गुवाहाटीचा ‘तो’ किस्सा अन् एकनाथ शिंदेंसह सर्वांनाच हसू झालं अनावर; ‘गोविंदा’ काय म्हणाले?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

-मिथिलेश गुप्ता, कल्याण

दहीहंडी उत्सवानिमित्ताने मुंबई, ठाणे, पुण्यासह विविध ठिकाणी राजकीय पक्षांचं जोरदार शक्तीप्रदर्शन बघायला मिळालं. मुख्यमंत्री बनलेल्या एकनाथ शिंदेंनीही विविध ठिकाणच्या दहीहंडी सोहळ्यांना उपस्थिती लावत समर्थकांचा उत्साह वाढला. डोबिंवलीतील दीपेश म्हात्रे यांच्या दहीहंडीला उपस्थित राहण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी होडीने प्रवास केला. याच कार्यक्रमात सूरत, गुवाहाटीच्या प्रसंगावरून किस्सा घडला आणि मुख्यमंत्र्यांनाही हसू आवरता आलं नाही.

डोंबिवली पश्चिमेतील सम्राट चौकात शिंदे समर्थक आणि केडीएमसीचे माजी सभापती दीपेश म्हात्रे यांनी दहीहंडीचे आयोजन केले होते. या दहीहंडीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रात्री साडेअकरा वाजता हजेरी लावत मोठा शक्ती प्रदर्शन केलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भिवंडी मानकोली दिवे-अंजुर ते डोंबिवली मोठागाव असा बोटीने प्रवास करून आणि डोंबिवलीची खाडी पार करून दीपेश म्हात्रे यांच्या हंडीला आले.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच डोंबिवलीत आले. यावेळी शिंदे गटाकडून मोठं शक्तिप्रदर्शनही करण्यात आलं.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समर्थकांना काय म्हणाले?

यावेळी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, ‘हे सरकार सर्वसामान्यांचं आहे. तुमचं आमचं सर्वांचं आहे. मुख्यमंत्री मीच नाही, तर तुम्ही सर्व आहात. गेल्या एक महिन्यात सरकारने 700 महत्वाचे निर्णय घेतले. येताना बोट चांगली होती. सुरक्षेसाठी योग्य होती. कार्यकर्त्यांच्या आग्रह होता म्हणून बोटीने प्रवास केला. सर्वत्र मला प्रेम मिळत आहे.”

ADVERTISEMENT

मुंबई -सुरत- गुवाहाटी …तो किस्सा अन् एकच हशा

आम्ही देखील काही दिवसांपूर्वी 50 थरांची राजकीय हंडी फोडली, अस सांगत शिंदे यांनी केलेल्या बंडाचा उल्लेख केला. इतकंच नाही तर मुंबई, सुरत, गुवाहाटी या प्रवासाचीही आठवण करून दिली. तितक्यात गोविंदा म्हणाले, गोवा बोलायचं राहून गेलं. हे ऐकल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यासह उपस्थितांना हसू आवरलं नाही.

ADVERTISEMENT

“कोरोनानंतर आज सर्वत्र उत्साह दिसत आहे. निर्बंधमुक्त दहीहंडी साजरी होत आहे. गणेशोत्सवसुद्धा जोरात साजरा करूयात. आता प्रो-गोविंदा सुद्धा सुरू होणार आहे. हे शिवसेना आणि भाजप युतीचे सरकार असून, आपल्या सर्वांचे सरकार आहे. स्व बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघें यांना अभिप्रेत असणार हे सरकार आहे. हे सरकार हिंदू संस्कृती आणि परंपरा पुढे घेऊन जात आहेत”, असं एकनाथ शिंदे या कार्यक्रमात म्हणाले.

…अन् एकनाथ शिंदेंनी डीजे बंद करायला

डोंबिवलीत उशिरा आल्यानंतर स्टेजवर येताच डीजे बंद करा, अशी विनंती एकनाथ शिंदे यांनी कार्यकर्त्यांना केली. त्याचबरोबर स्पीकर्सचा आवाजही कमी करायला सांगितलं. ‘आपण नियम पाळले पाहिजेत’, असं आवाहन शिंदे यांनी केलं. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर रात्री दहानंतर घेतलेल्या सभा आणि मिरवणुकांवरून टीका केली होती. पावसाळी अधिवेशनातही अजित पवारांनी याचं मुद्द्यावरून मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला होता.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT