लाइव्ह

MLA Disqualification Case : व्हीप बजावण्यावरून भरत गोगावलेंना घेरले, ठाकरेंचे वकिल काय म्हणाले?

योगेश पांडे

ADVERTISEMENT

Deepak Kesarkar Cross examined by thackeray faction by devdatt kamat in Mla Disqualification Case.
Deepak Kesarkar Cross examined by thackeray faction by devdatt kamat in Mla Disqualification Case.
social share
google news

लाइव्हब्लॉग बंद

  • 08:45 PM • 12 Dec 2023

    मंत्री केलं नाही म्हणून आमदार म्हणून आपण उद्धव ठाकरे सरकारचा पाठिंबा काढून घेतला?

    प्रश्न- जून 2022 ते जुलै 2022 यादरम्यान आपण मीडियाला ज्या मुलाखती दिल्या त्यामध्ये आपण महाराष्ट्र सरकार मध्ये मंत्री बनण्याची इच्छा दर्शवली होती, हे खरे की खोटेउत्तर- नाही. मी अजून कुठे मंत्री झालो आहे?प्रश्न- तुम्हाला मंत्री व्हायचं होतं आणि तुम्हाला मंत्री केलं नाही म्हणून आमदार म्हणून आपण उद्धव ठाकरे सरकारचा पाठिंबा काढून घेतला हे खरे आहे काउत्तर- नाही हे खोटे आहे
  • 08:45 PM • 12 Dec 2023

    उलट तपासणी संपली, युक्तिवाद 18 ते 20 डिसेंबरला होणार

    सर्व उलट तपासणी आता संपल्या आहेत. यापुढे युक्तिवाद होणार आहेत. 18 ते 20 डिसेंबर दरम्यान युक्तिवाद होतील.
  • 08:32 PM • 12 Dec 2023

    सूरत-गुवाहटीच्या प्रश्नांवरून गोगावलेंना खिंडीत गाठण्याचा प्रयत्न

    प्रश्न-जून 2022 मध्ये आपण सुरत साठी कधी प्रस्थान केलेउत्तर- सुरत साठी मी 20 जून ला प्रस्थान केले.प्रश्न- तुम्ही सुरत कसे पोहोचले आणि किती आमदार सोबत पोहोचलेउत्तर- आम्ही सुरतला गाडीने गेलो. मी एकटाच गेलो.प्रश्न- 20 जून रोजी महाराष्ट्र मधून जाण्यासाठी तुम्ही सुरत ठिकाणची निवडलं का केलीउत्तर- सुरत हे चांगले ठिकाण आहे असे मी ऐकले होते त्यामुळे तिकडे जाऊन व्यक्तीशः बघूया म्हणून सुरत ठिकाण निवडले..प्रश्न- बाकी आमदार तुम्ही सुरत पोहोचण्यापूर्वीच सुरत येथे पोहोचलेले होते काउत्तर- नाहीप्रश्न- तुम्ही सुरत पोहोचल्यानंतर बाकीचे आमदार तुमच्या पाठीमागून सुरतला पोहोचले काउत्तर- मी पहिलाच गेलो. मी ज्या हॉटेलमध्ये थांबलो होतो तेथे उर्वरित आमदार आलेप्रश्न- बाकीचे आमदार सुरतला तुमच्या नंतर आले, तर त्यांना तुम्ही सुरत मध्ये हॉटेलमध्ये आहात हे कळवल होता का की त्यांना पहिले माहिती होतउत्तर- याबाबत मला माहिती नाही, परंतु मी गेल्यानंतर ते तेथे आले आणि त्यांची आणि माझी भेट झालीप्रश्न- सर्वच आमदार सुरत येथे एकत्र येणे हा काही योगायोग होऊ शकत नाही, हे पूर्वनियोजित होते का?उत्तर- ते मला माहिती नाही, ते तिकडे कसे आले हे त्यांनाच माहिती असेल. शिवाजी महाराज तिकडे गेले होते म्हणून मला वाटले चांगले ठिकाण असेल म्हणून मी तिकडे गेलोप्रश्न- आपल्यासह इतर सर्व आमदार सुरत वरून गुवाहाटी ला एकत्र गेले होते काउत्तर- होय, आम्ही गुवाहाटीला गेलोप्रश्न- तुम्ही सर्वांनी आपआपली व्यक्तिगत विमान तिकीट काढली होती की आपण चार्टर्ड फ्लाईट ने गेले होते?उत्तर- आम्ही स्वतःच्या खर्चाने गेलो होतो , कामाख्या देवीचे दर्शन स्वतःच्या पैशाने घेणे उचित आहे.प्रश्न- गुवाहाटी येथे तुम्ही सर्व एकाच हॉटेल मध्ये थांबले होते का?उत्तर- होय, आम्ही सर्व मित्र असल्यामुळे एकाच हॉटेलमध्ये राहिलो
  • 08:32 PM • 12 Dec 2023

    उद्धव ठाकरे यांचे सरकार पाडण्याची आपली इच्छा होती?

    प्रश्न- आपल्या अशा कृतीने श्री उद्धव ठाकरे यांचे सरकार पाडण्याची आपली इच्छा होती हे खरे आहे काउत्तर- हे खोटे आहेप्रश्न- उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना तुम्ही त्यांच्या काळात मंत्री होते काउत्तर- नाही
  • ADVERTISEMENT

  • 08:28 PM • 12 Dec 2023

    तुम्ही विरोधात मतदान केलं होतं का?

    प्रश्न- bharatshethhogavle@gmail.com हा तुमचा मेल आयडी आहे काउत्तर- होय2 जुलै 2022 रोजी तुम्हाला विजय जोशी यांच्याकडून सुनील प्रभू यांनी जारी केलेले दोन व्हीप प्राप्त झाले इमेल द्वारा प्राप्त झाले, ही बाब सत्य की असत्यउत्तर- असत्य आहेप्रश्न-हे खरे आहे का की तुम्ही, 3 जुलै 2022 रोजी झालेल्या अध्यक्ष पदाच्या निवडणूक मध्ये राजन साळवी यांच्या विरोधात आणि राहुल नार्वेकर यांच्या बाजूने मतदान केले होते काउत्तर- राजन साळवी यांचा काही प्रश्नच येत नाहीप्रश्न- श्री राजन साळवी हे शिवसेना विधिमंडळ पक्षाचे सदस्य आहे काउत्तर-होयप्रश्न- विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी तुम्ही एकनाथ शिंदे यांच्या सरकारच्या बाजूने मतदान केले होते हे खरे आहे काउत्तर- होयप्रश्न- भारताच्या संविधानातील सूची 10 मधील परिच्छेद 2 (1) आणि 2 (एक) आणि दोन एक ब मध्ये दिलेल्या तरतुदीनुसार आपण अपात्रता स्वतः वर ओढवून घेतली हे खरे आहे काउत्तर- हे खोटे आहे
  • 08:27 PM • 12 Dec 2023

    ते डॉक्युमेंट बोगस आहे का?

    प्रश्न- त्या 15 आमदारांनी तुमच्या वरील नंबर वर कधी व्हाट्सअप मेसेज पाठवले नाही असं त्यांचं म्हणणं आहे खरे आहे का > उत्तर- हे खोटे आहे. > प्रश्न- आपण 15 आमदारांना 4 जुलै 2022 रोजी व्हीप त्यांच्या पिजन बॉक्स मध्ये टाकला आणि त्यांना कळवले नाही हे खरे आहे का > उत्तर- आम्ही ते पत्र त्यांच्या पीजन बॉक्समध्ये टाकले आणि व्हाट्सअप ने कळवले यातूनच स्पष्ट होते की आम्ही त्यांना कळवले आहे. बाकी म्हंटल गेलं आहे ते खोटं आहे. > प्रश्न- हा जो ठराव आहे त्याला मराठी देवनागरीमध्ये महेश शिंदे असे नाव लिहिले आहे हे बरोबर आहे का > उत्तर- होय > प्रश्न- आता जे पत्र तुमच्या हातात आहे त्यामध्ये महेश शिंदे यांचे नाव पान क्रमांक 45 वर इंग्रजीत आहे हे खरे आहे का > उत्तर- होय > प्रश्न- आज तुम्ही ओरिजनल म्हणून जे डॉक्युमेंट दिले आहे ते बोगस आहे, बनावट आहे आणि ते नंतर तयार करण्यात आले आहे, बॅक डेट मध्ये > उत्तर- नाही, खोटे आहे हे प्रश्न- आपण ओरिजनल दिले आहेत त्या बनावट आणि बोगस तसेच नंतरचा विचार करून तयार केलेल्या आहेत > उत्तर- असे काही नाही, जे आहे ते व्यवस्थित आहे.
  • ADVERTISEMENT

  • 08:27 PM • 12 Dec 2023

    मुख्य प्रतोद म्हणून नियुक्ती कशी झाली?

    प्रश्न- हा जो 21 जून 2022 चा ठराव होता त्यानंतर आपली मुख्य प्रतोद म्हणून नियुक्ती करण्यात आली हे बरोबर आहे काउत्तर- हो, बरोबर आहेप्रश- हे आताचं डॉक्युमेंट वगळता तुम्हाला मुख्य प्रतोद म्हणून नियुक्ती करण्याचा आधार म्हणून दुसरा कुठलाही डॉक्युमेंट किंवा कागदपत्र नाही आहे, हे खरे आहे काउत्तर- आमच्या सर्व आमदारांनी बसून एकत्रित या माझी निवड करून नियुक्ती केली आहे..प्रश्न- तुमची जी नेमणूक करण्यात आली ती या एकाच ठरावाच्या आधारावर करण्यात आली काउत्तर- मला माहिती नाहीप्रश्न- आपण जो ठराव बघितला तो ठराव कुठे तयार करण्यात आला आणि त्यावर स्वाक्षरी कधी करण्यात आलीउत्तर-मला नेमके आठवत नाहीप्रश्न- 21 जून 202 रोजी सुनील प्रभू यांनी एक व्हीप जारी केला होता तो तुम्हाला प्राप्त झाला होता काउत्तर- नाहीप्रश्न- एका शिंदे साहेबांनी जो उल्लेख केलेला आहे की 21/ 6/ 2022 रोजी अजय चौधरी यांना दुपारी साडेबारा वाजता ठराव पास करून नियुक्ती करण्यात आली आहे हे एकनाथ शिंदे यांना कसे कळलेउत्तर- मला माहिती नाही.
  • 08:20 PM • 12 Dec 2023

    मोबाइल नंबरवर आणि व्हीपवरून गोगावलेंची उलटतपासणी

    प्रश्न- संतोष कदम यांनी तुम्हाला सिम कार्ड का दिले > उत्तर- मी त्याला सांगितले होते की आपल्या ग्रामीण भागात रेंजचा प्रॉब्लेम असल्याने मी त्याला विनंती केली की मला रेंज मिळेल असे सिमकार्ड घेऊन दे. > प्रश्न- त्यांनी आपल्याला हे सिम कार्ड कधी दिले आहे, केव्हापासून तुम्ही ते वापरता > उत्तर- लक्षात नाही परंतु चार-पाच वर्षापेक्षा जास्त झाली असतील.. > प्रश्न - मोबाईल क्रमांक 904955**** हा तुमचा नंबर "महाराष्ट्र विधानसभा सदस्यांची यादी" जी 30/ 5 /2022 रोजी प्रसिद्ध झाली आहे त्यात हा वरील नंबर तुमच्या नावासमोर रजिस्टर नाही > उत्तर-माझ्या दुसऱ्या नंबरचा उल्लेख यादीत केला गेला आहे. > प्रश्न- आमदार म्हणून तुम्ही जो नंबर महाराष्ट्र विधानमंडळ कडे दिला आहे यावरून तुमचे सगळे अधिकृत काम व्हायला हवे हे खर आहे का > उत्तर- होय > प्रश्न- तुम्ही आमदारांना व्हाट्सअप वर मेसेज पाठवले असे म्हणत आहे त्यात 904955**** हा जो मोबाईल नंबर आहे त्यावरून कोणताही व्हाट्सअप मेसेज त्यांना मिळालेला नाही हे त्यांचे म्हणणे खरे आहे > उत्तर- मी सर्वांना याच नंबर वरून मेसेज पाठवला आहे आणि त्यांना तो मिळालेला आहे..
  • 08:15 PM • 12 Dec 2023

    तो मोबाइल कोणाच्या नावावर?

    प्रश्न- चार जुलै 2022 रोजी व्हाट्सअॅपवर संदेश पाठवले तो मोबाइल कोणाच्या नावावर रजिस्टर आहे? त्याचा नंबर काय आहे?उत्तर- त्याचा मोबाईल क्रमांक 904955**** हा आहे. तो नंबर माझ्या मित्राच्या नावावर आहे परंतु तो मी वापरतो.प्रश्न- आपण ज्या व्यक्तीच्या नावावर असलेला मोबाईल वापरत आहात त्या व्यक्तीचे नाव कायउत्तर- त्याचे नाव नेमके सांगता येणार नाही परंतु संतोष कदम आहे असे मला वाटते..
  • 08:15 PM • 12 Dec 2023

    तुमचा मोबाइल नंबर कोणता?

    प्रश्न- आपल्या नावे असलेला मोबाईल नंबर कोणता > उत्तर-माझ्या नावावर असलेला मोबाईल नंबर 94220***** आहे . > प्रश्न- संतोष कदम यांनी तुम्हाला मोबाईल दिला का > उत्तर- त्यांनी मोबाईल दिला नाही केवळ सिमकार्ड हे त्याच्या नावावर रजिस्टर आहे. तो मोबाईल माझा आहे.
  • 06:31 PM • 12 Dec 2023

    व्हाट्सअ‍ॅप स्क्रिनशॉटचे बनावट प्रिंटआऊट दाखवलेत

    प्रश्न- आपण जे कथीत व्हाट्सअ‍ॅप संदेश पाठवले असे म्हणत आहात, त्याचे जे प्रिंटआऊट दाखवलेत ते बनावच आहेत. कारण त्यावर सकाळी 10 वाजून 48 मिनिटांचा टाइमिंग आहे आणि त्यावेळी तुम्ही विधान भवनात होतात की हॉटेलवर होतात हे स्पष्ट करा?उत्तर- मी मघाशी सांगितले की मला वेळ नक्की आठवत नाही त्यामुळे त्याबाबतची खात्रीलायक माहिती मी देऊ शकत नाही. त्यामुळे वेळ सांगताना तफावत झाली असेल.
  • 06:25 PM • 12 Dec 2023

    व्हीप बॉक्समध्ये ठेवण्यासाठी कोणाची मदत घेतलीत?

    प्रश्न- विधानसभा अध्यक्षांची सव्वा दहा वाजता परवानगी घेतल्यानंतर आपण काय केलंउत्तर- त्यानंतर आम्ही ते व्हीप त्या बॉक्समध्ये ठेवले..प्रश्न-व्हीप बॉक्समध्ये ठेवण्यासाठी कोणी मदत केली काउत्तर- केसरकर साहेब तिकडे माझ्यासोबत होते त्यांच्या समोर मी बॉक्स मध्ये ठेवली.प्रश्न- विश्वास दर्शक ठराव त्या दिवशी अंदाजे कोणत्या वेळी होताउत्तर- it's matter of recordप्रश्न- आपण व्हीप टाकण्यासाठी विधानभवनात गेले आणि विश्वास दर्शक प्रस्ताव प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत आपण विधानसभेतच थांबला होतात का?उत्तर- होय
  • 06:18 PM • 12 Dec 2023

    व्हीप बजावण्यावरून भरत गोगावलेंना घेरले, ठाकरेंचे वकिल काय म्हणाले?

    देवदत्त कामत : आपण साक्षीत अस सांगितले की, हॉटेल प्रेसिडेंटमध्ये 40 आमदार उपस्थित असताना त्यांना आपण हाताने व्हीप बजावला आणि उर्वरित 15 आमदारांना व्हॉटसअॅपने व्हीप पाठवलं हे बरोबर आहे की चूकउत्तर-होय, हे बरोबर आहेप्रश्न- तुम्हाला सात नंबरच्या प्रश्नात विचारला की हॉटेल प्रेसिडेंटमधून व्हीप पाठवला का, तुम्ही म्हटलं होत को हो आणि आता 15 नंबर चा तोच प्रश्न विचारला की आपण व्हाट्सअप मेसेज हॉटेल प्रेसिडेंट मधून पाठवले का तर आपण म्हणता की मला नक्की आठवत नाही असं का? या विरोधाभागाचा स्पष्टीकरण द्याउत्तर- प्रश्न क्रमांक 15 चे उत्तर देताना माझा समज असा झाला की आपण मला वेळेबद्दल विचारत होता म्हणून मी म्हणालो मला नक्की आठवत नाही. मी आपल्याला सांगू इच्छितो की ते व्हाट्सअप मेसेज प्रेसिडेंट मध्ये असताना मी पाठवले.
  • 06:02 PM • 12 Dec 2023

    हॉटेल प्रेसिडेंटमध्ये तुमच्यासोबत कोण गेले?

    देवदत्त कामत- आपण कोणत्या ठिकाणी हॉटेल प्रेसिडेंटला गेलातउत्तर- आम्ही आमच्या घरून गेलो.देवदत्त कामत- हॉटेल प्रेसिडेंट येथून विधान भवन येथे जाताना आपल्याबरोबर कोण होतंउत्तर- मी विधान भवनात गेल्यानंतर माझ्याबरोबर दीपक केसरकर तेथे होते.देवदत्त कामत- दीपक केसरकर पूर्वीपासून तुमच्या सोबत होते की तुम्ही विधान भवन येथे गेल्यावर तेथे पूर्वीपासून होते.उत्तर- हॉटेल प्रेसिडेंटकडून विधानभवनाकडे जाताना मी एकटाच होतो. विधानभवनात पोहोचल्यावर दीपक केसरकर तेथे मला भेटले. परंतु माझ्यासोबत ते हॉटेल ला होते आणि ते मला थेट विधानभवनात भेटले.
  • 05:31 PM • 12 Dec 2023

    विश्वास दर्शक ठरावाच्या मतदानाच्या वेळेस काय घडलं?

    देवदत्त कामत- विश्वास दर्शक ठरावाच्या मतदानाच्या वेळी काय झाले ते सांगा?उत्तर : मतदानाच्या दिवशी आम्ही 40 आमदारानी मतदान केले परंतु आमच्यातील उर्वरित 15 आमदारांनी मतदान केले नाही. म्हणून त्यांना अपात्र करण्यासाठी ही याचिका आम्ही दाखल केली आहे.देवदत्त कामत- 4 जुलै 2022 रोजी आपण ज्यावेळी हॉटेल प्रेसिडेंट मध्ये गेले त्यावेळी 40 आमदार तिथे अगोदर पासून राहत होते का?उत्तर- आम्ही सर्व 40 आमदार तिथे होतो. चार तारखेची निवडणूक असल्यामुळे आम्ही 40 आमदार तेथे होतो.
  • 05:08 PM • 12 Dec 2023

    गोगावलेंनी व्हीप कसा पाठवला, पुराव्यावरून वाद

    देवदत्त कामत - व्हीप मोबाईल वरून कसा पाठवला याबाबत सांगा?भरत गोगावले - व्हीप मी माझ्या मोबाईलवरील व्हॉट्सअप वरून पाठवले. आता तो फोन माझ्यासोबत आहे. आपण पाहिजे असेल, तर माझा मोबाईल चेक करू शकता.देवदत्त कामत- अगदी शेवटच्या दिवशी हे नवीन कागदपत्रे दाखवत आहेत, हे योग्य नाही. शपथपत्रामध्ये काही वेगळे कागद आणि इकडे आता शेवटच्या दिवशी हे पाठवणं योग्य नाही. आम्हाला यावर आक्षेप आहे.साखरे (शिंदे गटाचे वकील) - आम्ही पाहिजे असल्यास पेन ड्राईव्हमध्ये उपलब्ध करू.देवदत्त कामत- अगदी शेवटच्या दिवशी हे व्हॉट्सअपवरून व्हीप पाठवला याबाबत पुरावे दाखवत आहे, हे बरोबर नाही.
  • 04:37 PM • 12 Dec 2023

    भरत गोगावलेंची उलटतपासणी सुरू...

    प्रश्न - तुम्हाला तुम्ही बजावलेल्या व्हीप बाबत काय सांगायचे आहे?भरत गोगावले - मी प्रेसिडेंट हॉटेल या ठिकाणी आमच्या सहीचे पत्र आमदारांना देण्यासाठी गेलो. शिवसेनेच्या 55 आमदारांपैकी 40 आमदार त्या ठिकाणी उपस्थित होते. त्यांना मी चार तारखेच्या निवडणुकीसंदर्भातील व्हीप बजवला. 55 पैकी 15 आमदार तिकडे हजर नव्हते. उर्वरित पंधरा आमदारांना मी माझ्या मोबाईलवरून माझ्या व्हाट्सअप द्वारे व्हीप पाठवला. त्यानंतर विधान भवनामध्ये जाऊन आमदारांचे कागदपत्र ठेवण्यासाठी असलेल्या बॉक्समध्ये अध्यक्षांच्या परवानगीने पंधरा आमदारांचे कागदपत्र त्यांच्या त्यांच्या बॉक्समध्ये ठेवून दिले. अशाप्रकारे आम्ही त्यांना व्हीप बजावला.
  • 04:34 PM • 12 Dec 2023

    गोगावलेंचा व्हीप, केसरकरांचं उत्तर

    प्रश्न - गोगावलेंचा व्हीप वाचताना तुम्ही कुठल्या आमदारांला पाहिले आहे का?दीपक केसरकर- मला माहिती नाही.
  • 04:28 PM • 12 Dec 2023

    मला कोणताही व्हीप मिळालेला नाही -केसरकर

    प्रश्न - तुमच्या कृतीने तुम्ही स्वेच्छेने शिवसेनेच्या राजकीय पक्षाचे सदस्यत्व सोडून भारतीय राज्यघटनेच्या 10 व्या अनुसूचीनुसार तुम्ही अपात्रता ओढवून घेतली आहे आणि विधासभा अध्यक्ष निवड आणि बहुमत चाचणी व्हीपचे पालन न करून नाराजी ओढवून घेतली.दीपक केसरकर - आम्ही शिवसेनेचे सदस्यत्व सोडले नाही, हे चुकीचे आहे. आम्ही अजूनही शिवसेनेचेच आहोत. मला सुनील प्रभूंकडून कोणताही व्हीप मिळालेला नाही. 4 जुलै 2022 रोजी विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत भरत मारुती गोगावले यांच्याकडून एक व्हिप मिळाला. ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी महाराष्ट्रात अधिवेशन आहे. एक निवडणूक वगळता, अध्यक्षपदासाठीच्या सर्व निवडणुका जेथे सभापती पदाच्या विरोधात असेल त्या अराजकीय असतात, त्यामुळे संसद आणि विधानसभेच्या राष्ट्रपती निवडणुकीप्रमाणेच या पदासाठी महाराष्ट्रातही व्हिप जारी केला जात नाही. त्यामुळे मी माझ्या विवेकबुद्धीनुसार मतदान केले आहे.
  • 04:19 PM • 12 Dec 2023

    आमचा शिवसेना बाळासाहेब वेगळा गट असेल, केसरकर म्हणाले...

    प्रश्न - स्थानिक कार्यकर्ते आणि शिवसेना आमदार कुठे धमक्या देत होते?दीपक केसरकर - मला माहिती नाही.प्रश्न - स्थानिक कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरेंना काही धमक्या दिल्या का?दीपक केसरकर - मला असे वाटते की हे शिवसेनेचे कार्यकर्ते होते. कारण ज्यावेळी आम्ही सेंट रेजिस हॉटेलला पोहोचलो त्यावेळी त्यांनी आदित्य ठाकरे यांचे स्वागत केले. त्यामुळे त्यांनी उद्धव ठाकरे यांना धमकी दिली असे मला वाटत नाही.प्रश्न - शिवसेना पक्षाचे कार्यकर्ते हाच शिवसेनेच्या राजकीय पक्षाचा पाया आहे, हे बरोबर आहे का?दीपक केसरकर - होय.प्रश्न - kesarkardeepak@gmail.com हा तुमचा ईमेल आहे का?दीपक केसरकर - हा माझा ईमेल अॅड्रेस आहे, मात्र मी तो वापरत नाही.प्रश्न - त्या मुलाखतीत तुम्ही "शिवसेना बाळासाहेब" या नावाने आमचा वेगळा गट असेल, आमच्याकडे आमच्या नेत्याचे कार्यालय असेल आणि पक्षाप्रमाणेच इतर सर्व काही असेल, असे तुम्ही म्हटले होते. ते बरोबर आहे का?दीपक केसरकर - हा चुकीचा अर्थ लावला आहे आणि त्यामुळे खोटा आहे.प्रश्न - तुम्हाला शिवसेना राजकीय पक्षापासून वेगळे व्हायचे होते आणि वेगळा राजकीय पक्ष बनवायचा होता आणि त्यामुळेच तुम्ही म्हणलेला की आमचा वेगळा गट शिवसेना बाळासाहेब असेल, हे बरोबर आहे का?दीपक केसरकर - आम्ही कधीही पक्ष सोडला नाही. गरज भासल्यास मी माझ्या व्हिडिओ क्लिप सादर करू शकतो ज्यामध्ये आम्ही शिवसेना पक्षात आहोत. याबाबत वेगवेगळे मतप्रवाह आहेत याचा अर्थ आपण पक्षातून बाहेर पडू असा होत नाही. खरे तर मी उद्धव ठाकरे यांना आवाहन केले होते की, जर आम्हाला योग्य संरक्षण दिले गेले तर शिवसेनेच्या मूळ विचारसरणीनुसार आम्ही मुंबईत परत यायला तयार आहोत. त्यामुळे पक्ष सोडायण्याचा प्रश्नच नाही. मी सर्व आमदारांच्या वतीने बोलत होतो. ज्यात मी स्पष्टपणे नमूद केले आहे की, आम्ही शिवसेना पक्षाचे सदस्य आहोत आणि आम्ही पक्ष सोडलेला नाही. तुम्ही मागितल्यास मी व्हिडिओ क्लिप सादर करू शकतो.
  • 04:06 PM • 12 Dec 2023

    दीपक केसरकरांनी सांगितला हल्ल्याचा प्रसंग

    प्रश्न- सुनील प्रभू यांना उद्देशून लिहिलेले हे पत्र तुमचे आहे का?दीपक केसरकर - होय.प्रश्न - या पत्राला अनुसरून तुम्ही सुद्धा 22 जून 2022 च्या सभेला उपस्थित राहण्यास नकार दिला, हे बरोबर आहे का?दीपक केसरकर - 21 जून 2022 रोजी झालेल्या बैठकीलला उपस्थित राहिल्यानंतर मी आधी सांगितल्याप्रमाणे उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती, मग निघून गेलो आणि नंतर आदित्य ठाकरेंसोबत हॉटेल सेंट रेडगिसमध्ये गेलो. हॉटेलवर पोहोचल्यानंतर मी आदित्य ठाकरे यांना सांगितले की माझ्या पत्नीची तब्येत बरी नाही. तिथे तिच्यासोबत कुणी नाही. मला माझ्या निवासस्थानी परत जावे लागेल. जेव्हा मी माझ्या कारकडे गेलो तेव्हा माझ्या कारवर हल्ला झाला आणि काही स्थानिक कार्यकर्त्यांनी घेरले आणि कोणीतरी हस्तक्षेप केल्यानंतर त्यांनी माझी कार जाऊ दिली. पण माझ्या मागे दोन गाड्या होत्या आणि त्या गाड्या माझ्या राहत्या घराजवळ पार्क केल्या होत्या. मी अनिल देसाई यांना फोन केला आणि त्यांना सांगितले की त्या गाड्या तिथून हटवा. मला सुरक्षित वाटत नाही आणि त्या गाड्या त्याच ठिकाणी राहिल्या तरी मला माझी काम पार पाडताना सुरक्षित वाटणार नाही. मी पत्रकार परिषद बोलावतो आणि त्यांना या घटनेबद्दल सांगतो. माझ्या पत्नीवर नर्व्हस ब्रेकडाउनसाठी उपचार केले जात होते आणि या घटनेने तिच्या तब्येतीवर खूप विपरीत परिणाम झाला. अशा परिस्थितीत, मला सुनील प्रभू यांचे एक पत्र प्राप्त झाले ज्यांनी मला शिवसेना विधिमंडळ पक्षाच्या बैठकीस उपस्थित राहण्यास सांगितले. हे पत्र सुनील प्रभू यांच्यापर्यंत पोहोचवण्यास माझ्या माणसाला सांगितले. माझ्या पत्राचे कोणतेही उत्तर आले नाही किंवा मला वर्षापर्यंत सुरक्षितपणे नेण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडून संरक्षण दिले गेले नाही.
  • 03:58 PM • 12 Dec 2023

    गुवाहाटीचा खर्च विचारताच, केसरकरांची उडाली भंबेरी

    प्रश्न - तुम्ही जून 2022 मध्ये गुवाहाटीला कधी गेला होता?दीपक केसरकर - मला नेमकी तारीख आठवत नाही, पण 23, 24 रोजी 2022 दरम्यान गुवाहाटीला गेलो.प्रश्न- तुम्ही राहण्याचा आणि गुवाहाटीचा खर्च स्वतः केला का?दीपक केसरकर - ही माझी वैयक्तिक माहिती असल्याने मी ती उघड करू इच्छित नाही.प्रश्न - तुम्ही गुवाहाटीला चार्टर्ड फ्लाइटने गेला होता का?दीपक केसरकर - ही माझी वैयक्तिक माहिती आहे आणि ती मी उघड करू इच्छित नाही.प्रश्न - लोकप्रतिनिधी असताना प्रवासाचा महत्त्वाचा तपशील लपवून तुम्ही प्रवास करत होता आणि मुक्काम तिसऱ्या व्यक्तीकडून प्रायोजित होता, हे बरोबर आहे का?दीपक केसरकर - हे खोट आहे.प्रश्न - 2019 च्या विधानसभा निवडणुकीसाठी तुमच्या A आणि B फॉर्मवर कोणी स्वाक्षरी केली होती?दीपक केसरकर - मला आठवत नाही.प्रश्न - शिवसेना राजकीय पक्षाचे अधिकृत प्रतिनिधी म्हणून अनुक्रमे सुभाष देसाई आणि अनिल देसाई यांनी ए आणि बी फॉर्मवर सही केली होती.दीपक केसरकर - मला आठवत नाही.प्रश्न - या तुमच्या सह्या आहेत का?दीपक केसरकर - मी 21 तारखेला कोणत्याही कागदावर माझी सही केली नाही.यावरून दोन्ही वकिलांमध्ये खडाजंगी , अखेर मराठी मध्ये सांगतो असे केसरकर म्हणाले.त्यानंत दीपक केसरकर - स्वाक्षरी माझी आहे, परंतु पक्षाची विविध कागदपत्रांवर स्वाक्षरी घेण्याची पद्धत आहे आणि सहसा संख्या सारखीच असते. कारण सहसा ते नावांसह प्री प्रिंटेड पेपर असतात. पेपरमध्ये शिवसेना मंडळ पक्ष, विधानसभेच्या सदस्यांची यादी आणि कागदाच्या वरच्या बाजूला हस्ताक्षरात पक्षादेश असे लिहिलेले असते, ही कोणत्याही पक्षात नेहमीची प्रथा आहे, जेव्हा व्हीपचा मुद्दा टाईप केला जातो आणि व्हिपची प्रत सदस्याला दिली जाते आणि पोचपावती त्याच मूळ कागदावर घेतली जाते जेणेकरून कोणीही पूर्वीच्या कागदावर हाताने लिहून सही करू शकेल.
  • 03:50 PM • 12 Dec 2023

    एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री होण्यात रस नव्हता तर राज्यपालांना ठराव का पाठवला?

    प्रश्न- अयोध्येला जाहीरपणे भेट देणारे आणि महाराष्ट्रातील काँग्रेसच्या विद्यमान आमदारासोबत बसणारे उद्धव ठाकरे हे पहिले मुख्यमंत्री आहेत, हे बरोबर आहे का?दीपक केसरकर - मला माहिती नाही.प्रश्न - महाराष्ट्रातील विशेषत: 10 प्राचीन मंदिरांना निधी देण्याचा धोरणात्मक निर्णय ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना घेतला होता, हे बरोबर आहे का?दीपक केसरकर - मला माहिती नाही.प्रश्न - मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांनी एमआयडीसीच्या धोरणानुसार स्थानिकांना 80 टक्के नोकऱ्या दिल्या, हे योग्य आहे का?दीपक केसरकर - मला माहिती नाही.प्रश्न - मुख्यमंत्री या नात्याने उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेची विचारधारा आणि विशेषत: मराठी माणूस आणि मराठी भाषेची अस्मिता जपण्याचे धोरण हाती घेतले, हे बरोबर आहे का?दीपक केसरकर - मराठीच्या विकासासाठी काम करणाऱ्या चार महामंडळांना नवी मुंबईत स्थलांतरित करण्याचा निर्णय मराठी भाषा विभागाकडून घेण्यात आला होता. नवीन सरकार (सध्याचे सरकार) स्थापन झाल्यानंतर हा निर्णय बदलण्यात आला आणि मराठी भाषा विभागाशी संबंधित सर्व कार्यालये आता मुंबईत सामावून घेतली जात आहेत. त्यासाठी मुंबईत नवीन आधुनिक इमारतीला मंजुरी देण्यात आली आहे.प्रश्न - जर एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री होण्यात रस नव्हता, तर हा ठराव राज्यपालांकडे का पाठवला गेला?दीपक केसरकर - एकनाथराव संभाजी शिंदे यांची महाराष्ट्र शिवसेना विधिमंडळ पक्षनेतेपदी नियुक्ती झाल्याची पुष्टी या ठरावाने केली.प्रश्न - 21 जून 2022 चा हा ठराव मुख्य आधार होता, ज्याच्या आधारावर राज्यपालांनी 30.6.22 रोजी बहुमत चाचणी घेण्याचे निर्देश दिले होते, हे बरोबर आहे का?दीपक केसरकर - मला माहिती नाही.प्रश्न - 21 जून 2022 रोजी राज्यपालांना पाठवलेल्या ठरावामुळे राज्यपालांचे असे मत बनले की, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने शिवसेना आमदारांचा पाठिंबा गमावला आहे, हे बरोबर आहे का?दीपक केसरकर - ते बरोबर नाही.
  • 03:41 PM • 12 Dec 2023

    विश्वासदर्शक ठरावावेळी उद्धव ठाकरेंना पाठिंबा दिला, कारण...

    प्रश्न- तुमच्यासह शिवसेनेच्या सर्व आमदारांनी 30/11/2019 रोजी विश्वासदर्शक ठराव मांडताना महाविकास आघाडीचा भाग म्हणून उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाला मान्यता असल्याचे औपचारिकपणे जाहीर केले होते, हे बरोबर आहे का?दीपक केसरकर - आम्ही आमची संमती व्यक्त केली कारण उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले होते, विशेषत: काँग्रेसच्या विरोधात भावना होती. त्यांनी पाठिंब्याचे पत्र राज्यपालांना न दिल्यामुळे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागली.(काँग्रेस पक्षाने आग्रह केल्यानंतर शिवसेनेच्या घटनेमध्ये लिहिलेले अध्याय धोरणांचा त्याग करून ज्यामध्ये हिंदू संस्कृतीची पाठराखण करणे , कॉमन सिविल कोड, मराठी स्थानिक मराठी माणसाच्या सोबत उभे राहणे याला तिलांजली देऊन किमान समान कार्यक्रम तयार करण्यात आला. ज्या बातम्या आम्ही वृत्तपत्रांमधून वाचल्या किंवा अनेक लोकांनी आम्हाला सांगितले त्याप्रमाणे कॉमन मीनिमम प्रोग्रामवर सही केल्यानंतरच काँग्रेसने आपला पाठिंबा शिवसेनेला दिला. त्यामुळे आम्ही जरी उद्धवजींच्या सरकारला पाठिंबा दिला असला, तरी या धोरणांना आमचा पाठिंबा नव्हता किंवा पक्षाच्या घटनेमध्ये जे लिहिलेले आहे,त्या ध्येय धोरणांच्या विरोधात जात असताना प्रतिनिधी सभेचे आयोजन करून त्याला संमती देखील घेण्यात आली नव्हती. )
  • 03:30 PM • 12 Dec 2023

    एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा, पण...; केसरकरांनी उलटतपासणी काय सांगितलं?

    प्रश्न- सुरतला जाण्यापूर्वी मला मुख्यमंत्री व्हायचे नाही, हे शिंदे तुम्हाला सांगू शकत नव्हते का?दीपक केसरकर - ही महाविकास आघाडी होत असताना एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपदाचे आश्वासन देण्यात आले होते. त्यामुळे त्यांनी मला मुख्यमंत्री व्हायचे नाही, असे कितीतरी वेळा सांगितले आणि त्यांनी उद्धव ठाकरेंना पाठिंबा दिला, पण महाराष्ट्रातील अनैसर्गिक आघाडी शिवसेनेच्या हिताची नव्हती.प्रश्न- मुख्यमंत्रीपद कुणी आणि कधी ठरवला?दीपक केसरकर - बाळासाहेब ठाकरे यांच्यासारख्या शिवसेनेचे नेतृत्व व्यक्तीचं देशात वेगळं उदाहरण आहे की, त्यांचा पक्ष सत्तेत आला, पण त्यांनी मुख्यमंत्रिपद स्वीकारले नाही. अशी शिवसेनेत नेहमीची प्रथा आहे. हे शिवसेनेतील सर्वच आमदारांना माहीत आहे. त्यामुळे मुंबईत वाटाघाटी सुरू असताना मीडियात त्या काळात असे येत होते की, उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री व्हायचे नाही आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत, अशी त्यांची इच्छा होती. पण शरद पवारांनी त्यांना पटवून दिले की काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे काही आमदार आहेत, जे यापूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्यामुळे तुम्ही मुख्यमंत्रिपद स्वीकारले पाहिजे.प्रश्न- 30/11/2019 रोजी आलेल्या विश्वासदर्शक ठरावात तुम्ही आणि इतर शिवसेनेच्या आमदारांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या विश्वासदर्शक ठरावाच्या बाजूने मतदान केले, हे बरोबर आहे का?दीपक केसरकर - होय.
  • 02:36 PM • 12 Dec 2023

    एकनाथ शिंदेंच्या डोळ्यात अश्रू आले - दीपक केसरकर

    प्रश्न- मुख्यमंत्री व्हायचे नाही, हे शिंदे यांनी तुम्हाला कधी सांगितले?दीपक केसरकर - त्याला मुख्यमंत्र्यांना भेटायचे होते आणि त्यावेळीच त्यांनी हे मला सांगितले.प्रश्न - मुख्यमंत्रिपदात रस नसल्याचे त्यांनी तुम्हाला सांगितले होते का?दीपक केसरकर - उद्धव ठाकरे यांच्याशी बोलत असताना त्यांनीच आम्हाला सांगितले की, शिंदे जेव्हा त्यांना तिथे भेटले, तेव्हा त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. त्यांनी स्पष्टपणे सांगितले केले की, त्यांना मुख्यमंत्री व्हायचे नाही. त्यांचा मुख्यमंत्र्यांना (उद्धव ठाकरे) पाठिंबा आहे, पण महाविकास आघाडीला नाही. ही बातमी माध्यमांमध्ये देखील आलेली आहे.प्रश्न - तुमच्या प्रश्न क्रमांक 44 च्या उत्तरात आणि प्रश्न क्रमांक 47 च्या उत्तरात स्पष्ट विरोधाभास आहे. तुम्ही म्हणालात की, तुम्हाला आणि इतरांना शिंदे यांनी सांगितलं की त्यांना मुख्यमंत्री होण्यात स्वारस्य नाही. पण प्रश्न क्रमांक 47 च्या उत्तरात तुम्ही म्हणता एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री व्हायचे नव्हते, असे ठाकरेंनी तुम्हाला सांगितले.दीपक केसरकर - जेव्हा आम्ही सांगितले की त्यांना मुख्यमंत्री व्हायचं नाही, पण ते पक्षासोबत ठाम आहेत. उद्धवसाहेबांनी उत्तर दिले की, शिंदे यांनी त्यांना भेटून तेच सांगितले आहे. त्यामुळे त्यांना वस्तुस्थिती माहिती होती आणि म्हणूनच त्यांनी मिलिंद नार्वेकर, रवींद्र फाटकांना सुरतला भेटायला पाठवत आहे.
  • 02:20 PM • 12 Dec 2023

    आदित्य ठाकरेंसह ठाकरे गटाचे नेते सुनावणीला हजर

    दीपक केसरकर यांची सुनावणी सुरू झाली. या सुनावणीला आदित्य ठाकरे यांच्यासह शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते अनिल देसाई, अनिल परब, रवींद्र वायकर, सुनील राऊत, शिरीष चौधरी, भास्कर जाधव हे नेतेही उपस्थित आहेत.
  • 01:19 PM • 12 Dec 2023

    तुम्ही खोटं बोललात हे खरं आहे का?, ठाकरेंच्या वकिलाचा सवाल

    प्रश्न - शिवसेना राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक 25 जून 2022 रोजी शिवसेना भवन येथे बोलावण्यात आली आणि उद्धव ठाकरे यांना पाठिंबा देत असल्याचा ठराव मंजूर करण्यात आला, हे बरोबर आहे का?राहुल शेवाळे - नाही. हे चुकीचे आहे.प्रश्न - तुम्ही 5 जुलै 2022 रोजी ठाकरे यांना पत्र लिहून शिवसेना खासदारांना राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत द्रौपदी मुर्मू यांच्या बाजूने मतदान करण्याचे निर्देश द्यावेत, अशी विनंती केली होती का?राहुल शेवाळे - हो.प्रश्न - ते पत्र तुम्ही पाठवलं होतं का?राहुल शेवाळे - हो.प्रश्न - ते पत्रही मी पुढे ठेवत आहे. तुम्ही खोटं बोललात ते खरं आहे का?राहुल शेवाळे - नाही. कधीच नाही.
  • 01:18 PM • 12 Dec 2023

    शिवसेना भवनात राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक... शेवाळेंनी काय दिले उत्तर?

    प्रश्न - तर 26 जुलै 2022 च्या कथित दुरुस्तीनुपूर्वीपर्यंत पक्षाध्यक्षांचे सर्वाधिकार आणि कर्तव्ये उद्धव ठाकरे यांच्याकडे होते, हे बरोबर आहे का?राहुल शेवाळे - मला माहिती नाही.प्रश्न - तुमच्या मुख्य उलटतपासणीत नमूद केले की, 25 जून 2022 रोजी शिवसेना भवनात होतात. परंतु त्या दिवशी कोणताही ठराव पास झाला नाही. 25 जून 2022 रोजी शिवसेना भवन येथे राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झाली होती, याची तुम्हाला माहिती आहे का?राहुल शेवाळे - नाही.प्रश्न - तुम्हाला माहिती आहे का, त्यावेळी वृत्तपत्रानांनी वृत्त दिले होते की, उद्धव ठाकरे यांनी 25 जून 2022 रोजी राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक बोलावली होती.राहुल शेवाळे - नाही.राहुल शेवाळेंना 24 जून 2022 रोजी इंडिया टुडेमध्ये प्रसिद्ध झालेले वृत्त दाखवण्यात आले. त्याचा मथळा होता 'उद्धव ठाकरे शरद पवारांना भेटले, शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची उद्या बोलावली बैठक'राहुल शेवाळे - माझ्या वाचण्यात आले नाही.
  • 01:17 PM • 12 Dec 2023

    उद्धव ठाकरे आजही शिवसेनेचे पक्षप्रमुख आहेत का? शेवाळे म्हणाले...

    प्रश्न - जुलै 2022 मध्ये जी दुरुस्ती करण्यात आली होती, ती घटना 2018 होती, हे बरोबर आहे का?राहुल शेवाळे - मला माहिती नाही.प्रश्न - अपात्र याचिकेतील सर्व प्रतिवादींना 2018 मधील शिवसेना घटना दुरुस्तीची माहिती होती, हे बरोबर आहे का?या प्रश्नावरून दोन्ही गटाच्या वकिलांमध्ये जोरदार खडाजंगी.राहुल शेवाळे - नाही. हे चुकीचे आहे.प्रश्न - जुलै 2022 मध्ये करण्यात आलेल्या कथित घटना दुरुस्तीनुसार आजही उद्धव ठाकरेच पक्षप्रमुख आहे, हे बरोबर आहे का?राहुल शेवाळे - मला माहिती नाही.
  • 01:16 PM • 12 Dec 2023

    जुलै 2022 च्या प्रतिनिधी सभेवरून शेवाळेंना प्रश्न

    राहुल शेवाळे - हो.प्रश्न - 18 जुलै 2022 रोजीच्या शिवसेना प्रतिनिधी सभेचे मिनिटस दस्ताऐवज आहेत, त्यात असं म्हटलेलं आहे की, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे बैठकीला अनुपस्थित होते म्हणून शिवसेना नेते एकनाथ शिंदेंना बैठकीच्या अध्यक्षास्थानी निमंत्रित केले होते, हे बरोबर आहे का?राहुल शेवाळे - हे. रेकॉर्डसाठी आहे.प्रश्न - उद्धव ठाकरेंच्या अनुपस्थितीत शिंदे बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवू शकतात, हे खरं आहे का?राहुल शेवाळे - हे. रेकॉर्डसाठी आहे.प्रश्न - 18 जुलै 2022 रोजी झालेल्या प्रतिनिधी सभेच्या कथित बैठकीत त्यावेळची राष्ट्रीय कार्यकारिणी तत्काळ बरखास्त करण्याचा निर्णय घेण्यात आला. हे बरोबर आहे का?राहुल शेवाळे - मला माहिती नाही.
  • 10:56 AM • 12 Dec 2023

    आदित्य ठाकरेंचे नेता म्हणून निवड झाल्याबद्दल अभिनंदन का केले?

    प्रश्न - (पुन्हा ते ट्विट दाखवण्यात आलं.) "23 जानेवारी 2018 रोजी युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचे शिवसेना नेते पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन." आदित्य ठाकरेंची निवड झाली म्हणून तुम्ही ट्विट का केले?राहुल शेवाळे - मला आठवत नाही.प्रश्न - तुम्ही या सुनावणीत खोटं सांगत आहात की 23 जानेवारी 2018 रोजी कोणतीही संघटनात्मक निवडणूक झाली नाही, हे बरोबर आहे का?राहुल शेवाळे - नाही. हे चुकीचे आहे.प्रश्न - कागदपत्रामध्ये म्हटल्याप्रमाणे 18 जुलै 2022 रोजी प्रतिनिधी सभेने नवीन राष्ट्रीय कार्यकारिणीला पक्षाच्या घटनेत दुरुस्ती करण्याबद्दल चर्चा करून निर्णय घ्यावा असे निर्देश दिले होते, हे खरं आहे का?राहुल शेवाळे - हो.
  • 10:38 AM • 12 Dec 2023

    आदित्य ठाकरेंबद्दल ट्विट, शेवाळेंना ठाकरेंच्या वकिलांनी पकडलं खिंडीत

    प्रश्न - तुम्ही एक्सवर (पूर्वीचे नाव ट्विटर) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फॉलो करता?राहुल शेवाळे - हो.प्रश्न - राहुल शेवाळे (@Shewale _rahul) हे ट्विटर खाते पंतप्रधान नरेंद्र मोदींही फॉलो करतात, हे बरोबर आहे का?राहुल शेवाळे - मला आठवत नाही.प्रश्न - 23 जानेवारी 2018 रोजी आदित्य ठाकरे यांची प्रतिनिधी सभेकडून संघटनेत नेते म्हणून निवड करण्यात आली. हे बरोबर आहे का?राहुल शेवाळे - नाही. हे चुकीचे आहे.राहुल शेवाळेंना 23 जानेवारी 2018 रोजी करण्यात आलेले ट्विट दाखवण्यात आले, ज्यात त्यांनी शिवसेना नेता म्हणून निवड झाल्याबद्दल आदित्य ठाकरे यांचे अभिनंदन केलेले आहे.राहुल शेवाळे - नाही. हे चुकीचे आहे. आम्ही असं मानतो की ठाकरे कुटुंबातील सर्व लोक नेते आहेत आणि आदर व्यक्त करण्यासाठी आम्ही त्यांना नेता म्हणतो.
  • 10:26 AM • 12 Dec 2023

    1999 च्या घटनेत 2022 मध्ये दुरुस्ती -शेवाळे

    प्रश्न - मग जुलै 2022 मध्ये 2018 च्या घटनेत दुरुस्ती करण्यात आली की 1999 च्या घटनेत?राहुल शेवाळे - ती 1999 घटना होती, जिच्यात जुलै 2022 मध्ये दुरुस्ती करण्यात आली.
  • 10:23 AM • 12 Dec 2023

    युवा सेना प्रमुख पदाबद्दल राहुल शेवाळेंनी काय सांगितलं?

    प्रश्न - तर तुमच्या मते 1999 ते जुलै 2022 पर्यंत पक्षाच्या घटनेत कोणतीही दुरुस्ती करण्यात आलेली नाही?राहुल शेवाळे - हो.प्रश्न - 2018 मध्ये करण्यात आलेल्या घटना दुरुस्तीबद्दल तुम्हाला कधी माहिती मिळाली?राहुल शेवाळे - मला आठवत नाही.प्रश्न - जुलै 2022 मध्ये घटना दुरुस्ती करण्यात आली, तेव्हा तुम्हाला 2018 मध्ये करण्यात आलेल्या घटना दुरुस्तीबद्दल माहिती होतं का?राहुल शेवाळे - मला आठवत नाही.प्रश्न - शिवसेनेच्या घटनेत युवा सेना प्रमुख पदाबद्दल तुम्हाला माहिती आहे का?राहुल शेवाळे - युवा सेना प्रमुख पद असल्याची मला माहिती आहे, पण ते शिवसेनेच्या घटनेत आहे की नाही याबद्दल मला माहिती नाही.
  • 10:17 AM • 12 Dec 2023

    निवडणुकीचे निकष काय? शेवाळेंना सवाल

    प्रश्न - बाळासाहेब हयात असताना 1999 ते 2012 या काळात शिवसेनेत संघटनात्मक निवडणुका निवडणूक निकषांनुसार झाल्या, त्या बरोबर आहेत का?राहुल शेवाळे - नाही.प्रश्न - 2012 नंतर 2013 आणि 2018 मध्ये ज्या संघटनात्मक निवडणुका झाल्या, त्या निकषांनुसार झाल्या?राहुल शेवाळे - नाही.प्रश्न - तुम्ही निवडणूक निकषांबद्दल बोलत आहात, त्याबद्दल सविस्तर सांगू शकता का?राहुल शेवाळे - हा रेकॉर्डचा भाग आहे.
  • 10:08 AM • 12 Dec 2023

    शिवसेनेत संघटनात्मक निवडणुूका झाल्या की नाही? शेवाळे म्हणाले...

    प्रश्न - म्हणजे 1999 नंतर कोणतीही संघटनात्मक निवडणूक झाली नाही, बरोबर?राहुल शेवाळे - हो. निवडणूक आयोगाच्या निकषांनुसार कोणतीही निवडणूक झाली नाही.प्रश्न - 1999 ते 2012 दरम्यान संघटनात्मक निवडणुका आयोगाच्या निकषांप्रमाण झाल्या की नाही?राहुल शेवाळे - 1999 ते 2012 कालावधीमध्ये निवडणूक आयोगाच्या नॉर्म नुसार कुठल्याही निवडणूका झाल्या नाही.
  • 10:03 AM • 12 Dec 2023

    शिवसेनेत संघटनात्मक निवडणुका झाल्या नाही का? - कामत

    प्रश्न - तुम्ही चुकीचं सांगताहेत की, 1999 नंतर जेव्हा बाळासाहेब हयात होते आणि त्यांच्यानंतर पक्षात कोणतीही निवडणूक नाही झाली, हे बरोबर आहे का?राहुल शेवाळे. नाही. हे चुकीचे आहे.
  • 09:59 AM • 12 Dec 2023

    प्रश्न - 1999 नंतर शिवसेनेच्या घटनेत दुरुस्ती झाली काही नाही, याबद्दल सांगू शकता का?

    राहुल शेवाळे - 1999 ला माननीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कॉन्स्टिट्यूशन तयार केली होती. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार कॉन्स्टिट्यूशन तयार केली होती. त्यानंतर ती कॉन्स्टिट्यूशन फॉलो केली गेली नव्हती आणि म्हणून जुलै 2022 ला मुख्य नेत्याची अमेंडमेंट ही निवडणूक आयोगाच्या नियमानुसार केली गेली.
  • 09:59 AM • 12 Dec 2023

    प्रश्न- घटनेचं पालन केलं जात नव्हतं असं तुम्हाला म्हणायचं आहे का?

    राहुल शेवाळे - कॉन्स्टिट्यूशनच्या नियमानुसार राष्ट्रीय कार्यकारणी आणि प्रतिनिधी सभा घ्यावयास पाहिजे होती, परंतु दुर्दैवाने त्या बैठका झाल्या नाहीत. पक्षांतर्गत कुठल्याही निवडणुका पण झाल्या नाही.
follow whatsapp

ADVERTISEMENT