महिलेला पाठवली फ्रेंड रिक्वेस्ट, नंतर Video कॉल करत दाखवू लागला गुप्तांग, रात्री 12 वाजता काय घडलं?

मुंबई तक

Crime News : तरुणाने महिलेला व्हिडिओ कॉल करून गुप्तांग दाखवले. महिलेनं धडा करून पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

ADVERTISEMENT

प्रातिनिधिक फोटो, सौजन्य: Grok
प्रातिनिधिक फोटो, सौजन्य: Grok
social share
google news

बातम्या हायलाइट

point

महिलेला फोन करून गुप्तांग दाखवले

point

धक्कादायक प्रकार आला समोर

Crime News: बंगळुरूतील टी. दसरहल्ली येथे एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. महिला संघटनेची अध्यक्षा म्हणून 34 वर्षीय मेघना नावाच्या महिलेसोबत भयंकर घटना घडली आहे. रात्री 11.45 वाजता मेघनाच्या फेसबुकवर एक फ्रेंड रिक्वेस्ट आली होती. त्या फेसबुकच्या प्रोफाईल फोटोत तिच्या मैत्रिणीसारखाच फोटो असल्याचा मेघनाला गैरसमज झाला. तिनं फ्रेंड रिक्वेस्ट अॅक्सेप्ट केली आणि त्यानंतर लगेचच मेघनाला व्हिडिओ कॉल आला. मेघनानं व्हिडिओ कॉल उचलला आणि व्हिडिओ कॉलमध्ये एक तरुण नग्न अवस्थेत दिसत होता. 

हेही वाचा : तोंडाला काळं फासलेले प्रवीण गायकवाड नेेमके कोण आहेत?

मेघनाला तरुण पाठवत होता अश्लील फोटो

त्यावेळी मेघना घाबरून गेली आणि तिनं फोन कट केला. त्यानंतर तिने आपल्या पतीला रात्री उठवले आणि पतीकडे मोबाईल दिला. त्यानंतर फोन आला असता पतीने तो फोन घेतला तेव्हा नग्न अवस्थेत असलेल्या तरुण गप्प राहिला. अश्लील कृत्य करणारा तरुण इथवर न थांबता त्याने मेघनाला अश्लील फोटो पाठवले. त्यानंतर तिने सर्व फोटो डिलीट केले. 

नंतर मेघनाने अश्लील कृत्य करणाऱ्या तरुणाला फेसबुकवरून ब्लॉक केलं. मात्र, त्या व्यक्तीने आपल्या फेसबुकच्या प्रोफाईलवर मेघनाचा फोटो लावला. त्यानंतर 9003490931 या नंबरवरून तिला व्हॉट्सअॅपवर कॉल आणि मेसेज केले. त्यानंतर 9 जुलै रोजी त्याने पुन्हा मेघनाला फोन करून मेसेज केला. अंतिम क्षणी मेघनाने आपलं धाडस दाखवलं आणि पोलिसांकडे तक्रार दाखल केली. 

हेही वाचा : सांगलीत गुन्हेगाराचा दी एंड, एडक्याने आणि दगडाने ठेचून केली हत्या, नेमकं काय घडलं?

आरोपीवर गुन्हा दाखल

पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. आता पोलिस या प्रकरणाचा शोध घेत आहेत. तसेच तो व्यक्ती नेमका कुठला रहिवासी आहे. तो नेमकं काम काय करतो? यामागे नेमकं काही षड्यंत्र आहे का? अशा अनेक पडलेल्या प्रश्नांची उत्तरं पोलीस तपासातून मिळवतील. 
 

हे वाचलं का?

    follow whatsapp