मध्यरात्री लाईट गुल, पोलिस कारवाईच्या शंकेने शेतकऱ्यांचं जागरण - Mumbai Tak - delhi farmers protest ghazipur border light cut police action latest update - MumbaiTAK
बातम्या

मध्यरात्री लाईट गुल, पोलिस कारवाईच्या शंकेने शेतकऱ्यांचं जागरण

नव्या कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात बुधवारी रात्री उशिरा गाजीपूर बॉर्डरवर गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. भारतीय किसान युनियनचे प्रवक्ता राकेश टिकैत यांनी शेतकरी आंदोलन करत असलेल्या भागातली लाईट कट केल्याचा आरोप पोलिसांवर केलाय. शेतकऱ्यांनी पोलिस आणि सरकारवर आंदोलनात अस्थैर्य निर्माण करण्याचा आरोप केला. दरम्यान, लाल किल्ला हिंसाचार प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत 37 शेतकरी नेत्यांविरुद्ध […]

नव्या कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात बुधवारी रात्री उशिरा गाजीपूर बॉर्डरवर गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. भारतीय किसान युनियनचे प्रवक्ता राकेश टिकैत यांनी शेतकरी आंदोलन करत असलेल्या भागातली लाईट कट केल्याचा आरोप पोलिसांवर केलाय. शेतकऱ्यांनी पोलिस आणि सरकारवर आंदोलनात अस्थैर्य निर्माण करण्याचा आरोप केला.

दरम्यान, लाल किल्ला हिंसाचार प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत 37 शेतकरी नेत्यांविरुद्ध २२ एफआयआर नोंदवलेत. हिंसाचाराच्या घटनेनंतर दोन शेतकरी संघटनांनीही या आंदोलनातून काढता पाय घेतलाय.

शेतकरी नेते राकेश टिकैत मीडियाशी बोलताना म्हणाले, ‘प्रशासनानं आज वातावरण खराब करण्याचा प्रयत्न केलाय. लाईट कट करण्यात आली. भीतीचं वातावरण तयार केलं जातंय. त्यामुळे आम्ही रात्र जागून काढण्याचा निर्णय घेतलाय. आमचं आंदोलन संपावं, असं प्रशासनाला वाटतंय.’

लाल किल्ला हिंसाचार प्रकरणी दिल्ली पोलिसांनी टिकैत यांच्यासह जवळपास काही शेतकरी नेत्यांविरोधात गुन्हा दाखल केलाय. यासंबंधी प्रश्न विचारला असता, आम्ही आंदोलन करतोय, तर मग आमच्यावर गुन्हा नोंदवला जाणार ना, असा म्हणत पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. दिल्ली पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं तर नक्की तिथे जाऊत, असंही ते म्हणाले.

दुसरीकडे, लाल किल्ला हिंसाचारानंतर शेतकरी आपलं आंदोलन मागं घेणार का, याबद्दल उलटसुलट चर्चा सुरू होती. त्यावरही टिकैत यांनी आंदोलन येत्या काळातही सुरूच राहणार असल्याचं स्पष्टीकरण दिलं.

लाल किल्ल्यावर जे काही झालं आणि ज्यांनी केलं त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. जे काही झालं आणि ज्यांनी केलं त्यांच्यासोबत आम्ही नाही. ट्रॅक्टर रॅलीचा जो मार्ग निश्चित करण्यात आला होता, त्या मार्गावर जाण्यापासून पोलिसांनी रोखलं, असा आरोपही टिकैत यांनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

sixteen + 5 =

Vicky Kaushal वर सचिन तेंडुलकर इम्प्रेस; कारण… Alcohol चा रिकाम्या पोटी कसा होतो परिणाम? ‘या’ 5 गोष्टी खाऊन चुटकीसरशी घटवा Belly Fat! दिया मिर्झा ‘या’ एका गोष्टीने करते दिवसाची सुरूवात, जाणून घ्या Fitness रूटीन! Weight Gain करायचंय? फक्त ‘ही’ एक गोष्ट खा, सप्लीमेंटची पडणार नाही गरज! ‘सुशांत सिंह राजपूत ओव्हर सेंसिटिव्ह…’, मुकेश छाबरांनी असं काय सांगितलं? ‘दुआओ मे याद रखना’, स्टार कोरिओग्राफर अडकला लग्नबंधनात! PHOTOS Kiara Advani च्या हॉट-टोन्ड फिगरचं खास सीक्रेट, कशी राहते एवढी Fit? Shehnaaz ने शेतात केली मस्ती; Viral फोटो पाहून चाहतेही झाले खुश! Wine पाण्यासोबत का घेत नाहीत? Almond : गरजेपेक्षा जास्त बदाम खाताय! ‘हे’ दुष्परिणाम माहिती आहेत का? तुम्हाला तर ‘या’ सवयी नाहीत ना? असतील तर वाढेल तुमचं Belly Fat! Virat Kohli : ग्लॅमरस फुटबॉलर विराट कोहलीवर फिदा, कोण आहे ‘ती’? मलायकानंतर गर्लफ्रेंडने साथ सोडली, अरबाजच्या ब्रेकअपची चर्चा ‘या’ गोष्टी नियमित फॉलो केल्यात तर Weight Loss ची 100% गॅरंटी! अभिनेत्रीचा कमाल Fitness, घेते खास डाएट प्लान! Water Fastion पद्धतीने खरंच चुटकीसरशी होईल Weight Loss? Places to visit: भारतातच पण कमी बजेटमध्ये ‘या’ सुंदर ठिकाणांना नक्की भेट द्या! PM Modi कोणता फोन वापरतात? फोटो Viral रणदीप हुडाने मैतेई धार्मिक पद्धतीने का केलं लग्न? सांगितली फॅमिली प्लानिंग