कमला हॅरिसच्या भाचीचाही शेतकरी आंदोलनाला पाठिंबा

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

पॉपस्टार रिहानाने भारतातल्या शेतकरी आंदोलनासंदर्भात ट्विट केल्यानंतर आता अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांची भाची मीना हॅरीस यांनीही आंदोलनाचं समर्थन करत सरकारवर टीका केली आहे. आपल्या ट्विटमध्ये त्यांनी लिहिलंय की, भारतात इंटरनेट बंद केले असून आंदोलक शेतक-यांविरुद्ध निमलष्करी दल तैनात केले आहेत. आपल्याला याचा राग यायला हवा, असं त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय. महिनाभरापूर्वीच जगातील सर्वात जुन्या लोकशाहीवर हल्ला करण्यात आला होता, जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीवर आता हल्ला होत आहे, हा योगायोग नसून परस्पर संबंधित आहे, असंही त्यांनी म्हटलंय.

यापूर्वी पॉपस्टार रिहानानेही शेतकरी आंदोलनावर ट्विट करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. रिहानाने ट्विटरवर एक बातमी शेअर केलीय. यात बातमीत शेतकरी आंदोलनामुळे इंटरनेट सेवा बाधित झाल्याचा उल्लेख आहे. तसंच शेतकरी आंदोलनामुळे हरयाणाच्या अनेक जिल्ह्यात इंटरनेट सेवा कशी बंद करण्यात आलीय, याची माहितीही या बातमीत देण्यात आलीय. याच बातमीवरून रिहानाला भारतातल्या शेतकरी आंदोलनाची माहिती झाली. त्यानंतर तिने हीच बातमी ट्विटरवर शेअर करून लिहिलं, आम्ही याविषयी बोलत का नाही. तिने आपल्या ट्विटसोबत #FarmersProtest असा हॅशटॅगही वापरलाय. त्यानंतर तिच्या ट्विटवरून कंगनाने तिच्यावर टीकाही केली होती.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

शिवाय, आपण भारतात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पाठीमागे भक्कमपणे उभे आहोत, असं पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्ग हिनेही आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय. शिवाय भारतीय पर्यावरणासाठी काम करणारी कार्यकर्ता लिसिप्रिया कंगुजम हिनेही दोन दिवसांपूर्वी ट्विट करत शेतकरी आंदोलनाला असलेला आपला पाठिंबा जाहीर केला होता.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT