एक्स्प्रेसच्या टॉयलेटमध्ये तरुणीवर केला बलात्कार! नराधम पीडितेला गावात घेऊन गेला अन्..कल्याण परिसरात काय घडलं?

मुंबई तक

कल्याण परिसरात एका धक्कादायक घटनेमुळं खळबळ उडाली आहे. येथे कसारा आणि अकोला दरम्यान निघालेल्या मेल एक्स्प्रेसमध्ये तरुणीवर बलात्कार करण्यात आला.

ADVERTISEMENT

Bihar Minor Girl Rape Case
Bihar Minor Girl Rape Case
social share
google news

बातम्या हायलाइट

point

एक्स्प्रेसमध्ये घडली बलात्काराची धक्कादायक घटना

point

यापूर्वीही घडली होती संतापजनक घटना

point

पोलिसांनी अकोल्यात आरोपीच्या मुसक्या आवळल्या

Rape Case Crime News : कल्याण परिसरात एका धक्कादायक घटनेमुळं खळबळ उडाली आहे. येथे कसारा आणि अकोला दरम्यान निघालेल्या मेल एक्स्प्रेसमध्ये तरुणीवर बलात्कार करण्यात आला. इतकच नव्हे, नराधम पीडित तरुणीला त्याच्यासोबत गावात घेऊन गेला. त्यानंतर त्याच्या आईने म्हटलं की, मुलीला परत सोडून ये. तेव्हा आरोपीने तरुणीला अकोला स्टेशनवर सोडलं आणि तिथून पळून गेला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केलं. आरोपीला 15 दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे. 

या गुन्ह्यात अन्य कोणत्या आरोपीचा समावेश आहे का, याचाही तपास पोलिसांकडून केला जात आहे. रिपोर्टनुसार, गजानन चव्हाण नावाच्या व्यक्तीने कल्याण स्टेशनवर तरुणीसोबत मैत्री केली. त्यानंतर ट्रेनच्या बाथरूममध्ये तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर पीडित तरुणीला अकोला येथे त्याच्या गावात घेऊन गेला.

हे ही वाचा >> मोठी बातमी! जयंत पाटील यांचा शरद पवार गटाच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा, 'हा' नेता पदभार सांभाळणार

तरुणीला पाहून आरोपीच्या आई-वडिलांना धक्का बसला. आईने म्हटलं, तरुणीला परत सोडून ये. आरोपीने तरुणीला पुन्हा अकोला स्टेशनवर सोडलं आणि तिथून पळून गेला. पीडित तरुणीच्या कुटुंबियांनी मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अकोला स्टेशनवर अटक केली. आरोपीला न्यायालयात हजर केल्यानंतर 15 दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली. 

यापूर्वीही घडली होती संतापजनक घटना

पोलिसांनी म्हटलं आहे की, पीडितेसोबत याआधीही बलात्काराची घटना घडली होती. ही घटना डोंबिवलीत तिच्या घराजवळ घडली होती. त्या प्रकरणाचा तपास मानपाडा पोलीस करत आहेत. अकोला पोलिसांनी म्हटलं की, आरोपीला गावातून अटक केली आहे. याप्रकरणी पोलीस तपास करत आहेत. 

हे ही वाचा >> “त्यालाच मी आवडायचे, पत्नी म्हणायचा, टॅटूसुद्धा...” मुंबईतील विद्यार्थ्यासोबत शारीरिक संबंध ठेवणाऱ्या शिक्षिकेचे पुरावे!

त्या ठिकाणीही घडली होती अत्याचाराची घटना

मध्य प्रदेशातील मैहरमध्ये नात्याला काळीमा फासणारी घटना घडली होती. एका तरुणाने आपल्याच मेव्हणीवर स्लीपर बसमध्ये बलात्कार केल्याची घटना घडली होती. पीडितेवर बलात्कार केल्यानंतर आरोपीने तिथून पळ काढला होता. पीडित तरुणाने पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तिच्या दाजीच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीवर कारवाई केली. 

हे वाचलं का?

    follow whatsapp