Uddhav Thackeray : शिवडी मतदार संघाचा वाद मिटला! ठाकरेंनी 'या' नेत्याला दिली उमेदवारी

मुंबई तक

Shivadi Assembly Constituency : उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना युबीटीने बुधवारी 65 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. मात्र ठाकरेंचा बालेकिल्ला असलेल्या शिवडी मतदार संघाची उमेदवारी राखून ठेवण्यात आली होती. कारण या जागेवर विद्यमान आमदार अजय चौधरी आणि सुधीर साळवी असे दोन उमेदवार इच्छूक होते.

ADVERTISEMENT

ठाकरेंनी शिवडीतून 'या' नेत्याला दिली उमेदवारी
maharashtra assembly election 2024 uddhav thackeray declare candidate for shivadi assembly constituency ajay choudhari maharashta politis
social share
google news

बातम्या हायलाइट

point

शिवडीचा तिढा सुटला

point

उमेदवारीची माळ अजय चौधरी यांच्या गळ्यात

point

उमेदवारी जाहीर होताच चौधरी समर्थकांचा जल्लोष

Uddhav Thackeray, Shivadi Assembly Constituency : उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना युबीटीने बुधवारी 65 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. मात्र ठाकरेंचा बालेकिल्ला असलेल्या शिवडी मतदार संघाची उमेदवारी राखून ठेवण्यात आली होती. कारण या जागेवर विद्यमान आमदार अजय चौधरी आणि सुधीर साळवी असे दोन उमेदवार इच्छूक होते. त्यामुळे मोठा तिढा निर्माण झाला होता. अखेर हा तिढा ठाकरेंनी सोडवला असून शिवडी मतदार संघासाठीची उमेदवारीची माळ अजय चौधरी यांच्या गळ्यात घातली आहे.  त्यामुळे अजय चौधरी यांना उमेदवारी जाहीर होताच चौधरी समर्थकांनी जल्लोष केला आहे.( maharashtra assembly election 2024 uddhav thackeray declare candidate for shivadi assembly constituency ajay choudhari maharashta politis) 

शिवडी मतदार संघातून विद्यमान अजय चौधरी आणि विभाग संघटक सुधीर साळवी हे इच्छूक होते. या जागेवर कुणाला उमेदवारी द्यायची यावरून पेच असल्याने पहिल्या यादीत शिवडी मतदार संघाचा समावेश नव्हता. त्यात आज उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर बैठक घेतली होती. या बैठकीला अजय चौधरी आणि सुधीर साळवी हे दोघेही उपस्थित होते. पण अजय चौधरी यांच्या उमेदवारीचा निर्णय घेतल्यानंतर सुधीर साळवी उद्धव ठाकरेंना नमस्कार करून बाहेर पडले होते. 

हे ही वाचा : Shiv Sena UBT Candidates List: उद्धव ठाकरेंचे शिलेदार ठरले, पहिली यादी जाहीर... कोणाकोणाची नावं?

संकटकाळात सर्वजण सोडून जात असताना अजय चौधरी माझ्यासोबत राहिले. त्यामुळे त्यांना पुन्हा संधी देत आहोत, असे उद्धव ठाकरेंनी बैठकीत जाहीर केले. त्यानंतर सुधीर साळवी यांनी उद्धव ठाकरेंना नमस्कार केला आणि ते मातोश्रीबाहेर पडले. त्यानंतर मी संघटनेशी एकनिष्ठ शिवेसैनिक म्हणून काम करणार आहे, असे त्यांनी एबीपीशी बोलताना सांगितले. 

पहिल्या यादीवर राऊत काय म्हणाले? 

महाविकास आघाडीची पत्रकार परिषद जाहीर होण्यापुर्वी ठाकरे गटाने त्यांची यादी जाहीर केली होती. या यादीबद्दल बोलताना राऊत म्हणाले की, शिवसेनेच्या मुख्यालयातील यादीमध्ये काही दुरूस्ती आहेत. करेक्शन आहेत, असे त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे जाहीर झालेल्या यादीतील काही जागांवर बदल होण्याची शक्यता आहे. 

तसेच पत्रकार जेव्हा जागावाटपाबद्द्ल प्रश्न विचारतात, आम्ही म्हणतो 288 जागा मुद्दा क्लिअर झाला तेव्हा आम्ही तो अत्यंत जबाबदारी म्हणतो, असे संजय राऊत म्हणतात. आता आमच्या पक्षाची चुकुन यादी आली आहे, त्यात शेकाप पक्षांच्या संबंधित जागा आहेत. त्यांच्याशी आमची चर्चा सूरू आहे. काही राष्ट्रवादी पक्षाची आणि काँग्रेस पक्षाच्या जागा आहेत, त्यांच्याशी आमची चर्चा सूरू आहे,असे देखील राऊत यांनी म्हटले आहे. त्यामुळे शिवसेना युबीटीने जाहीर केलेल्या यादीमुळे काहीसा संभ्रम निर्माण झाला आहे. 

हे ही वाचा : Shiv Sena Uddhav Thackeray : ठाकरेंनी 'या' नेत्यांना वाटले AB फॉर्म, कोण आहेत 38 उमेदवार?

हे वाचलं का?

    follow whatsapp