‘पुणे तिथे काय उणे’ अशी म्हण असणाऱ्या पुण्यात कित्येक कलाकार घडले आहेत.
पुणे शहरातील 10 प्रसिद्ध स्टार्स आहेत, ज्यांना आज संपूर्ण देश ओळखतं.
पुण्यातील ही कलाकार मंडळी कोण आहे? त्यांच्याविषयी सविस्तर जाणून घेऊया.
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी पूर्वी थिएटर करायची, नंतर काही चित्रपटांमध्ये काम करून तिने आपले कलागुण सिद्ध केले.
सोनालीने तिचे सुरुवातीचे शिक्षण पुण्यातील कोथरूड येथील अभिनव विद्यालयातून केले आणि फर्ग्युसन कॉलेजमधून पोलिटिकल सायन्समध्ये पदवी घेतली.
राधिका आपटेचा जन्म पुण्यात झाला. तिने तिच्या करिअरची सुरुवात ‘वाह लाइफ हो तो ऐसी’ या चित्रपटातून करत ‘पॅडमॅन’ या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारली.
राधिकाने पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमधून अर्थशास्त्र आणि गणित विषयात पदवी घेतली.
लिलेट दुबे यांचा जन्म पुण्यात झाला इथूनच थिएटर करायला सुरुवात केली. कुटुंबाचा पाठिंबा न मिळाल्याने त्यांना चित्रपटात काम करता आले नाही.अशात वयाच्या 47 व्या वर्षी त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
मराठी सिनेसृष्टीतील जेष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून शिकल्या. 1984 मध्ये बाफ्टा पुरस्कार जिंकणाऱ्या रोहिणी या पहिल्या भारतीय अभिनेत्री आहेत.
क्रिकेटपटू केदार जाधवने रणजी ट्रॉफीमध्ये महाराष्ट्राकडून खेळताना 6 डावात 92 पेक्षा जास्त सरासरीने 555 धावा केल्या होत्या. संघर्षानंतर त्याला 2014 मध्ये भारतीय संघासोबत खेळण्याची संधी मिळाली.
अभिनेत्री मुग्धा गोडसेने तिचे सुरुवातीचे शिक्षण मराठी माध्यमातून पूर्ण केले. मिस इंडिया 2004 ची स्पर्धा जिंकू शकली नाही.परंतु तिने ‘फॅशन’ या चित्रपटातून पदार्पण केले.
पार्थ समथान यांचा जन्म पुण्यात झाला. त्याने छोट्या-मोठ्या भूमिका केल्या, पण त्याला नाव आणि प्रसिद्धी ‘कैसी ये यारियां’ या मालिकेतून मिळाली.
धनराज पिल्लई यांनी 1989 मध्ये आंतरराष्ट्रीय हॉकीमध्ये पहिला सामना खेळला. त्यांनी अनेक सामने खेळत देशाचं नाव उंचावलं.
अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांचा जन्म पुण्यात झाला. ‘सोन परी’ या लोकप्रिय शोमधून त्यांना प्रसिद्धी मिळाली.
बिग बॉस 7 विजेती गौहर खान देखील पुण्याची आहे. गौहर टेलिव्हिजनच्या लोकप्रिय डान्स रिअॅलिटी शो ‘मधून झळकली.