Aryan Khan drugs case : शाहरुखकडून 25 कोटी खंडणी, समीर वानखेडेंबद्दल CBI चा मोठा गौप्यस्फोट

मुंबई तक

ADVERTISEMENT

aryan khan case cbi big secret blast about sameer Wankhede
aryan khan case cbi big secret blast about sameer Wankhede
social share
google news

आर्यन खान (Aryan Khan) ड्रग्ज प्रकरणात 25 लाखाची खंडणी मागितल्याप्रकरणी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB)चे माजी अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यासह चार जणांविरोधात सीबीआयने भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यानंतर सीबीआयने समीर वानखेडे यांच्या घरावर छापेमारी केली होती. या छाप्यात अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. या घटनांमुळे समीर वानखेडे यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. दरम्यान समीर वानखेडे विरोधात दाखल केलेल्या गुन्ह्यात सीबीआयने अनेक मोठे गौप्यस्फोट केले आहेत, हे गौप्यस्फोट काय आहेत, हे जाणून घेऊयात.

FIR मध्ये काय?

समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांनी आर्यन खानला (Aryan Khan) अडकवून 25 कोटी पैसे उकळण्याचा कट रचला होता. 18 लाखांवर ही डील झाली आणि 50 लाख घेतलेही होते. खंडणीच्या या कटात केपी गोसावी आणि सान्विल डिसुझा यांना सहभागी करून घेण्यात आलं, असंही सीबीआयच्या एफआरआयमध्ये म्हटलेलं आहे. या प्रकरणात साक्षिदार केपी गोसावीने (kp Gosavi) आर्यन खानचे वडिल शाहरूख खान (Shahrukh Khan) यांच्याकडून 25 करोड रूपये वसूल करण्याचा प्लान आखला होता. समीर वानखेडे यांच्यावतीने शाहरूख खानकडून कोट्यवधी रुपये वसूल करण्याचा प्रयत्न के पी गोसावी करत होता.

हे ही वाचा : नवाब मलिकांचे आरोप खरे? CBI च्या FIR मध्ये स्फोटक माहिती

मुंबईच्या कार्डिलिया क्रूझवर असलेल्या अनेकांची तपासणी करण्यात आली होती,मात्र यातील अनेकांना त्यांची माहिती नोंदवून न घेताच सोडून देण्यात आलं होतं असा खुलासा केला. त्याचबरोबर स्वतंत्र साक्षीदार असलेल्या के.पी. गोसावीला नियमांचं उल्लंघन करून आरोपींसोबत राहण्याची परवानगी दिली होती. तसेच गोसावीच्या मालकीच्या असलेल्या खासगी वाहनातूनच आरोपींना आणण्यात आले होते. नियमात बसत नसताना देखील के.पी. गोसावीला एनसीबी कार्यालयातही प्रवेश देण्यात आला, असंही सीबीआयने एफआयआरमध्ये म्हटलेलं आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

के.पी.गोसावीला आरोपींच्या जवळ मुद्दामून राहायला सांगितले होते. जेणेकरून असे वाटेल की तो एनसीबीची अधिकारी आहे. पण एनसीबीचे अधिकारी आरोपींनी ताब्यात घेण्यासाठी आधीच हजर होते, असा देखील एफआयआरमध्ये खुलासा करण्यात आला आहे. तसेच अशी परिस्थिती निर्माण केली जेणेकरून स्वतंत्र साक्षीदार असलेला के.पी. गोसावीला आरोपी सोबत उपस्थित राहिल.

हे ही वाचा : कर्नाटकचा मुख्यमंत्री महाराष्ट्रातील नेता ठरवणार!

समीर वानखेडे यांनी निरीक्षक असलेल्या अधिकाऱ्याला असे निर्देश दिले की, केपी गोसावी आणि प्रभाकर साईल यांना स्वतंत्र साक्षीदार नोंदवून प्रक्रिया पूर्ण करावी आणि व्ही.व्ही. सिंग यांना सांगितलं की, आरोपीला एनसीबी कार्यालयात घेऊन जाण्यासाठी केपी गोसावी आणि प्रभाकर साईलकडे द्यावे. त्यानंतर दोघेही आरोपीला (आर्यन खान) घेऊन एनसीबी कार्यालयात घेऊन आले, असंही या एफआयआरमध्ये म्हटलेलं आहे.

ADVERTISEMENT

दरम्यान समीर वानखेडे यांनी कार्डिलिया क्रुजवरील रेव पार्टी दरम्यान छापा टाकला होता. या छाप्यात आर्य़न खानला अटक केली होती. यानंतर आर्यन खान 26 दिवस आर्थर जेलमध्ये बंद होता. यानंतर आर्यन खानला जामीन मिळाला होता.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT