MCA वर पवार-शेलार पॅनेलचा बोलबाला; अमोल काळेंपाठोपाठ नार्वेकर, आव्हाडही विजयी - Mumbai Tak - mumbai cricket association election news mca election detail result - MumbaiTAK
बातम्या राजकीय आखाडा

MCA वर पवार-शेलार पॅनेलचा बोलबाला; अमोल काळेंपाठोपाठ नार्वेकर, आव्हाडही विजयी

मुंबई : मागील काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या मुंबई क्रिकेट असोसिएशन अर्थात एमसीए निवडणुकीचा निकाल गुरुवारी सायंकाळी जाहीर झाला. या निकालात प्रामुख्यानं पवार-शेलार पॅनेलच वर्चस्व पहायला मिळत आहे. अध्यक्षपदी पवार-शेलार पॅनेलचे उमेदवार अमोल काळे यांचा मोठ्या मताधिक्क्याने विजय झाला. त्यांनी मुंबई क्रिकेट गटाचे उमेदवार संदीप पाटील यांचा पराभव केला. अमोल काळे यांना १८१ मत मिळाली. तर […]

मुंबई : मागील काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या मुंबई क्रिकेट असोसिएशन अर्थात एमसीए निवडणुकीचा निकाल गुरुवारी सायंकाळी जाहीर झाला. या निकालात प्रामुख्यानं पवार-शेलार पॅनेलच वर्चस्व पहायला मिळत आहे. अध्यक्षपदी पवार-शेलार पॅनेलचे उमेदवार अमोल काळे यांचा मोठ्या मताधिक्क्याने विजय झाला. त्यांनी मुंबई क्रिकेट गटाचे उमेदवार संदीप पाटील यांचा पराभव केला. अमोल काळे यांना १८१ मत मिळाली. तर संदीप पाटील यांना १५८ मत मिळली. यामुळे पुन्हा एकदा राजकारणी क्रिकेटरवर भारी पडल्याचं चित्र आहे.

याशिवाय सचिव पदावरती पवार-शेलार पॅनेलचे उमेदवार आणि बहुजन विकास आघाडीच्या पंकज ठाकूरांचे जावई अजिंक्य नाईक यांचा दणदणीत विजय झाला. अजिंक्य नाईक यांना तब्बल २८६ मत मिळाली. तर त्यांच्या विरोधातील उमेदवार मयांक खांडवाला यांना ३५ आणि ‘एमसीए’चे माजी अध्यक्ष रवी सावंत यांचे पुत्र नील सावंत यांना अवघी २० मत मिळाली.

सहसचिव या पदासाठी पवार-शेलार पॅनेलचे दीपक पाटील यांच्याविरुद्ध कुणीही उमेदवारी अर्ज केलेला नसल्याने त्यांची निवड बिनविरोध होणार झाली. एमसीए’च्या कोषाध्यक्षपदी पवार-शेलार पॅनेलचे अरमान मल्लिक यांनी विजय संपादन केला. त्यांना १६२ मत मिळाली. तर जगदीश आचरेकर यांना १६१ अशी मत मिळाली. आचरेकर यांचा अगदी थोडक्यात पराभव झाला आहे. कोषाध्यक्षपदाचे तिसरे उमेदवार संजीव खानोलकर यांना अवघी १८ मत मिळू शकली.

गव्हर्निंग काऊन्सिल या पदासाठी झालेल्या निवडणुकीत गणेश अय्यर यांनी २१३ मत मिळवत विजय प्राप्त केला. तर त्यांचे विरोधी उमेदवार मलिक मर्चंट यांना १२३ मत मिळाली. सोबतच एकनाथ शिंदे समर्थक आमदार प्रताप सरनाईक यांचे चिरंजीव विहंग सरनाईक हेही पवार-शेलार पॅनेलकडून मुंबई ट्वेन्टी ट्वेन्टी लीगच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवडून आले आहेत.

नार्वेकर-आव्हाडही विजयी :

याशिवाय या निवडणुकीत राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड, शिवसेना (ठाकरे गट) सचिव मिलिंद नार्वेकर आणि शिवसेनेच्या वाहतूक संघटनेचे निलेश भोसले हेही पवार-शेलार पॅनेलमधून अॅपेक्स काऊंन्सिलपदावर विजयी झाले आहेत. नार्वेकर यांना २२१, आव्हाड यांना १६३ तर निलेश भोसले यांना २१९ मत मिळाली. याचसोबत कौशिक गोडबोले – २०५, अभय हडप – २०५, सुरज सामत – १७०, मंगेश साटम – १५७, संदीप विचारे – १५४, प्रमोद यादव १५२ अशा मताने उमेदवार विजयी झाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

two × 4 =

Water Fastion पद्धतीने खरंच चुटकीसरशी होईल Weight Loss? Places to visit: भारतातच पण कमी बजेटमध्ये ‘या’ सुंदर ठिकाणांना नक्की भेट द्या! PM Modi कोणता फोन वापरतात? फोटो Viral रणदीप हुडाने मैतेई धार्मिक पद्धतीने का केलं लग्न? सांगितली फॅमिली प्लानिंग BB17: 19 वर्षीय अभिनेत्रीचे लाईव्ह ब्रेकअप, दुसरे नातेही तोडले Fitness पाहून वयाचा अंदाज लावणं कठीण; सुपरस्टार्स आहेत तरी किती वर्षांचे? Beauty Tips: चाळीशीत दिसा अगदी टीप-टॉप! फक्त ‘या’ गोष्टी करा फॉलो! महाराष्ट्राचे मिनी काश्मीर, पाचगणी-महाबळेश्वर हरवले धुक्यात …म्हणून परिणीतीने ॲनिमल सोडला Liplock नंतर रणबीर-रश्मिकाचा बेडरुम सीन व्हायरल, इंटिमेट सीनचा कहर ‘कपिल शर्मा शो’मध्ये ‘हा’ कलाकार घेतो सर्वाधिक मानधन? …तर आयुष्यभर कोलेस्ट्रॉल कमी नाही होणार सिगारेट सोडल्यानंतर शरीरामध्ये होतात ‘हे’ बदल दुधात साखर मिसळून पिता, तर आजच करा बंद …म्हणून हिवाळ्यात आलं खाणं ठरतं फायद्याचं Weight Loss: घरच्या घरी ‘हे’ 7 बेस्ट कार्डिओ वर्कआउट करा! नितळ अन् कोमल त्वचा हवीये? फॉलो करा हा ‘k’ फॉर्म्युला! दररोज ‘ही’ 5 छोटी कामं करून Belly Fat सहज करा कमी! ‘ही’ 5 पानं आहेत दीर्घायुष्याचं वरदान! अल्लू अर्जुनने केलं मतदान, ज्युनियर NTR ने लावली रांग; तेलंगणा मतदानात स्टार पॉवर!