंदर्भातील ज्या पत्राचा उल्लेख तुम्ही केला, ते पत्र त्यांच्याकडे (ठाकरे गट) आहे. जर तुम्हाला व्हीपच मिळाला नाही, तर तुम्ही त्या बैठकीचा उल्लेख कसा करता?". त्यावर जेठमलानी म्हणाले, "मी समजून सांगतो." "व्हीप पाठवण्यात आला होता, याचे पुरावे सादर करण्यात प्रभू अपयशी ठरले आहेत. मी प्रभूंना विचारलं की, हे पत्र खोटं असेल तर काय? ते म्हणाले हे खरं पत्र आहे."
  • 03:53 PM • 19 Dec 2023

    आमदारांना व्हीप बजावल्याचे पुरावेच नाही; शिंदेंच्या वकिलाचा जोरदार युक्तिवाद

    "त्या आमदारांना व्हीप बजावण्यात आल्याचे कोणतेही पुरावे नाहीत. व्हीप जारी केला असू शकतो, पण आम्हाला तो मिळालेलाच नाही. त्यामुळे बैठकीला हजर कसं राहणार? व्हीप काढण्यात आला, पण पाठवलाच नाही. कारण यांच्याकडे त्याची पावतीच नाही", असं जेठमलानी म्हणाले. "21 जूनला जर आमदार बेपत्ता होते, पण व्हीप जारी करण्याचे आदेश 20 जून रोजी म्हणजे एक दिवस आधीच काढण्यात आला", असे जेठमलानी म्हणाले.
  • 03:40 PM • 19 Dec 2023

    सुनील प्रभूंनी जे सांगितलं, ते प्रतिज्ञापत्रातच नाहीये -जेठमलानी

    "जेव्हा सुनील प्रभूंना विचारलं की त्यांनी कोणत्या आमदारांना व्हीप बजावला? त्यावर ते म्हणाले की, हे सगळं प्रतिज्ञापत्रामध्ये आहे. पण, त्यात ते नाहीये. त्यांनी (सुनील प्रभू) विधान परिषद निवडणुकीसाठी जे उपस्थित होते, त्याच आमदारांना व्हीप दिला होता. 12 आमदारांनाच प्रत्यक्षपणे व्हीप दिला गेला होता. 20.6.2022 रोजी व्हीप जारी केल्याचे कोणतेही कागदपत्रे सादर कऱण्यात आलेली नाहीत", असा दावा शिंदेंचे वकील जेठमलानी यांनी केला.
  • 03:31 PM • 19 Dec 2023

    सुनील प्रभूंच्या त्या उत्तरावर शिंदेंच्या वकिलांनी उपस्थित केली शंका

    जेठमलानी म्हणाले, "या प्रकरणात जे काही सांगितले गेले, ते खोट्या कागदपत्रांच्या आधारे आहे. सुनील प्रभू उलटतपासणीत म्हणाले की, 'काही आमदार बेपत्ता असल्याने उद्धव ठाकरेंनी मला फोन करून आमदारांची तातडीची बैठक घ्यायला सांगितलं होतं. पण, कॉल फोनवरून केला होता की, मोबाईलवरून, हे मात्र ते स्पष्टपणे सांगू शकले नाही."
  • 03:25 PM • 19 Dec 2023

    शिंदेंनी व्हीपवरूनच ठाकरेंना घेरले

    ठाकरे गटाकडून देवदत्त कामत यांनी युक्तिवाद पूर्ण केला. त्यानंतर शिंदे गटाकडून महेश जेठमलानी यांनी युक्तिवाद सुरू केला. जेठमलांनी यांनी युक्तिवादाच्या सुरुवातीलाच व्हीपवरून ठाकरे गटाला कात्रीत पकडण्याचा प्रयत्न केला. सुरूवातीलाच जेठमलानी म्हणाले की, त्यांच्या (ठाकरे गटाकडे) पुरावे नसल्यामुळे त्यांनी याच्या खोलात जाण्याचे जाण्याचे टाळले.
  • 02:57 PM • 19 Dec 2023

    Maharashtra Corona Update : महाराष्ट्रात कोरोनाच्या १३ नव्या रूग्णांची नोंद

    महाराष्ट्रात कोरोनाचे १३ नवे रूग्ण आढळून आले आहेत. हे सर्व १३ नवीन रूग्ण मुंबईत आढळले आहेत. त्यापैकी 1 रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहे. त्यामुळे सध्या महाराष्ट्रातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २४ वर गेली आहे.
  • 01:50 PM • 19 Dec 2023

    शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात कामतांचा युक्तिवाद संपला

    राहुल नार्वेकर म्हणाले, "सहयोगी सदस्यांची संकल्पना आहे." कामत म्हणाले, "दहाव्या परिशिष्टाशी त्याचा काही संबंध नाही. सहयोगी सदस्य केवळ विधानभवनाच्या सोयीसाठी आहे." याबरोबरच कामत यांचा युक्तिवाद संपला.
  • 01:48 PM • 19 Dec 2023

    सुभाष देसाई केसचा दाखला, कामतांनी सांगितला कायदा

    कामत म्हणाले, "सुभाष देसाई यांच्या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने स्पष्टपणे सांगितले आहे की, भरत गोगावले यांची केवळ आमदारांच्या गटाने मुख्य व्हीप म्हणून नियुक्ती केली आहे. भरत गोगावले यांना 03.07.2022 रोजी विधानसभा अध्यक्षांनी बेकायदेशीरपणे मुख्य व्हीप म्हणून मान्यता दिली होती. विधानसभा अध्यक्षांनी दिलेली ही मान्यता माननीय सुप्रीम कोर्टाने स्पष्टपणे बेकायदेशीर ठरवली आहे, कारण हे केवळ आमदारांचा ठराव आहे आणि तो पक्षाचा निर्णय आहे म्हणून प्रतिबिंबित होत नाही.""आमदारांचा गट राजकीय पक्ष असू शकत नाही. मुख्य प्रतोद असल्याचा दावा करणाऱ्या व्यक्तीने जारी केलेला व्हीप केवळ आमदारांच्या गटाने केलेला ठरावात कायद्याच्या आधारे कोणतेही पावित्र्य असू शकत नाही. राहिला प्रश्न अपक्षांचा तर ते राजकीय पक्षात सामील झाले, तर ते सदस्यत्व गमावतील. सुरतमध्ये शिवसेनेच्या ठरावावर अपक्ष आमदारांनी स्वाक्षरी केली आहे."
  • 01:34 PM • 19 Dec 2023

    राहुल नार्वेकर-देवदत्त कामतांमध्ये चर्चा

    विधानसभा अध्यक्ष म्हणाले, "विधानसभा अध्यक्षांची निवड ठरावानुसारच होते." त्यावर कामत म्हणाले की, "तो ठराव होता. तो महत्त्वाचा ठराव होता." कामत : त्यांचाही बहुमत ठरावाला पाठिंबा होता. राहुल नार्वेकर : त्यावेळी राजकीय पक्ष कोण होता, यावर हे अवलंबून आहे.
  • 01:32 PM • 19 Dec 2023

    शिंदेंनी व्हीपला काय दिले होते उत्तर

    "एकनाथ शिंदे यांनी पत्राला उत्तर देताना म्हटले आहे की, तुम्हाला सही करण्याचे अधिकार नसतानाही मला नोटीस पाठवली आहे, जी कायदेशीररित्या अवैध आहे. तुम्हाला मला नोटीस पाठवण्याचा अधिकार नाही. त्यामुळे सदर बैठकीला उपस्थित राहणे माझ्यावर बंधनकारक नाही", असे कामतांनी अध्यक्षांना सांगितले.
  • 01:32 PM • 19 Dec 2023

    हे आमदार सरकार पाडण्यासाठी कट रचत होते -कामत

    "हे आमदार एकत्र प्रवास करून गेले आणि ज्या राजकीय पक्षाच्या तिकिटावर हे आमदार निवडून आले होते, त्या राजकीय पक्षाच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्रातील सरकार पाडण्यासाठी भाजपसोबत कट रचत होते. पुढील घटनाक्रमावरून या आमदारांच्या भाजपसोबतच्या सक्रिय संगनमताबद्दल कोणतीही शंका नाही", असे कामत म्हणाले. "गुवाहाटीमध्ये, प्रतिवादी आमदारांनी (शिंदे गट) उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार बेकायदेशीरपणे पाडण्यासाठी भाजपशी सक्रियपणे हातमिळवणी केली. भाजप नेत्यांनी गुवाहाटीतील मुक्कामादरम्यान एकनाथ शिंदेंची भेट घेतली", असेही कामतांनी सांगितले.
  • 01:28 PM • 19 Dec 2023

    सुनील प्रभूंनी व्हीप जारी केला होता -कामत

    "22 जून 2022 रोजी झालेल्या शिवसेना विधिमंडळ पक्षाच्या (SSLP) बैठकीला गैरहजर राहणे. 21 जून 2022 रोजी ज्या घडामोडी घडल्यामुळे शिवसेना पक्षप्रमुखांनी तातडीची बैठक घेण्याचा निर्णय घेतला आहे, असे आदरपूर्वक सादर केले जाते. 22.06.2022 रोजी विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावली होती. यासाठी पक्षाध्यक्षांच्या आदेशावरून मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी व्हीप जारी केला होता. या सभेला उपस्थित न राहिल्यास अपात्रता कारवाई होईल, असे पत्र सुनील प्रभू यांनी शिवसेनेच्या सर्व आमदारांना दिले होते.पत्रात स्पष्टपणे म्हटले आहे: “कृपया लक्षात घ्या की बैठकीला हजर राहू शकत नसल्याबद्दल लिखित स्वरुपात वैध आणि पुरेशी कारणे दिल्यास, आणि आधी न कळवल्यास, भारतीय राज्यघटनेच्या संबंधित तरतुदींनुसार तुमच्याविरुद्ध परिणामी कारवाई केली जाईल."
  • 12:45 PM • 19 Dec 2023

    सुप्रिया सुळे लोकसभेतून निलंबित

    संसद सुरक्षेमध्ये चूक झाल्याच्या मुद्द्यावर विरोधकांकडून गृहमंत्री अमित शाह सभागृहात निवेदन करावे, अशी मागणी विरोधकांकडून सातत्याने केली जात आहे. याच मुद्द्यावरून गेल्या दोन दिवसांपासून संसदेत प्रचंड गदारोळ सुरू असून, विरोधी बाकांवरील अनेक खासदारांना निलंबित करण्यात आले आहे. मंगळवारी (19 डिसेंबर) या मुद्द्यावर विरोधक आक्रमक झाले. विरोधी खासदारांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे तब्बल 41 खासदारांना अधिवेशन संपेपर्यंत निलंबित करण्यात आले. यात महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांचाही समावेश आहे. संपूर्ण बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
  • 12:38 PM • 19 Dec 2023

    कायद्याने परवानगी नसतानाही, शिंदे गटाने..., कामतांनी व्हीप नियुक्तीचा मुद्दा केला अधोरेखित

    कामत म्हणाले की, "हे स्पष्ट आहे की प्रतिवादी आमदारांनी (शिंदे गट) स्वतःचा गटनेता आणि कायद्याने परवानगी नसतानाही मुख्य व्हीपची नियुक्ती करून राजकीय पक्षाच्या नेतृत्वाची केवळ बदनामीच केली नाही, तर त्यांच्याच राजकीय पक्षाच्या नेतृत्वाखालील सरकार पाडण्याचाही प्रयत्न केला. ही कृती स्पष्टपणे संविधानाच्या दहाव्या परिशिष्टातील परिच्छेद 2(1)(अ) नुसार स्वेच्छेने राजकीय पक्षाचे सदस्यत्व सोडण्यासारखे आहे."
  • 12:34 PM • 19 Dec 2023

    ज्या पक्षाच्या तिकिटावर निवडून आले, त्याच पक्षाचं आमदारांनी सरकार पाडलं -कामत

    "हे पत्र राज्यपालांना पाठवण्याची कृती ही आमदारांची गंभीर अयोग्य कृती आहे आणि ज्या पक्षाच्या तिकिटावर ते निवडून आले आहेत, त्या राजकीय पक्षाने स्थापन केलेले सरकार पाडण्याचे षडयंत्र होते. खरे तर राज्यपालांनी दिनांक 28.06.2022 च्या पत्रात बहुमत चाचणी घेण्याचे निर्देश देताना, स्पष्टपणे दिनांक 21.06.2022 च्या या पत्राचा संदर्भ दिला आहे."
  • 12:30 PM • 19 Dec 2023

    राज्यपालांना पाठवला नाराजीचा ठराव -कामत

    कामत युक्तिवाद करताना म्हणाले, "प्रतिवादी आमदारांनी त्यांचा लेखी ठराव दिनांक 21.06.2022 रोजी राज्यपालांकडे पाठविला. लेखी ठरावामध्पे या आमदारांनी महाविकास आघाडीसोबत आघाडी कायम ठेवल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. त्या ठरावात म्हटले होते की, 'आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे. आमचे म्हणजे शिवसेनेचे वैचारिक विरोधक आहेत, त्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत सरकार स्थापन केल्यामुळे."
  • 12:12 PM • 19 Dec 2023

    मराठा समाज 6 कोटी असल्याचं जरांगे म्हणतात पण हे खरं कसं मानायचं?- छगन भुजबळांचा सवाल

    'राज्यात धर्मा-धर्मातही भांडणं सुरू आहेत. जनगणनेची मागणी केल्यास लोक कोर्टात जातात. मराठा समाज 6 कोटी असल्याचं जरांगे म्हणतात. 6 कोटी म्हणजे 50 टक्के समाज, हे खरं कसं मानायचं?' असा सवाल छगन भुजबळ यांनी केला.
  • 12:08 PM • 19 Dec 2023

    Marathi News Live Update: शिवराज सिंहांप्रमाणे उद्या मोदींनाही बदललं जाऊ शकतं- उद्धव ठाकरे

    "शिवराज सिंहांप्रमाणे उद्या मोदींनाही बदललं जाऊ शकतं. आजच्या बैठकीत मी देखील काही गोष्टी सुचवणार आहे. आज मी भेटीगाठी घेणार, पण मला हुडी घालायची गरज नाही", अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी भाजपला टोला लगावला.
  • 10:59 AM • 19 Dec 2023

    तसा ठराव मंजूर करण्याचा शिंदे गटाला अधिकारच नव्हता -कामत

    "तुम्ही सुरतमध्ये ठराव मंजूर केला. तुम्ही इतर आमदारांना फोन केला का? तुम्ही सर्व आमदारांना बोलवायला हवं होतं. निर्णय बहुमताने मंजूर होतो, परंतु सर्वांनी उपस्थित राहायला हवे, अशी कार्यपद्धती आहे. असा ठराव मंजूर करणे पक्षाच्या विरोधात आहे. कारण त्यांना तसे करण्याचा कायदेशीर अधिकार नव्हता", असे युक्तिवाद कामत यांनी केला.
  • 10:56 AM • 19 Dec 2023

