पुणे लाल महाल लावणी प्रकरण : वैष्णवी पाटीलचा जाहीर माफीनामा!

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

पुण्यातल्या ऐतिहासिक लाल महालात लावणीचं शुटिंग केल्याने वाद निर्माण झाला आहे. संभाजी ब्रिगेडने या प्रकरणी पुणे जिल्हाधिकाऱ्यांना आणि पोलीस आयुक्तांना पत्र लिहून कारवाईची मागणी केली आहे. लाल महालात चंद्रा या गाण्यावर वैष्णवी पाटील या महिला नृत्य कलाकाराने लावणी केली होती. त्यावरूनच हा वाद निर्माण झाला. आता वैष्णवी पाटीलने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून या प्रकरणी जाहीर माफी मागितली आहे.

काय म्हणाली आहे वैष्णवी पाटील?

“सर्व महाराष्ट्राच्या जनतेला माझा नमस्कार. मी आज हे सांगू इच्छिते काही दिवसांपूर्वी मी पुण्यातील सर्वश्रेष्ठ असा जिजाऊ महाराजांच्या लाल महालात चंद्रा या गाण्यावर नाच करत आमचा एक व्हीडिओ केला होता. तो व्हीडिओ करत असताना माझ्या मनीध्यानीही काहीच आलं नव्हतं की यातून काही वाद निर्माण होईल. शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या जातील, जनतेचं मन दुखावलं जाईल, भावना दुखावल्या जातील हे मनातही आलं नव्हतं. मात्र ही चूक माझ्याकडून झाली हे मला कळलं. त्याक्षणी मी तो व्हीडिओ डिलिट केला. पण तो खूप व्हायरल झाला होता. मी सर्वांना आज सांगते आहे की तो व्हीडिओ डिलिट करा. “

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

“जे मी केलं ती माझी चूक होती. मी सगळ्या जनतेची, शिवप्रेमींची सगळ्यांची हात जोडून माफी मागते. जिजाऊ माँसाहेब, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिष्ठेला धक्का बसेल असा माझा काहीही हेतू नव्हता. तरीही माझ्याकडून ही चूक झाली त्याबद्दल मी माफी मागते. मी सगळ्यांना वचन देते आहे की यापुढे माझ्याकडून कधीही अशी चूक होणार नाही.”

काय आहे प्रकरण?

ADVERTISEMENT

पुण्यातल्या लाल महाल ही एक ऐतिहासिक वास्तू आहे. या लाल महालात शाहिस्तेखान थांबला होता तेव्हा त्याची बोटं छत्रपती शिवरायांनी छाटली होती. सध्या पुणे महापालिकेने उन्हाळ्याच्या सुट्टीत हा लाल महाल पर्यटकांसाठी बंद ठेवला आहे. अशातच लाल महालात रिल्स काढण्याच्या निमित्ताने तमाशातल्या गाण्यांवर आधारित रिल्सचं शुटिंग करण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

ADVERTISEMENT

सिने दिग्दर्शक सुनील बापट आणि नृत्यांगना वैष्णवी पाटील यांनी हे कृत्य केलं आहे. व्हीडिओत स्पष्ट दिसतं आहे की नृत्यांगना वैष्णवी पाटील ठुमके लगावत लावणीच्या तालावर लाल महालात नृत्य करते आहे. पुणे महापालिकेचे अधिकारी सुनील मोहित यांनी आज तकला दिलेल्या प्रतिक्रियेत हे स्पष्ट केलं आहे की लाल महालात जो प्रकार घडला त्यात सुरक्षा रक्षकाची चूक आहे. लाल महालात कधीही कोणत्याही प्रकारच्या सीरियल किंवा कोणत्याही शुटिंगला संमती देण्यात येत नाही. मात्र आता त्या सुरक्षा रक्षकाची बदली करण्यात आली आहे असंही मोहिते यांनी सांगितलं आहे.

या सर्व प्रकरणी आता वैष्णवी पाटील आणि तिच्या भावाने माफी मागितली आहे. वैष्णवीने इंस्टाग्राम अकाऊंटवर लाईव्ह येत माफी मागितली आहे. तुमच्या सर्वांचे आशीर्वाद हवे आहेत. मला तुम्हाला कुणालाही दुखवण्याचा हेतू नव्हता मी हात जोडून सगळ्यांची माफी मागते असंही वैष्णवीने आणि तिच्या भावाने माफी मागितली आहे. तसंच या सगळ्यामध्ये कोणत्याही राजकीय पक्ष किंवा नेत्याचा हात नाही. त्यामुळे या सगळ्यावरून राजकारण होऊ नये अशीही अपेक्षा आम्ही व्यक्त करतो असंही या दोघांनी म्हटलं आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT