भाजप आमदारांची 'ती' ऑडिओ क्लिप व्हायरल! अश्लील भाषा वापरून अधिकाऱ्याला केली शिविगाळ?

मुंबई तक

BJP Mla Audio Clip Viral : नरसी सोसायटीत प्रशासक म्हणून नेमणूक केल्याने भाजपचे आमदार राजेश पवार व तुषार राठोड अधिकाऱ्यावर भडकले.

ADVERTISEMENT

BJP Mla Rajesh Pawar Audio Clip Viral
BJP Mla Rajesh Pawar Audio Clip Viral
social share
google news

बातम्या हायलाइट

point

भाजप आमदार राजेश पवारांची ती ऑडिओ क्लिप व्हायरल

point

पवार यांनी पोलीस अधिक्षकांना पाठवलं पत्र

point

पत्रात काय म्हटलं आहे?

BJP Mla Audio Clip Viral : राजकीय वर्तुळातून खळबळ उडवणारी बातमी समोर आली आहे. भाजप आमदार राजेश पवार यांनी सरकारी अधिकाऱ्याला अश्लील भाषेत धमकावल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झालीय. नांदेड जिल्ह्याचे डीडीआर अशोक भिलारे यांना फोनवरून शिवीगाळ करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. नरसी सोसायटीत प्रशासक म्हणून नेमणूक केल्याने भाजपचे आमदार राजेश पवार व तुषार राठोड भिलारे यांच्यावर भडकले. अशोक भिलारे यांना फोनवरून शिवीगाळ केल्याची ही ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झालीय.

या क्लिपमध्ये पवार यांनी भिलारे यांना अश्लील भाषेत शिवीगाळ केल्याचा दावा केला जात आहे. परंतु, पवार यांनी नांदेडच्या पोलीस अधिक्षकांना पत्र लिहून म्हटलंय की, माझ्या आवाजाचा एआयच्या सहाय्याने वापर करून सोशल मीडियावर चुकीची ऑडिओ क्लिप व्हायरल करण्यात आली आहे. या क्लिपच्या माध्यमातून माझी बदनामी करण्यात येत आहे, तरी याप्रकरणी चौकशी करून कारवाई करावी. 

हे ही वाचा >> महिलेला पाठवली फ्रेंड रिक्वेस्ट, नंतर व्हिडिओ कॉल करत दाखवू लागला गुप्तांग, रात्री 12 वाजता काय घडलं?

पत्रात काय म्हटलं आहे?

सदर संभाषण बनावट असून माझा अशाप्रकारे कोणताही संवाद झाला नाही. माझा आवाज AI टेक्नॉलॉजीने बनवून विरोधकांनी बदनामी करण्यासाठी तयार केले आहे. माझी राजकीय प्रतिमा मलिन करण्याच्या हेतूने हे केले आहे.  यामागे विरोधक असण्याची शक्यता आहे. बनावट ऑडिओ क्लिप कोण सोशल मीडियावर पसरवत आहे, याची चौकशी करून त्या व्यक्तीची ओळख पटवावी. 
क्लिप तयार करणार्‍यावर आणि व्हायरल करणाऱ्यांवर सायबर कायद्यांतर्गत कारवाई करावी. भविष्यात अशा प्रकारची घटना कुणाकडून होऊ नये, यासाठी  आवश्यक ती सायबर फॉरेन्सिक तपासणी व उपायोजना कराव्या,  अशी मागणी आमदार राजेश पवार यांनी केली आहे.

हे ही वाचा >> नवऱ्याच्या दोन बायका सवती निघाल्या चोर, प्रवास करण्याच्या बहाण्याने इतरांचे दागिने करायच्या लंपास

"हो ते ऑडिओ क्लिप मी दिली आहे. मात्र लोकप्रतिनिधींनी एका अधिकाऱ्याला अशी भाषा वापरणे योग्य वाटत नाही. नरसी सोसायटीच्या संदर्भात हा प्रकार आहे. विविध कार्यकारी सोसायटी, मंत्री महोदयांना दिलेल्या निवेदनावर आम्ही कारवाई करत नाही म्हणून त्यांना त्याचा राग असावा. आमदार महोदय चांगल्या स्वभावाचे आहेत. मी वरिष्ठांकडे तक्रार करणार नाही", असं नांदेडचे जिल्हा उपनिबंधक अशोक भिल्लारे यांनी म्हटलं आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp