डोंबिवली: बायकोसोबत मौजमजा करण्यासाठी पैसे पडायचे कमी, लाड पुरविण्यासाठी तरुण चोरायचा बाइक

Dombivli crime: बायकोचे लाड पुरविण्यासाठी एक व्यक्ती चक्क आलिशान बाइक चोरत असल्याचं समोर आलं आहे.
डोंबिवली: बायकोसोबत मौजमजा करण्यासाठी पैसे पडायचे कमी, लाड पुरविण्यासाठी तरुण चोरायचा बाइक
dombivli crime young man steals bike to fun with wife

मिथिलेश गुप्ता, डोंबिवली: आपल्या लाडक्या बायकोसोबत मौज-मजा करण्यासाठी पैसे कमी पडत असल्याने म्हणून महागड्या दुचाकी चोरी करून त्या विकून बायकोचे लाड पुरवणाऱ्या एका सराईत चोरट्याला मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे. दीपक सलगरे असे आरोपीचे नाव असून तो आपल्या साथीदारासह महागड्या दुचाकी चोरी करायचा.

चोरी केलेला या दुचाकी फायनान्स कंपन्यांकडून आणल्या असल्याचे भासवून दीपक या बाइक गरजू लोकांना स्वस्त गाडीचं आमिष दाखवून विकायचा. तर काही काही दुचाकी तो भंगारवाल्याला विकायचा. अखेर या टोळीचा पर्दाफाश करण्यात मानपाडा पोलिसांना यश आले आहे. याचप्रकरणी दीपक सलगरेसह सहा जणांना अटक करण्यात आली आहे.

कल्याण डीसीपी संजय गुंजाळ यांनी नागरिकांनी स्वस्त दुचाकीच्या आमिषाला बळी पडून चोरी केलेल्या दुचाकी विकत घेऊ नये. असं आवाहन नागरिकांना केलं आहे. अन्यथा इथून पुढे अशा दुचाकी विकत घेणाऱ्यांवर देखील गुन्हे दाखल करण्यात येतील असा इशारा देण्यात आला आहे.

मागील काही दिवसात कल्याण-डोंबिवली परिसरातील दुचाकी चोरीच्या घटना वाढल्या होत्या. कल्याण परिमंडळ 3 मध्ये या दुचाकी चोरट्याचा शोध घेण्यासाठी स्वतंत्र पथके स्थापन केली होती. मानपाडा पोलिसांच्या पथकाने ज्या परिसरात दुचाकी चोरी झाल्या होत्या त्या परिसरातील सीसीटीव्ही तपासून पाहिले. तसेच भंगाराच्या दुकानावर देखील निगराणी ठेवली होती.

याच सीसीटीव्हीमधून पोलिसांना काही संशयित आढळून आले. याच संशयितांवर बारीक नजर ठेवून पोलिसांनी अखेर दीपक सलगरे या चोरट्याला अंबरनाथ येथील पालेगाव येथे सापळा रचून अटक केली.

दीपक विरोधात आजमितीला मानपाडा, कोळसेवाडी, विठ्ठलवाडी, अंबरनाथ, नारपोली, उल्हासनगर व कल्याण बाजारपेठ पोलीस ठाण्यात मोटरसायकल चोरीचे गुन्हे दाखल आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, अंबरनाथ पालेगाव येथे राहणारा दीपक सलगरे याला आपल्या लाडक्या बायकोसोबत मौजमजा करण्यासाठी पैसे कमी पडत होते त्यामुळेच त्याने मोटरसायकल चोरी सुरू केली होती.

दीपक मोटरसायकल चोरी करायचा व त्याचा साथीदार राहुल डावरे यांच्या मदतीने तो लोकांना स्वस्त गाड्यांच्या आमिष दाखवून त्या विकायचा. या गाड्या फायनान्स कंपनीमधून खेचून आणल्या आहेत. असे सांगून तो ग्राहकांना देत. पण मुळात तो चोरीच्या गाड्या नागरिकांचे माथी मारत होता. तसेच काही गाड्या त्याने भंगारच्या व्यवसाय करणाऱ्या चिनमून चौहान उर्फ बबलू याला देखील विकल्या होत्या.

बबलू या गाड्या स्क्रॅप करून त्या धर्मेंद्र चौहान, समशेर खान, भैरवसिंग खरवड यांच्यामार्फत इतरांना विकत होता. पण अखेर पोलिसांनी या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात यश मिळवले आहे.

dombivli crime young man steals bike to fun with  wife
पंढरपूर : मोटारसायकल चोरी करणाऱ्या टोळीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

याप्रकरणी पोलिसांनी दीपक सलगरेसह सहा जणांना ताब्यात घेतलं. या प्रकरणात मानपाडा पोलिसांनी 17 दुचाकी 23 दुचाकींचे इंजिन इतर पार्ट्स, एक कटर मशीन असा 8 लाख 24 हजारांचा मुद्देमाल जप्त केला .

त्यांनी याआधी देखील इतर ठिकाणी चोरी केली असल्याचा संशय पोलिसांना असून पुढील तपास मानपाडा पोलीस करत आहेत.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in