'BJPचे 80-85 जण म्हणालेले बंड करायचं का?', अजित पवारांनी टाकला राजकीय बॉम्ब - Mumbai Tak - ajit pawars strong speech in legislative assembly bjp 80 to 85 mlas were going to revolt ajit pawar claims - MumbaiTAK
बातम्या राजकीय आखाडा

‘BJPचे 80-85 जण म्हणालेले बंड करायचं का?’, अजित पवारांनी टाकला राजकीय बॉम्ब

Ajit Pawar Vidhansabha: मुंबई: अर्थसंकल्पीय अधिवेशनातील राज्यपालांच्या अभिभाषणाच्या अभिनंदन प्रस्तावावर बोलताना विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी शिंदे-फडणवीस सरकारला (Shinde-Fadnavis Govt) खडेबोल सुनावले. सरकारने स्वतःची पाठ थोपटवून घेऊ नये, राज्यपालांनी मराठी भाषण करायला हवं होतं, असंही अजित पवार म्हणाले. यावेळी अजित पवारांनी एक खळबळजनक दावा केला आहे. देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadnavis) उपमुख्यमंत्री पद न […]

Ajit Pawar Vidhansabha: मुंबई: अर्थसंकल्पीय अधिवेशनातील राज्यपालांच्या अभिभाषणाच्या अभिनंदन प्रस्तावावर बोलताना विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी शिंदे-फडणवीस सरकारला (Shinde-Fadnavis Govt) खडेबोल सुनावले. सरकारने स्वतःची पाठ थोपटवून घेऊ नये, राज्यपालांनी मराठी भाषण करायला हवं होतं, असंही अजित पवार म्हणाले. यावेळी अजित पवारांनी एक खळबळजनक दावा केला आहे. देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadnavis) उपमुख्यमंत्री पद न मिळाल्याने भाजपचे (BJP) 80 ते 85 आमदार बंडखोरीच्या तयारीत होते. असं अजित पवार यावेळी म्हणाले. (ajit pawars strong speech in legislative assembly bjp 80 to 85 mlas were going to revolt ajit pawar claims)

विधानसभेत अजित पवारांची तुफान फटकेबाजी

सध्या महाराष्ट्राच्या राजकारणाकडे देशाचं लक्ष आहे. सरकारची स्थापना कशी झाली? पक्षांतर बंदीबद्दल सुप्रीम कोर्ट आठ दिवसांत निकाल देणार असल्याची बातमी कानावर आली. वादग्रस्त मुद्दे घटनापीठाकडे गेलेले आहेत. अशा परिस्थितीत राज्यपालांवर मोठी घटनात्मक जबाबदारी येऊन पडलेली आहे.

लोकशाही राहणार की, काय होणार, याकडे देश बघतोय. उद्या निर्णय झाल्यानंतर त्याचे पडसाद देशपातळीवर आणि वेगळ्या राज्यात कशापद्धतीने उमटतात. सरकारपेक्षा विरोधकांकडे आपलं लक्ष राहावं अशी आमची अपेक्षा आहे, अशी विनंती आम्ही राज्यपालांना केली.

अतुल भातखळकर आणि संजय कुटे यांचं भाषण फार बारकाईने ऐकत होतो. त्यांचं तर कामच आहे की, ते सत्ताधारी पक्षाचे आहेत आणि त्यांनी त्यांची भूमिका मांडण्याचं काम केलंच पाहिजे. पण, आपण सगळे राजकीय पक्षात काम करत असताना काय पद्धतीने बघतो की, आपलं सरकार चांगलं चाललंय की नाही? हे आपण आपल्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करतो.

विधानसभेत अजित पवारांचा पारा चढला, फडणवीसांनी दाखवला आरसा

वेगवेगळे दाखले देत प्रत्येकाला बोलावं लागतं. आठ महिन्यांपूर्वी हे सरकार सत्तेवर आलं. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. शपथविधी झाल्यानंतर पहिला झटका बसला, भाजप कार्यकर्त्यांना वाटतं होतं की, मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस शपथ घेणार आणि उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे शपथ घेणार. म्हणजे ते आता राज्यपाल नाहीयेत, पण मी सभागृहात सांगतो. मी त्यावेळचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना भेटायला गेलो, त्यावेळी ते म्हणाले की अजितजी, हे काय झालं? असं वाक्य त्यांचं मी ऐकलं.

सगळं झाल्यानंतर उपमुख्यमंत्री म्हणाले की, या सरकारमध्ये जाणार नाही. कुणा कुणाच्या डोळ्यात पाणी आलं, तेही आपण पाहिलं, हे गिरीश महाजन यांना चांगलं माहिती आहे, अंकल… असं अनेकांचं झालेलं आहे. काही 80-85 लोक म्हणाले आपण काय बंड करायचं का? शेवटी देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं असं काही करू नका. त्या दोघांना कळलं तर आपला सगळा सुफडा साफ होईल, गप्प बसा. सगळ्यांनी गपगुपानं ऐकलं.

