वडिलांनी केलं दोन महिलांसोबत लग्न अन् नंतर पहिल्या मुलीसोबत केलं घृणास्पद कृत्य! 6 दिवसांपर्यंत...
वडिलांनी आपल्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत घृणास्पद कृत्य केल्याची बातमी समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरोपी वडिलांनी दोन महिलांसोबत लग्न केल्याचं सांगितलं आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

वडिलांनी केलं दोन महिलांसोबत लग्न

पहिल्या मुलीसोबत केलं घृणास्पद कृत्य!
Crime News: बिहारच्या शिवहर जिल्ह्यातील पिपराही पोलीस स्टेशन परिसरात एक संतापजनक घटना घडल्याचं समोर आलं आहे. येथील एका गावात वडिलांनी आपल्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत घृणास्पद कृत्य केल्याची बातमी समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरोपी वडिलांनी दोन महिलांसोबत लग्न केल्याचं सांगितलं आहे. आरोपीने त्याच्या पहिल्या पत्नीच्या मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. सध्या, पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याची माहिती आहे.
6 दिवस घृणास्पद कृत्य...
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी वडिलांनी आपल्या मुलीला 6 दिवस बंदिस्त ठेवून तिच्यासोबत घृणास्पद कृत्य करत राहिल्याची पीडित तरुणीने महिला पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावेळी, पीडितेने संधी साधून 112 नंबर डायल केला आणि संपर्क साधला. घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने मुलीच्या घरी पोहोचले आणि पीडितेला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन आले. मुलीचा जबाब आणि मेडिकल टेस्टच्या आधारे पोलिसांनी पीडितेच्या वडिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सध्या, आरोपी फरार असून त्याच्या अटकेसाठी छापे टाकले जात असल्याचं पोलिसांनी सांगितलं.
हे ही वाचा: उपसरपंचाला कसा लागला बाईचा नाद? महागडे गिफ्ट पाहून पूजा व्हायची खुश..खतरनाक लव्ह स्टोरीचा 'असा' झाला THE END
मेहुणीसोबत केलं दुसरं लग्न...
आरोपीला त्याच्या लग्नानंतर काही वर्षांनी पीडित मुलगी झाली होती. काही काळानंतर, कौटुंबिक वादामुळे आरोपीने त्याच्या पत्नीला घराबाहेर काढलं आणि आपल्या मेहुणीसोबतच दुसरं लग्न केलं. दुसऱ्या पत्नीपासून त्याला तीन मुलं आणि एक मुलगी झाली. पहिली पत्नी तिच्या मुलीसोबत आपल्या माहेरी राहत होती. त्यावेळी तिने देखील दुसरं लग्न केलं आणि तिच्या नवऱ्यासोबत ती परदेशात निघून गेली. त्या काळात, पीडिता तिच्या आजोळी राहत होती. मात्र, चार महिन्यांपूर्वी आरोपी त्याच्या पहिल्या मुलीला आपल्यासोबत घेऊन आला.
हे ही वाचा: Beed: बायकोकडून नवऱ्याला बेदम मारहाण, प्रायव्हेट पार्टवर मारल्या लाथा.. पतीचा जागीच गेला जीव!
नुकतंच, आरोपीचे तिच्या दुसऱ्या पत्नीसोबत सुद्धा वाद झाले आणि त्यामुळे ती आपल्या मुलांना घेऊन घर सोडून निघून गेली. त्यानंतर, आरोपी आणि पीडिता घरात एकटेच राहत होती. यादरम्यान, वडिलांनी आपल्या मुलीला घरात बंदिस्त केलं आणि तिच्यासोबत दृष्कृत्य केलं. त्यानंतर, पीडितेने 112 डायल करून पोलिसांना सगळ्या घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि पीडितेला तिच्या वडिलांच्या तावडीतून सोडवलं. पोलिसांनी मुलीचा जबाब नोंदवला आणि तिची वैद्यकीय तपासणी केली.
पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी वडिलांच्या अटकेसाठी छापे टाकले जात आहे.