मुंबईची खबर: प्रवाशांनो! जिभेला बसणार महागाईचा चटका..'या' रल्वे स्टेशनवर वडापावचे दर वाढले

मुंबई तक

आता पश्चिम रेल्वे स्टेशनच्या स्टॉलवरील खाद्यपदार्थ 20 ते 25 टक्क्यांनी वाढवण्यात आले आहेत. या निर्णयामुळे प्रवाशांच्या खिशाला कात्री लागणार असल्याचं दिसून येत आहे.

ADVERTISEMENT

'या' रल्वे स्टेशनवर वडापावचे दर वाढले, कारण काय?
'या' रल्वे स्टेशनवर वडापावचे दर वाढले, कारण काय? (फोटो सोजन्य: Grok AI)
social share
google news

बातम्या हायलाइट

point

रेल्वे स्टेशन स्टॉलवरील खाद्यपदार्थांचे दर वाढले

point

रेल्वे स्टेशनच्या स्टॉलवर नवीन खाद्यपदार्थांमध्ये भर

point

पश्चिम रेल्वे प्रवाशांच्या खिशाला कात्री

Mumbai News: नेहमी रेल्वेने प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य प्रवाशांसाठी स्टेशनच्या स्टॉलवरील खाद्यपदार्थ खिशाला परवडणारे होते. मात्र, प्रवाशांना रेल्वेच्या स्टॉलवरील खाद्यपदार्थ खाणं महागात पडणार असल्याचं वृत्त समोर आलं आहे. खरंतर, पश्मिच रेल्वेने मोठ्या प्रमाणात लोक प्रवास करतात. या भागातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या तुलनेने मोठी आहे. परंतु, आता पश्चिम रेल्वे स्टेशनच्या स्टॉलवरील खाद्यपदार्थ 20 ते 25 टक्क्यांनी वाढवण्यात आले आहेत. या निर्णयामुळे प्रवाशांच्या खिशाला कात्री लागणार असल्याचं दिसून येत आहे. 

खरंतर, गेली बरीच वर्षे कोरोना आणि इतर कारणांमुळे खाद्यपदार्थांच्या दरात कोणतेच बदल करण्यात आले नव्हते. मात्र, आता हे दर बदलण्याचा निर्णय घेण्यात आला असून प्रवाशांच्या खिशावर त्याचा भार पडणार आहे. रेल्वे स्थानकात तुलनेने कमी किंमतीत खाद्यपदार्थ उपलब्ध होत होते. त्यामुळे अनेक जण रेल्वे स्टेशनवर खाद्यपदार्थ घेत होते. मात्र, स्टेशनवरील खाद्यपदार्थांचे दर वाढल्याने प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. 

वडापावचे दर वाढले

रेल्वे स्टेशनवर मिळणाऱ्या वडापावच्या किंमतीत वाढ झाली असून पूर्वी 13 रुपयांना मिळणाऱ्या वडापावसाठी प्रवाशांना आता 18 रुपये मोजावे लागणार आहेत. या सुधारित दराला पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून मंजुरी देण्यात आली आहे. 1 जुलैपासून रेल्वे स्थानकांमध्ये  हे नवे दर लागू करण्यात आले आहेत.

हे ही वाचा:  'त्या' महिलांनी केलं मोठं कांड! लहान मुलांसोबत हॉटेलमध्ये करायच्या शारीरिक संबंध, दारू पाजायच्या अन् नंतर....

तसेच, आता रेल्वे स्थानकांवर मिळणारे लिंबूपाणी, कोकम, रसना आणि सरबत 200 मिली ऐवजी 150 मिली इतकेच मिळणार आहे. मात्र, या पेयांचे दर एक रुपयांनी कमी करण्यात आले असून लिंबू आणि कोकम सरबत सहा रुपयांऐवजी पाच रुपयांना मिळणार आहे. दुसरीकडे ज्वारीपासून बनवलेले आरोग्यदायी पदार्थ विक्रीस ठेवण्यास येणार असल्याचं अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं आहे. 

हे ही वाचा: तीन मुलांचा बाप मेहुणीसोबत पळाला! दीदीची सटकली, पोलीस स्टेशनमध्येच केलं असं काही..

नवे खाद्यपदार्थ विक्रीस उपलब्ध 

आता रेल्वे स्टेशनवर नवे खाद्यपदार्थ विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत. यामध्ये चीज पनीर रोल, शेवपुरी, दाबेली, व्हेज हॉट डॉग, सॅन्डविच, चायनीज भेळ आणि डोनट यांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच ज्वारीपासून बनवलेली चकली, पोहे, बिस्कीट, खाकरा आणि थेपला या आरोग्यदायी पदार्थांचा देखील समावेश करण्यात आला आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp