“आम्हाला चिरडून टाका, आर्मी बोलवा, पण…”, शिंदेंना चँलेज, संजय राऊत का संतापले?

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

Shiv Sena Dasara Melava 2023 : Uddhav Thackeray faction claim on shivaji park maidan.
Shiv Sena Dasara Melava 2023 : Uddhav Thackeray faction claim on shivaji park maidan.
social share
google news

Dasara Melava 2023 Mumbai : शिवसेनेची दोन शकलं झाली. एक ठाकरेंची शिवसेना. दुसरीकडे शिंदेंची शिवसेना. त्यामुळे 2022 पासून राज्यात शिवसेनेचे दोन दसरा मेळावे सुरू झालेत. गेल्यावर्षी शिवाजी पार्क मैदानासाठी दोन्ही ठाकरे विरुद्ध शिंदे असा वाद बघायला मिळाला होता. यंदाही त्याची पुनरावृत्ती होताना दिसत आहे. तशा राजकीय हालचाली सुरू असताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊतांनी थेट भाजपला चँलेज दिलं आहे. (shiv sena dasara melava 2023 : thackeray and shinde fight for shivaji park)

ADVERTISEMENT

दसरा मेळाव्यासाठी उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना आमने-सामने आली आहे. शिवाजी पार्कवर कुणाचा मेळावा होणार, याबद्दल उत्सुकता आहे. त्यावर बोलताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले, “बघा, 50-55 वर्षांपासून आम्ही शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेतोय. आता हे बेईमान लोक त्यावर दावा करत आहेत.”

हेही वाचा >> उद्धव ठाकरे म्हणाले, ‘माझी एकच खुर्ची आहे आता ती सुद्धा जाईल..’ : निलम गोऱ्हे

हेही वाचा >> सुप्रीम कोर्टानं वापरलेले ‘हे’ दोन शब्द… अन् CM शिंदेंचं भवितव्य

हेही वाचा >> Ajit Pawar: ‘…तर, मी राजकारण सोडतो’, शरद पवारांना अजित पवारांचं चॅलेंज

“हेच तर आहे ना कमकुवत करण्याचे प्रयत्न. शिवसेनेसमोर त्यांच्या लोकांच्या माध्यमातून आव्हान उभं करायचं. आमच्या समोर कितीही अडथळे निर्माण करा. हा दसरा मेळावा होईल आणि तो शिवाजी पार्कवर होईल. भले मग तुमची सत्ता आम्हाला चिरडून टाकण्याचा प्रयत्न करेल. दाबून टाकण्याचा प्रयत्न करेल. दिल्लीतून लष्कर बोलवा, काहीही फरक पडणार नाही. हा दसरा मेळावा होणार”, असं संजय राऊत म्हणाले.

हे वाचलं का?

Shiv Sena Dasara Melava : गेल्यावर्षी काय झालं होतं?

शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिंदे गटानेही दसरा मेळावा घेतला. या मेळाव्यासाठी ठाकरे गटाने शिवाजी पार्क मैदान मिळावे म्हणून अर्ज केला होता. तर शिंदे गटानेही अर्ज केला होता. हा वाद मुंबई उच्च न्यायालयात गेला होता. त्यानंतर ठाकरे गटाला शिवाजी पार्क मैदान मिळालं. तर शिंदे गटाने बीकेसीत दसरा मेळावा घेतला होता. पण, यंदा दोन्ही गट शिवाजी पार्क मिळवण्यासाठी ताकद लावताना दिसत आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT