कसब्यातल्या मतदारांना देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘पुन्हा येऊ!’ - Mumbai Tak - devendra fadnavis reaction on kasba peth assembly by election where bjps candidate hemant rasane suffered a major defeat - MumbaiTAK
बातम्या राजकीय आखाडा

कसब्यातल्या मतदारांना देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘पुन्हा येऊ!’

Kasba Peth Assembly by-election : पुणे : कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीत (Kasba Peth Assembly by-election) भाजपला (BJP) मोठा झटका बसला आहे. भाजपचे उमेदवार हेमंत रासने (Hemant Rasane) यांचा इथून मोठा पराभव झाला. काँग्रेसचे (Congress) उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी तब्बल 11 हजार 40 मतांनी हेमंत रासने यांचा पराभव केला आहे. बालेकिल्ल्यातच झालेल्या पराभवाने पुण्यात भाजपचे […]

Kasba Peth Assembly by-election :

पुणे : कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीत (Kasba Peth Assembly by-election) भाजपला (BJP) मोठा झटका बसला आहे. भाजपचे उमेदवार हेमंत रासने (Hemant Rasane) यांचा इथून मोठा पराभव झाला. काँग्रेसचे (Congress) उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी तब्बल 11 हजार 40 मतांनी हेमंत रासने यांचा पराभव केला आहे. बालेकिल्ल्यातच झालेल्या पराभवाने पुण्यात भाजपचे सर्वच दिग्गज फेल ठरल्याचं बोललं जातं आहे. या दरम्यान आता राज्यातील भाजपचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कसब्यातील जनतेकडे ‘आम्ही पुन्हा येऊ’ अशी प्रतिक्रिया दिली आहे. (Devendra Fadnavis reaction on Kasba Peth Assembly by-election)

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

ट्विट करत देवेंद्र फडणवीस म्हणाले, चिंचवड विधानसभा क्षेत्रातून भाजप उमेदवार अश्विनीताई जगताप विजयी झाल्या. त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि विकासाला साथ देणाऱ्या चिंचवडवासियांचे मनापासून आभार! स्व. लक्ष्मणभाऊ जगताप यांना ही भावपूर्ण आदरांजली आहे. तर कसब्यातील जनतेचे सुद्धा मनापासून आभार. जनतेने आम्हाला आशीर्वाद दिलेत. थोडे कमी आशीर्वाद मिळाले असले तरी त्यांनी दिलेल्या जनादेशाचा स्वीकार करतो. पण, एक नक्की सांगतो, आपले आशीर्वाद मागण्यासाठी ‘आम्ही पुन्हा येऊ’! असं ते म्हणाले.

पराभवानंतर हेमंत रासने काय म्हणाले?

“2019 मध्ये किंवा त्यापूर्वी निवडणुका तिरंगी-पंचरंगी झाल्या. यंदा प्रथमच थेट लढत होती. त्यात उमेदवार म्हणून मी कमी पडलो. जनतेचा कौल मान्य आहे. मात्र यापुढेही लोकांच्या सेवेसाठी सक्रिया राहणार,” असे भाजपचे पराभूत उमेदवार हेमंत रासने (Hemant Rasane) म्हणाले आहेत.

Kasba Peth By Election Results: धंगेकरांनी घडवला इतिहास! भाजपने बालेकिल्ला गमावला

शेवटच्या निकालापर्यंत मतांची आघाडी कायम

कसबा पेठ पोटनिवडणुकीच्या निकालात काँग्रेस-महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकरांनी मतांची आघाडी शेवटपर्यंत कायम ठेवली होती. 11व्या फेरीअखेर धंगेरकर यांनी 3,122 मतांची आघाडी घेतली होती. 13 व्या फेरीअखेर हीच आघाडी 5 हजार 86 वर पोहोचली होती. निकालाच्या शेवटच्या टप्प्यात कल रवींद्र धंगेकरांच्याच बाजूनेच येत होते. त्यामुळे ते मतांची आघाडी घेत होती.

तर धंगेकर यांनी 18व्या फेरीअखेर 9 हजार 49 मतांची आघाडी घेतली आहे. शेवटच्या दोन फेऱ्यांमध्ये धंगेकरांच्या मतांची आकडेवारी वाढतच गेली. आणि रवींद्र धंगेकर यांनी तब्बल 11हजार 40 मतांनी हेमंत रासने यांचा पराभव केला आहे. रवींद्र धंगेकर यांना 73 हजार 194 मतं मिळाली, तर हेमंत रासने यांना 62 हजार 244 मतं मिळाली आहे. या निकालाने भाजपला बालेकिल्यात खिंडार पडलं.

Raveena Tandon चं करिअर करिष्मामुळे फ्लॉप? म्हणाली.. अभिनेत्रीला सेटवरून काढलं, लोकप्रिय होऊनही करावा लागला संघर्ष! रवीना-अक्षयचं झालं होतं ब्रेकअप? पहिल्यांदाच EX वर दिली प्रतिक्रिया Jio vs Airtel: सर्वात स्वस्त रिचार्ज प्लान कोण देणार? नाना-शाहरुखचे संबंध बिघडले? नेमक काय घडलं त्यांच्या नात्यात… सुहाना ते सारा… टॉप स्टारकिड्सचा देसी अंदाज! Parineeti च्या लग्नाला पोहोचली बेस्टी सानिया, काय दिलं खास गिफ्ट? राघव-परिणीती यांची कशी झाली पहिली भेट? पाहा Photo Ganesh Visarjan : गणपती चालले गावाला… मुंबईत दणक्यात होणार बाप्पाचं विसर्जन! Ganesh Visarjan 2023 : अनंत चतुर्थी दिवशी बाप्पाच्या विसर्जनाचं महत्त्व काय? आमिर खान पोहचला बाप्पाच्या दर्शनासाठी, हात जोडून केली प्रार्थना… Mumbai Traffic : गणपती विसर्जनाच्या दिवशी ‘या’ रस्त्यांवरून जाणं टाळाच भारतीय क्रिकेटर तापाने फणफणले! रोहित शर्मा म्हणाला.. 10 वर्षांनी मोठ्या सैफसोबत कशी सुरूये करिनाची मॅरेज लाईफ? लग्नानंतर परिणीती चोप्रा मुंबई सोडून जाणार? कारण… ठाण्यात फ्लॅटमध्ये घुसला भलामोठा अजगर, पाहा Viral VIDEO भूमी पेडणेकरची Butt Bag, किंमत तब्बल… ओठांच्या आकारावरून समजते पर्सनॅलिटी, तुमची कशी आहे ओळखा? रिकाम्या पोटी गोड पदार्थांचं सेवन टाळा! नाहीतर… दारूचा ‘पेग’ कसा आला? काय आहे अर्थ?