चिनी लोन अ‍ॅपच्या जाळ्यात फसला, इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांने आयुष्य संपवलं - Mumbai Tak - harrassed by chinese laon app agent bengaluru student dies by suicide - MumbaiTAK
बातम्या

चिनी लोन अ‍ॅपच्या जाळ्यात फसला, इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांने आयुष्य संपवलं

बंगळुरुत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत चिनी लोन अॅपला बळी पडून एका 22 वर्षीय इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेने परीसरात हळहळ व्यक्त होत आहे.
harrassed by chinese laon app agent bengaluru student dies by suicide

मध्यप्रदेशच्या भोपालमधून एका कुटुंबाने सामूहिक आत्महत्या केल्याची घटना घडली होती. डिजिटल लोन अॅपमधून घेतलेले लोन चुकवता न आल्याने व एजंटच्या छळाला कंटाळून त्याने दोन मुलांना विष पाजून आणि पती-पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या घटनेने देश हादरला असतानाचतआता बंगळुरुत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत चिनी लोन अॅपला बळी पडून एका 22 वर्षीय इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेने परीसरात हळहळ व्यक्त होत आहे. (harrassed by chinese laon app agent bengaluru student dies by suicide)

चिनी लोन अॅपला आतापर्यंत अनेक लोक बळी पडली आहे. अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत. आता या चीनी लोन अॅपमुळे बंगळुरू येथील इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांने मृत्यूला कवटाळले आहे. तेजस असे या मृत विद्यार्थ्यांचे नाव आहे. मृत विद्यार्थ्याने या चिनी लोन अॅपच्या मदतीने काही रक्कम कर्ज स्वरूपात घेतली होती. या रक्कमेची त्याला परतफेड करता आली नव्हती. त्यामुळे एजंटने त्याचा छळ सुरु केला होता. या छळाला कंटाळून त्याने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं आहे.

हे ही वाचा : 8 जणांकडून सामूहिक बलात्कार: महिलेचा यू-टर्न, पोलिसांनी लावला डोक्याला हात, काय घडलं?

तेजसने बंगळुरूमधील जलहल्ली येथील राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. तो येलहंका येथील नित्ते मीनाक्षी कॉलेजमध्ये इंजिनीअरिंगचे शिक्षण घेत होता. तेजसने ज्या चिनी अॅपमधून लोन घेतले होते. त्या अॅपच्या माध्यमातून लोन रिकव्हरी करणाऱ्या एजंटने तेजसला छळायला सुरूवात केली होती. तेजसने पैसे परत न केल्यास त्याचे प्रायवेट फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली होती. या छळातून तेजसने आत्महत्या केली आहे.

तेजसच्या कुटुंबीयांनी सांगितले की, तेजसने ‘स्लाइस अँड किस’ या चिनी अॅपवरून कर्ज म्हणून काही रक्कम घेतली होती. मात्र, तो रक्कम परत करू शकला नव्हता. तसेच तेजसच्या मृत्यूच्या तीन दिवस आधी वडील गोपीनाथ यांनी थकीत कर्जाची परतफेड करण्यासाठी अतिरिक्त वेळ मागितली होती, परंतु कर्जदाराने ते मान्य केले नाही. याउलट तेजसच्या घरी जाऊन धमकावले, त्याचे फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. या छळाला कंटाळून
त्याने आता आत्महत्या केली आहे. या प्रकरणी आता पोलि्स ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस करत आहेत.

हे ही वाचा : Crime : ‘या’ अ‍ॅपमुळे कुटुंबच संपलं! मुलांना दिलं विष अन् पत्नीसह घेतला गळफास

Magic Moments vs Smirnoff Vodka: लोकांच्या आवडत्या Vodka मध्ये ‘हा’ आहे फरक? भारतातील ती 10 शहरे… जिथे आहेत सर्वाधिक अब्जाधीश; मुंबईचा नंबर…? आईचा मृत्यू अन्… 144 किलोच्या महिलेने घटवलं 75 किलो वजन! रश्मिकानंतर आता दुसऱ्या हिरोईनसोबत रणबीरचे ‘ते’ सीन्स! मुलींमधील ‘हे’ विशेष गुण पाहून मुलं होतात आकर्षित… IPL च्या इतिहासात सर्वाधिक षटकार ठोकणारे ‘ते’ 5 खेळाडू कोण? Film पाहण्याची आवड आहे? मग ‘हे’ प्रेरणादायी चित्रपट एकदा बघाच! Belly Fat कमी करण्यासाठी अगदी सिंपल डाएट प्लान! हिवाळ्यात आळस न करता Weight Loss साठी घरीच करा ‘या’ सोप्या गोष्टी! UPSC : चार वेळा अपयश, पण मानली नाही हार; IRS अधिकारी प्रेरणादायी स्टोरी 144 किलोच्या महिलेने घटवलं 75 किलो वजन; खायची फक्त ‘या’ 8 गोष्टी… चाळीशीतही हॉट आणि फीट! अभिनेत्री nimrat kaur च्या फिटनेसचा विषयच नाही Vacation प्लान करताय? मग भारतातच अनुभवा हे विदेशी सौंदर्य! Weight Loss साठी ‘हा’ स्पेशल चहा एकदा पिऊनच पाहा! अंथरुणावर पडल्यावर लगेच झोप येते असेल तर वेळीच सावध व्हा… ही 5 फळे किडनीसाठी असतात फायदेशीर रक्तातील शुगर कधीच वाढणार नाही, फक्त एवढंच करा Vicky Kaushal वर सचिन तेंडुलकर इम्प्रेस; कारण… Alcohol चा रिकाम्या पोटी कसा होतो परिणाम? ‘या’ 5 गोष्टी खाऊन चुटकीसरशी घटवा Belly Fat!