Ind vs Aus : ऑस्ट्रेलियाच्या विजयानंतर टीम इंडियाचा WTC चा प्रवास खडतर, जाणून घ्या समीकरण - Mumbai Tak
Mumbai Tak /बातम्या / Ind vs Aus : ऑस्ट्रेलियाच्या विजयानंतर टीम इंडियाचा WTC चा प्रवास खडतर, जाणून घ्या समीकरण
बातम्या स्पोर्ट्स

Ind vs Aus : ऑस्ट्रेलियाच्या विजयानंतर टीम इंडियाचा WTC चा प्रवास खडतर, जाणून घ्या समीकरण

Australia Qualified for WTC Final : ऑस्ट्रेलियाने इंदूर टेस्ट सामना 9 विकेटने जिंकून टीम इंडियाचा पराभव केला आहे. या विजयासह ऑस्ट्रेलिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपसाठी (WTC Final) पात्र ठरली आहे. ऑस्ट्रेलियाच्या (Australia) विजयानंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचे समीकरण पुर्णत बदलले आहे. आता नेमका काय बदल झाला आहे. ऑस्ट्रेलिया तर फायनलमध्ये दाखल झाली आहे, पण टीम इंडियाचं (Team India) काय? टीम इंडियाचा प्रवास खडतर असणार आहे का? चला जाणून घेऊयात. (ind vs aus test big change in wtc points table after australia win know the equation)

असा रगंला सामना

तिसऱ्या टेस्ट सामन्यात टीम इंडियाचा (Team India)पहिला डाव 109 धावांत ऑल आऊट झाला. या प्रत्युरात ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 197 धावा करत 88 धावांची आघाडी घेतली होती. नॅथन लायनच्या गोलंदाजीसमोर टीम इंडियाने गुडघे टेकले आणि दुसरा डाव 163 धावांवर आटोपला. त्यामुळे टीम इंडियाने ऑस्ट्रेलियासमोर 76 धावांचे माफत लक्ष्य ठेवलं. हे लक्ष्य ऑस्ट्रेलियाने 9 विकेट राखून सहज पुर्ण केले आणि मालिकेत पहिला विजय मिळवला. ऑस्ट्रेलिया या विजयानंतर WTC च्या फायनलमध्ये दाखल झाली आहे. दरम्यान WTCचे पॉईंट्स टेबल कसं आहे, ते पाहूयात.

IND vs AUS : टीम इंडियाच्या पराभवाची 5 प्रमुख कारणे? जाणून घ्या

पॉईंटस टेबल काय सांगतो?

ऑस्ट्रेलियाच्या विजयानंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (WTC Points Table) पॉईंटस टेबलमध्ये मोठा बदल झाला आहे. ऑस्ट्रेलिया हा सामना जिंकून पॉईंटस टेबलमध्ये आपले पहिले स्थान निश्चित केले आहे. तसेच ऑस्ट्रेलिया लंडनमधील ओव्हल येथे 7 जुनपासून खेळवल्या जाणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलसाठी पात्र ठरली आहे. सध्या पॉईंटस टेबलमध्ये ऑस्ट्रेलिया 11 सामन्यात 68.52 गुणासह ते पहिल्या स्थानावर आहेत.

टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलिया विरूद्ध पराभवानंतरही पॉईंट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानी कायम आहेत. 10 सामन्यातील विजयासह 60.29 गुणासह ते दुसऱ्या स्थानी आहेत. भारताला जर फायनलमध्ये दाखल व्हायचे असले तर त्यांना ऑस्ट्रेलियाविरूद्ध शेवटचा सामना जिंकणे आवश्यक असणार आहे.

IND vs AUS: टीम इंडियाची विजयाची हॅट्रिक हुकली, ऑस्ट्रेलियाचा पहिला विजय

WTCचं समीकरण काय?

टीम इंडिया जर ऑस्ट्रेलिया (India vs Australia) विरूद्धचा शेवटचा टेस्ट सामना हरली तर त्यांना 9 मार्चपासून सुरू होणाऱ्या न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका कसोटी मालिकेच्या निकालावर अवलंबून राहावे लागणार आहे. दरम्यान WTC च्या अंतिम फेरीच्या शर्यतीत अजूनही श्रीलंका आहेत. कारण पॉईंट्स टेबलमध्ये श्रीलंका पाच विजयांसह 53.33 च्या गुणासह तिसऱ्या स्थानावर आहे.

WTC फायनलमध्ये पात्र होण्यासाठी श्रीलंकेला न्यूझीलंडविरुद्धचे (New Zealand vs Sri Lanka) उर्वरित दोन्ही कसोटी सामने जिंकणे आवश्यक आहे.श्रीलंका उरलेल्या दोनपैकी एकही सामना जिंकू शकले नाहीत तर ते बाद होतील आणि टीम इंडिया फायनलसाठी पात्र ठरणार आहे.

दरम्यान आता टीम इंडिया ऑस्ट्रेलिया विरूद्धचा शेवटचा टेस्ट सामना जिंकून WTC फायनलमध्ये आपले स्थान निश्चित करते की श्रीलंका न्युझीलंडविरूद्ध (New Zealand vs Sri Lanka) सामने जिंकून बाजी मारून जाते, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

गावातील मुलींचा रॅम्पवॉक पाहून सर्वच अवाक्… ऐश्वर्या रायच्या ‘या’ बॅगच्या किंमतीत तुम्ही सगळी ‘दुबई’ फिरून याल! दररोज 500 प्रपोजल, तरीही सिंगल, मॉडेल म्हणते, ‘मुले जवळ यायला घाबरतात’ अजब प्रेम कहाणी.. पतीला पाहताच पत्नीचा मृत्यू, असं घडलं तरी काय? रूममध्ये बोलावून केली अशी मागणी की, Swara Bhaskar हादरलीच! Ashish Vidyarthi : 60 व्या वर्षी लग्न अन् बायकोला घरी ठेवून गेला हनिमूनला Lalbaugcha Raja 2023 पाद्यपूजन सोहळा, पाहिलेत का? ‘हे’ खास Photo WTC अंतिम सामन्यात ‘या’ खेळाडूने शतक झळकावलं तर, भारताचा विजय निश्चित! अभिनेता Prabhas तिरुपतीमध्ये घेणार सात फेरे पण… शरीराचे वजन मोजण्यापूर्वी योग्य वेळ आणि ‘या’ गोष्टी लक्षात घ्या! Dhirendra Shastri : बाबा बागेश्वर लग्न करणार? म्हणाला… मुंबई-दुबईत घर, लक्झरी कार कलेक्शन; ‘Aishwarya Rai’ची पतीपेक्षा चौपट संपत्ती! IPL चा ‘हा’ स्टार खेळाडू मंदिरात लुंगी नेसून खेळला क्रिकेट, Video Viral ‘गणपती बाप्पा मोरया!’, Sara-Vicky ने घेतलं बाप्पाचं दर्शन; पोहोचले सिद्धीविनायक मंदिरात! ऋतुराज गायकवाडनंतर ‘हा’ IPL स्टार लग्नबंधनात अडकणार कॉन्सर्टमध्येच थांबवला…प्रसिद्ध गायिकेसोबत काय घडलं? प्रसिद्ध अभिनेत्यांची गर्लफ्रेंड लग्नाशिवाय दुसऱ्यांदा होणार आई ! वादळांना नावं कशी दिली जातात? समजून घ्या… अभिनेत्री Prajakta Mali चा बोल्ड लुक! ट्रोलर्स म्हणाले, ‘नको ग बाई..’ sonalee Kulkarni : अप्सरेचं पतीसोबत रोमँटिक फोटोशूट!