चिमुकल्यांनो जरा स्वत:ला सांभाळा.. सरकारचं लवकरच 'याकडे' लक्ष जाईल!
नंदूरबार जिल्ह्यातील अकलकुवा येथील एका गावातील शाळकरी मुलांना त्यांचा जीव धोक्यात घालून शाळेत जावं लागत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
ADVERTISEMENT

रोहिणी ठाकूर, नंदूरबार: महाराष्ट्र हे राज्य वेगाने विकास करणारं राज्य आहे असं म्हटलं जात असलं तरी आजही अशा काही गोष्टी समोर येतात की, आपले डोळे खाड्कन उघडतात. अशीच एक गोष्ट नंदूरबार जिल्ह्यातील अकलक्कुवा येथील केलखाडी पाड्यात घडली आहे. ज्याकडे सरकारचं लक्ष वेधणं अत्यंत महत्त्वाचं आहे.
केलखाडी पाड्यावरी शाळकरी मुलांना दररोज शाळेत जाण्यासाठी आपला जीव धोक्यात घालावा लागतोय. गावात ना रस्ता आहे, ना नदीवर पूल आहे. त्यामुळे या मुलांना झाडांच्या फांद्या धरून नदी ओलांडावी लागते. स्वातंत्र्यापूर्वी जी परिस्थिती होती तशीच आज देखील परिस्थिती आहे. शिक्षणासाठी या मुलांचा हा प्रवास खूप धोकादायक बनला आहे.
आजही गंगापूर ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या गुलियांबा गावातील केलखाडी पाडा येथे रस्त्यासारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध नाहीत. शाळेत पोहोचण्यासाठी मुलांना दररोज नदी ओलांडावी लागते. नदीवर पूल नाही, त्यामुळे मुले झाडांच्या फांद्यांच्या मदतीने नदी ओलांडतात. पावसाळ्यात जेव्हा नदीला पूर येतो तेव्हा या मुलांचा अभ्यास पूर्णपणे विस्कळीत होतो. अनेक वेळा मुले नदीकाठी राहतात किंवा शाळेत पोहोचू शकत नाहीत.
हे ही वाचा>> Konkan Rain: मालवण, कुडाळमध्ये पूर.. सिंधुदुर्गातील पुराचे हे Video पाहून भरेल धडकी
चिमुकल्यांना जीव घालावा लागतो धोक्यात, तरीही शिक्षणाची आवड अबाधित
दररोजच्या या जीवघेण्या प्रवासात मुले घसरण्याचा किंवा जोरदार प्रवाहात वाहून जाण्याचा धोका नेहमीच असतो. असं असूनही, या मुलांचा अभ्यासाबद्दलचा उत्साह तसूभरही कमी झालेला नाही. ते कोणत्याही परिस्थितीत शाळेत जाण्याचा प्रयत्न करतात.









