तोंडाला काळं फासलेले प्रवीण गायकवाड नेेमके कोण आहेत?

मुंबई तक

Praveen Gaikwad : प्रवीण गायकवाड हे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांचा एकूण कार्यकाळ नेमका कसा होता हे थोडक्यात जाणून घेऊयात.

ADVERTISEMENT

Praveen Gaikwad
Praveen Gaikwad
social share
google news

बातम्या हायलाइट

point

संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड नेमके कोण?

point

संपूर्ण माहिती आली समोर

Praveen Gaikwad : संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना 13 जुलै रोजी सायंकाळच्या सुमारास अक्कलकोट येथे काळे फासण्यात आले. काळे फासणाऱ्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शिवधर्म संघटना आणि भाजपाच्या पदाधिकाऱ्यांचा यामध्ये समावेश असल्याची माहिती आता समोर आली आहे. भाजपच्या पदाधिकाऱ्यांपैकी इंदापूरातील दीपक काटे, भावानेश्वर शिरगि‍रेसह इतर 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

हेही वाचा : सांगलीत गुन्हेगाराचा दी एंड, एडक्याने आणि दगडाने ठेचून केली हत्या, नेमकं काय घडलं?

प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्यांची नावे आता समोर आली आहेत. त्यामध्ये दिपक काटे, किरण साळुंखे, भैय्या ढाणे, भवानेश्वर बबन शिरगिरे राहणार इंदापूर आणि कृष्णा क्षिरसागर, अक्षय चव्हाण, बाबु बिहारी यांची नावे समोर आली आहेत. ही बारामती येथील असल्याची माहिती समोर आली आहे. प्रवीण गायकवाड हे एका कार्यक्रमासाठी अक्कलकोट येथे जन्मजेय राजे भोसले यांच्या नागरी सत्कारासाठी आले होते, त्यावेळी तिथं आल्यानंतर त्यांच्यावर टोळक्यांनी काळं फासलं. 

वादाचं कारण आलं समोर 

संभाजी ब्रिगेड सामाजिक संस्थेनं नावाच्या पुढे छत्रपती हे नाव न लावल्याच्या कारणावरून दीपक काटेसह इतर समर्थकांनी जमाव जमवून प्रवीण गायकवाड यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर प्रवीण गायकवाड यांच्या तोंडाला काळं फासलं आणि नंतर "छत्रपती संभाजी महाराज की जय", अशी घोषणाबाजी केली.

ते इथंवरच न थांबता त्यांनी इनोव्हा गाडीच्या समोरील काचेवर दगडफेक केली, म्हणूनच पोलस ठाण्यात फिर्याद नोंदवली असल्याचे म्हटलं आहे. या प्रकरणी पोलीस अधिकारी या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. 

हे वाचलं का?

    follow whatsapp