तुम्हाला सांगण्यात आलं की, काहीच नव्हतं. आता किमान सत्तेत जायला तरी मिळालं. त्याच्यावर तरी समाधान माना. सरकार सुरू झालं. सुरूवातीला ते दोघेच होते. वरून म्हणायचे आम्ही खंबीर आहोत. त्याच्यानंतर कसंबसं मंत्रिमंडळ वाढलं. तेही वाढून इतके दिवस झाले. आठ महिने झाले तरी पूर्ण मंत्रिमंडळ काही होईना, अशी सरकारची परिस्थिती आहे.

Shashikant warishe: अजित पवारांनी दाखवली जाहिरात; देवेंद्र फडणवीस म्हणाले..

यांचं सरकार येऊन सहा महिने पूर्ण झाल्यानंतर महाराष्ट्रात निवडणुका झाल्या. मतदान कुणी केलं? महाराष्ट्रातील पदवीधर लोकांनी, महाराष्ट्रातील शिक्षकांनी. अशी चपराक बसलेली आहे की, उगीच काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. नाउमेद झाले आहेत सगळे. मतदान एका भागात नाही झालेलं. एक झालं अमरावती विभाग… तिथे पाच जिल्हे. सगळे सांगत होते रणजित पाटील निवडून येणार, कुठे गेले कळलंच नाही. आपला डॉक्टर कसा पडला, सगळ्यांचे धाबे दणाणलेले. तिथे तर शंभर टक्के सीट येणार होतं. बाल्लेकिल्ला तेही नाही आलं. नागपूरमध्ये म्हणाले, झाकली मूठ सव्वालाखाची… पाठिंबा देऊ… पाठिंबा द्यायला गेले आणि तिथेही सत्यनाश झाला. त्यांचाही पराभव झाला. मराठवाड्यात आठ जिल्ह्यात पराभव झाला.

हा पक्ष केंद्रात सत्तेत आहे, राज्यात सत्तेत आहे. तरी दुसऱ्यावर डोळा. दुसरा कसा आपल्याकडे येईल. काँग्रेसचा येतो का? राष्ट्रवादीचा येता का? अरे तुमचे करा ना तयार. समोर बघितलं तर चाळीस पन्नास लोक आमचेच. ही अवस्था आहे. आत्मचिंतन, आत्मपरीक्षण केलं पाहिजे. इथं तुम्हाला उमेदवार देता आला नाही. शेवटी कितीही केलं तरी सत्यजित तांबे… तीन पिढ्या काँग्रेसमध्ये काम करतं आहे. कोकणातील जागा. ते म्हात्रे शिवसेनेचे शिक्षक संघटना. उद्धव ठाकरेंचे राईट हॅण्ड. पण तिथे बाळाराम पाटलांना उमेदवारी गेली. तिथेही भाजपला स्वतःचा माणूस देता आला नाही. खरोखरच सहा महिन्यात दिवा लावला असता, तर शिक्षक आणि पदवीधरांनी निवडून दिलं असतं. तुम्हाला नाकारलं.

Janhvi Kapoor: अ‍ॅडल्ट साइटवर होता जान्हवी कपूरचा फोटो… राघव-परिणीतीच्या लग्नाचे एक्सक्लुझिव्ह फोटो आणि व्हिडिओ झोप येत नसेल तर हे करुन बघा, 60 सेकंदात झोप येईल लग्न नकोच! ‘या’ मराठी अभिनेत्री घटस्फोटानंतर सिंगल लाइफ करतायेत एन्जॉय Amitabh love story : पुण्यात बघितलं अन् पहिल्या नजरेतच खेळ खल्लास! ODI 2023: न्यूझीलंडला मोठा झटका, ओपनिंग सामन्यातून दिग्गज खेळाडू बाहेर! iPhone 15 Pro ला 40 हजारात खरेदी करण्याची संधी! फक्त हे करा… Rinku Rajguru : हर हर महादेव! आर्ची थेट पोहोचली केदारनाथ दर्शनाला ‘Animal’ साठी रणबीर नाही तर, साऊथचा सुपरस्टार होता पहिली चॉइस! पाकिस्तानचा संघ भारतात येताच, खेळाडूंनी केली ‘ही’ मागणी जिमला जाऊन नाही तर, अशाप्रकारे सुटलेलं पोट करा कमी… Ratan Tata यांच्या माणुसकीचं दर्शन घडवणारी पोस्ट व्हायरल! चाहत्यांनी केला सॅल्यूट World Heart Day: तुम्हाला पण ‘ही’ लक्षणं दिसतायेत? वेळीच डॉक्टरांकडे जा, नाहीतर… Eknath Shinde : श्रीकांत शिंदे उतरले पाण्यात… मुख्यमंत्र्यांनी बाप्पाला कसा दिला निरोप? Priyanka Chopra: सुंदर दिसण्यासाठी सर्जरी केली अन् प्रियांका कशी फसली? Dengue : डेंग्यू झाल्यास ‘या’ गोष्टी अजिबात विसरू नका, एक चूक पडेल महागात Esha Gupta : आउटडोर शुटच्या बहाण्याने…, प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला कास्टिंग काऊचचा अनुभव Ganpati 2023: गणपती बाप्पासोबत ‘मोरया’ का म्हणतात? पितृ पक्ष उद्यापासून होणार सुरू! का आहे एवढं महत्त्व? Dengue food not to eat : डेंग्यू झाल्यानंतर हे पदार्थ अजिबात खाऊ नका!