दिल्लीत गडकरी, फडणवीस आणि जयंत पाटीलांची एकत्रित बैठक

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

भाजप आणि राष्ट्रवादीचे नेते एकत्र आले महाराष्ट्राच्या राजकारणात खळबऴ उडते. देशाच्या राजधानीत दिल्लीत आज पर्यावरण मंत्री नितीन गडकरी, राज्यातील विधान सभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील हे एकत्र आले होते.

महाराष्ट्राच्या सिंचन प्रकल्पासंदर्भात ग़डकरी, फडणवीस आणि जयंत पाटील यांची दिल्लीत एकत्रित बैठक झाली. नागपूरचा गोसीखुर्द प्रकल्प, पुण्याच्या मुळा-मुठा नदीचे सुशोभीकरण आणि नाग नदीचे पुनरुज्जीवन या तीन विषयांवर ही बैठक होती.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

बैठकीला पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, नागपूरचे महापौर दयाशंकर तिवारी पुण्याचे खासदार गिरीश बापट आदि मंडळी उपस्थित होते.

या बैठकीत गोसीखुर्द प्रकल्प 2023 पर्यंत पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला. या प्रकल्पासाठी एकूण 5 हजार कोटींचा खर्च येणार आहे.

ADVERTISEMENT

नागपूरची पुरातन नाग नदीचं पुनरुज्जीवन करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला. हा प्रकल्प एकूण 1700 कोटी रुपयांचा प्रकल्प आहे.

ADVERTISEMENT

पुण्यातील 1200 कोटींचा मुळा-मुठा नदीचा पुरुज्जीवन करण्याचा प्रकल्प लवकर पुर्ण करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT