एका नवऱ्याच्या दोन बायका अन् त्यांचे कारनामे लय खतरनाक.. पार डोकं चक्रावून जाईल!
Crime News : एका पुरुषाच्या दोन पत्नींना पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्याखाली अटक केली आहे. जाणून घ्या नेमकं प्रकरण काय आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

दोन महिलांनी मिळून केली चोरी

एक लाखांहून अधिक दागिन्यांची चोरी
Crime News : एका घरात सवत असल्यानंतर दोन्ही महिलांचे खटके उडतात. यामुळे सवतींमध्ये अनेकदा वादही होतात. मात्र, राजस्थानातील झुंझुनू येथे दोन महिला अशा आहेत त्यांना चोरीच्या आरोपाखाली पोलिसांनी अटक केली आहे. कधीही न पटणाऱ्या या दोन्ही महिला चोऱ्या करत असल्याची घटना पोलिसांच्या तपासामुळे उघडकीस आली आहे. दोघी कशा काय एकाच वेळी चोरी करत असतील? असा प्रश्न उपस्थित राहिला.
हेही वाचा : महिलेला पाठवली फ्रेंड रिक्वेस्ट, नंतर व्हिडिओ कॉल करत दाखवू लागला गुप्तांग, रात्री 12 वाजता काय घडलं?
संबंधित आरोपी महिलांचे सावित्री (वय 30) आणि राजोदेवी (वय 40) अशी त्यांची नावे आहेत. तर महिलेच्या पतीचं शेर सिंह बावरिया असे नाव आहे. या दोन्ही महिला दागिन्यांची चोरी करायच्या. कोतवाली पोलिसांनी चोरीच्या प्रकरणात दोघींना अटक केली. त्या दोघींकडेही एक लाखाहून अधिक किंमतीचे दागिने असल्याची माहिती तपासातून समोर आली.
नेमकं काय घडलं?
दोघीही प्रवास करण्याच्या बहाण्याने रिक्षात बसायच्या आणि चोरी करायच्या. या महिलांबाबतची माहिती पोलिसांना मिळताच चोरीच्या गुन्ह्याचा तपास करण्यात आला. 11 एप्रिल रोजी मांडवा येथील भारू गावातील एका रहिवाशाने पोलीस ठाण्यात तक्रार चोरीची तक्रार दाखल केली.
झुंझुनू ज्वेलर्स शोरूममध्ये एका पतीने आपल्या पत्नीला एक लाख रुपयांचे दागिने खरेदी केल्याची माहिती दिली. दागिने खरेदी करून ते रिक्षात बसले, त्याचवेळी या दोघीही त्याच रिक्षात बसल्या. त्यानंतर दागिने खरेदी केलेली व्यक्ती खाली उतरली असता, त्याला आपल्या खरेदी केलेल्या बॅगची साखळी उघडी दिसली.