अमरावाती: केंद्र सरकारने वारेमाप करवाढ करून पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवले आहेत. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती कमी झालेल्या असताना देखील पेट्रोल आणि डिझेलच्या करात अवास्तव वाढ करून सर्वसामान्य नागरिकांची लूट करण्याचे कारस्थान केंद्र सरकारने चालवले आहे. त्याचा निषेध म्हणून युवक काँग्रेसचे प्रदेश महासचिव सागर देशमुख यांच्या नेतृत्वात आज युवक काँग्रेसच्या कार्यकत्यांनी थेट घोड्यावर बसून आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधले आहे.
पेट्रोल आणि डिझेल आता सर्वसामान्य नागरिकांना परवडणारे राहिले नसून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कृपेने पुन्हा एकदा घोडा हाच सर्वसामान्यांचे वाहन बनणार असल्याचा म्हणत सागर देशमुख यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.
अमरावतीतील राजकमल चौक येथून युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घोड्यावरून स्वारी करत शहरातील विविध पेट्रोल पंप तसेच चौकात उभे राहून केंद्र सरकारविरोधात निषेध व्यक्ता केला आहे. ठिकठिकाणी निदर्शने करून केंद्र सरकारच्या धोरणाचा निषेध युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी नोंदवित नागरिकांना जागृत होण्याचा संदेश दिला.
आता सरकारला पेट्रोल-डिझेलवर बोलण्याचा अधिकार नाही– फडणवीसांचा टोला
यावेळी पेट्रोल पंपाच्या बाहेर उभे राहून युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी नागरिकांनी आता वाहनं सोडून घोडा विकत घ्यावा कारण पेट्रोल आणि डिझेल आता सामान्यांना परवडणारे नाही. असं म्हणत मोदी सरकारची खिल्ली उडवली आहे. केंद्रातील सरकार हे सामान्यांच्या जीवावर उठले असून गॅस बंद करून, चूल पेटवा आणि गाड्या सोडून घोडा विकता घ्या असे. असं म्हणत टीका करण्यात आली आहे.
दरम्यान, या आंदोलनला युवक काँग्रेसचे पदाधिकारी आणि अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. कोरोनाच्या काळात अधिक संख्येने आंदोलन करता येत नसल्याने आम्ही सर्व प्रकारचे नियम पाळून केंद्र सरकारला जाग आणून देण्यासाठी हे आंदोलन पुकारले आहे. मात्र, केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या किंमती कमी न केल्यास आणखी तीव्र आंदोलने करू. असा इशारा देखील युवक काँग्रेसने दिला आहे.