    शिवसैनिक या आमदारांवर नाराज होते -कामत

    दीपक केसरकरांनी आमदारांना धमक्या दिल्याचा मुद्दा उलटतपासणी दरम्यान मांडला होता. त्याच मुद्द्यावर कामत म्हणाले, "कार्यकर्ते नाराज झाले होते, त्यामुळे धमक्या आणि हिंसा घडली. कार्यकर्ते या आमदारांवर नाराज होते." "21 जून 2022 रोजी वर्षा बंगल्यावर झालेल्या बैठकीत तुम्ही या पत्रकावर स्वाक्षरी केली का?, असे विचारले असता दिलीप लांडे म्हणाले, 'ते बरोबर आहे.'
  • 10:45 AM • 19 Dec 2023

    भाजपसोबत चर्चा करून शिवसेनेचे सरकार पाडलं -कामत

    "त्यांनी महाराष्ट्र सोडला आणि सुरत गेले. नंतर गुवाहाटीला जाऊन विरोधी पक्षा (भाजप) सोबत चर्चा केली. त्यानंतर महाराष्ट्रातील शिवसेनेच्या नेतृत्वाखालील सरकार पाडले. सुरतला जाणे हा पूर्वनियोजित कार्यक्रम होता. हे नियोजित षडयंत्र होतं. तुम्ही (राहुल नार्वेकर) 10 व्या परिच्छेदाचे रक्षक आहात", असे देवदत्त कामत म्हणाले. "त्यांनी सुरतमध्ये ठराव पास केला आणि म्हणतात की, शिवाजी महाराज गेले म्हणून आम्ही तिथे गेलो", असे सांगत कामतांनी भरत गोगावले यांनी मांडलेल्या मुद्द्यावरच प्रश्न उपस्थित केले.
  • 10:39 AM • 19 Dec 2023

    स्वच्छेने पक्ष सोडण्याबद्दल कामतांचा सवाल

    "राजकीय महत्त्वाकांक्षा कायदेशीर प्रक्रियांना झुगारू शकते का? अपप्रवृत्तीच्या कृत्यांमध्ये सहभागी होण्यापूर्वी तुम्ही (शिंदे गट) दिवाणी खटला दाखल करू शकता. 2022 पर्यंत अस्तित्वात असलेली नेतृत्व रचना मी दाखवली असेल, तर राजकीय पक्षाचे सदस्यत्व स्वेच्छेने सोडायचे काय, हे आपण कसे ठरवायचे?"
  • 10:39 AM • 19 Dec 2023

    आमदारांचं हे वर्तनच अपात्रता ओढवून घेणारं -कामत

    "राजकीय पक्षाकडून बैठक बोलावण्यात आली होती, त्याला हे (शिंदे गट आमदार) उपस्थित नव्हते. तुम्ही (शिंदे गट) गुवाहाटी आणि सुरतला गेलात. तुम्ही राज्यपालांना भेटून शपथ घेतली. आणि इतर आमदार सांगतात की आमचा तुम्हाला (एकनाथ शिंदे) पाठिंबा आहे. आमदारांचं हे वर्तन अपात्रता ओढवून घेणारं आहे", असा मुद्दा कामत यांनी मांडला.
  • 10:29 AM • 19 Dec 2023

    राहुन नार्वेकरांचा शिवसेना पक्षप्रमुखांबद्दल प्रश्न

    विधानसभा अध्यक्ष नार्वेकर म्हणाले, "पक्षप्रमुखांनी पक्षाच्या विरोधात काम केले तर?"या प्रश्नाला उत्तर देताना कामत म्हणाले की, "पक्षाच्या घटनेतील कायद्यानुसार राष्ट्रीय कार्यकारिणी बोलावून अध्यक्षांना हटवण्याची तरतूद आहे. पण, जेव्हा (शिंदे गट) तुम्हाला अपात्रतेचा सामना करावा लागला, तेव्हा तुम्ही (शिंदे गट) म्हणत आहात की अध्यक्षांनी पक्षाच्या विरोधात काम केले."
  • 10:21 AM • 19 Dec 2023

    हे 10 परिच्छेदाच्या विरोधात आहे - कामत

    कामत म्हणाले, "राजकीय पक्षाने विधिमंडळ पक्षाला स्वातंत्र्य दिले होते असे गृहीत धरले, तर ती शक्ती निरपेक्ष आहे का? ते रद्द करता येणार नाही का? अम्बिकल कॉर्डबद्दल (मूळ पक्षाबद्दल)सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे. विधिमंडळ पक्ष हा पक्षाचे हृदय आणि आत्मा आहे, असे प्रतिवादींचे म्हणणे आहे. हे 10 व्या परिच्छेदाच्या विरोधात आहे. असे होऊ शकत नाही की आमदारांनी शेपूट हलवावं आणि राजकीय पक्ष शेपूट आहे."
  • 10:21 AM • 19 Dec 2023

    नार्वेकरांचा प्रश्न कामतांचे उत्तर

    'आतापर्यंत विधिमंडळ पक्षानेच व्हीप नेमलेला आहे, असा मुद्दा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पुन्हा उपस्थित केला आहे. त्यावर कामत म्हणाले की, "आजवर राजकीय पक्षात त्यावरून वाद निर्माण झाला नव्हता."
  • 10:12 AM • 19 Dec 2023

    त्यांना शिवसेनेत राहायचे नाही, हेच दिसले - कामत

    देवदत्त कामत पुढे म्हणाले की, आता मुद्दा 20 जून 2022 चा. तर 20 जून 2022 पर्यंत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाला कुणीही आव्हान दिले नव्हते. या प्रकरणात 20 जून नंतर पक्षांतरविरोधी कारवाई झाली आहे. आमदारांनी वेगळे वर्तन केले, त्यामुळे असे दिसले की त्यांना शिवसेनेत राहायचे नाही."
  • 10:09 AM • 19 Dec 2023

    उद्धव ठाकरेंचा निर्णय म्हणजे राष्ट्रीय कार्यकारिणीचे प्रतिबिंब

    सोमवारी (18 डिसेंबर) झालेल्या युक्तिवादाचा पुनर्रुल्लेख करत ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत म्हणाले की, "पक्षाच्या अध्यक्षांचा निर्णय हा राष्ट्रीय कार्यकारिणीचे प्रतिबिंब असतो. जर असे नाही, तर राष्ट्रीय कार्यकारिणीने पक्षाध्यक्षांविरोधात प्रस्ताव मंजूर केला आहे का? नाही."
  • 09:16 AM • 19 Dec 2023

    राज ठाकरेंच्या नेत्याचे उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर

    उद्धव ठाकरेंना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. "आयुष्यभर महानगरपालिकेच्या कंत्राटदारांबरोबर सेटलमेंट केलीत, आता मोर्चाकाढून अदानी बरोबर करत आहात. मानेला आणि मनाला पट्टा बांधणाऱ्यांना शालीच वजन ही पेलवणार नाही आणि शालीच्या विचारांचं वजन सुद्धा पेलवणार नाही", अशा शब्दात संदीप देशपांडेंनी ठाकरेंना टोला लगावला आहे.
  • 09:13 AM • 19 Dec 2023

    खरी शिवसेना कुणाची?

    आमदार अपात्रता प्रकरणात निकाल देण्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे खरी शिवसेना कुणाची? विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना हे आधी ठरवावं लागणार आहे. त्यानुंगानेच ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत हे युक्तिवाद करत आहेत. शिवसेनेतील बंडखोरीपर्यंत उद्धव ठाकरे हेच पक्षाचे प्रमुख होते आणि काही आमदारांचा गट पक्षावर दावा करू शकत नाही, असे म्हटले आहे. कामत यांनी सुप्रीम कोर्टाच्या यापूर्वीच्या निकालांचाही हवाला दिला आहे. त्यामुळे नार्वेकरांना खरी शिवसेना कोणती हे ठरवावे लागणार आहे.
follow whatsapp

ADVERTISEMENT