Omicron चा 'या' लोकांना जास्त धोका, नव्या व्हेरिएंटपासून राहा सावध डॉक्टरांनी दिला इशारा

Omicron चा 'या' लोकांना जास्त धोका, नव्या व्हेरिएंटपासून राहा सावध डॉक्टरांनी दिला इशारा

दिल्ली, मुंबई या मोठ्या शहरांमध्ये कोरोनाचे रूग्ण वाढत आहेत. ओमिक्रॉन व्हेरिएंटचे रूग्णही मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. दिल्लीच्या सर गंगाराम हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या धीरेन गुप्ता यांनी सांगितलं की ओमिक्रॉन व्हेरिएंटची बाधा झालेल्या रूग्णांमध्ये अपर रेस्पिरेटरी म्हणजे श्वास नलिकेशी संबंधित जास्त बाधा झालेली पाहण्यास मिळाली आहे. 2 वर्षे किंवा त्यापेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी ही बाब धोकादायक आहे. मात्र 11-12 वर्षाच्या मुलांमध्ये या रोगाची लक्षणं जास्त दिसत असली तरीही धोका काहीसा कमी प्रमाणात आहे.

Omicron चा 'या' लोकांना जास्त धोका, नव्या व्हेरिएंटपासून राहा सावध डॉक्टरांनी दिला इशारा
AIIMS ने सांगितली ओमिक्रॉनची पाच धोकादायक लक्षणं, दिसली तर लगेच डॉक्टरांकडे जा

अपोलो रूग्णालयचे सीनीयर कंसल्टंट डॉ. सुरजीत चटर्जी यांनी सांगितली की काही रूग्णांमध्ये जुलाब होणं, उलट्या होणं ही लक्षणंही दिसत आहेत. काही रूग्णांना खाताना त्रास होतो आहे, काही जणांची भूक मंदावली आहे तर काही जणांमध्ये वास जाणं, तोंडाला चव नसणं ही लक्षणंही दिसून येत आहेत. ओमिक्रॉन हा विषाणू फरार काही इजा करत नाही असं समजू नका.

Omicron चा 'या' लोकांना जास्त धोका, नव्या व्हेरिएंटपासून राहा सावध डॉक्टरांनी दिला इशारा
लहान मुलांसाठी डेल्टापेक्षा जास्त घातक ठरू शकतो ओमिक्रॉन, काय म्हणत आहेत तज्ज्ञ?

डॉ. सुरनजीत चॅटर्जी यांनी हेदेखील सांगितलं की ओमिक्रॉनच्या रूग्णांना रूग्णालयात दाखल करण्याची वेळ येत नाहीये. मात्र जर अनियंत्रित डायबेटिस किंवा अस्थमाचे रूग्ण असतील तर त्यांना जास्त काळजी घेण्याची गरज आहे. ओमिक्रॉनचा संसर्ग त्यांना पटकन होऊ शकतो. कोरोनाचा नवा व्हेरिएंट अशा लोकांना पटकन ग्रासू शकतो असंही डॉक्टरांनी म्हटलं आहे. युवकांना ओमिक्रॉनचा धोका त्या तुलनेत कमी आहे. मात्र प्रतिकार शक्ती कमी असलेल्या लोकांनी आणि डायबेटिस किंवा इतर सहव्याधी असलेल्या लोकांनी जास्त काळजी घेण्याची गरज आहे.

डॉ. चॅटर्जी यांनी हेदेखील सांगितलं की ओमिक्रॉनचा संसर्ग झालेल्या या रूग्णांमध्ये डेल्टा व्हेरिएंटचीही काही लक्षणं पाहण्यास मिळाली आहेत. जिभेची चव जाणं, वास जाणं अशी लक्षणं पाहण्यास मिळाली आहेत. कधी कधी असेही रूग्ण असतात जे पाहून सांगता येणं कठीण असतं की त्यांना ओमिक्रॉनचा संसर्ग झाला की डेल्टा व्हेरिएंटचा? या दोन्ही व्हेरिएंटची लक्षणं एकमेकांशी मिळतीजुळती आहेत असंही दिसून आल्याचं डॉ. चॅटर्जी यांनी सांगितलं.

जागतिक आरोग्य संघटनेनं या व्हेरिएंटला ओमिक्रॉन असं नाव दिलं आहे.
जागतिक आरोग्य संघटनेनं या व्हेरिएंटला ओमिक्रॉन असं नाव दिलं आहे.Omicron Variant/India today

ओमिक्रॉनची लक्षणं असणारे रूग्ण किती दिवसात बरे होतात? असा प्रश्न विचारल्यानंतर डॉ. चॅटर्जी म्हणाले की साधारण तीन दिवस ते सात दिवस या कालावधीत रूग्णामध्ये सुधारणा दिसू लागतात. पहिल्या दिवशी रूग्णाचा घसा मोठ्या प्रमाणावर दुखत असतो. त्यानंतर 102 किंवा 103 पर्यंत ताप येतो. तसंच डोकं दुखणं आणि अंगदुखी या तक्रारीही जाणवतात. तीन दिवसांपर्यंत ही लक्षणं दिसतात. पाचव्या दिवसांपर्यंत ही कमी होतात आणि सातव्या दिवसापर्यंत रूग्ण बरा होतो असंही चॅटर्जी यांनी सांगितलं.

जर रूग्णांमध्ये ताप तीन दिवसांपेक्षा जास्त कालावधीसाठी राहिला तर नक्कीच चिंतेची बाब आहे. ज्यांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतलेली नाही अशांसाठीही ओमिक्रॉन व्हेरिएंट घातक ठरू शकतो. मात्र ज्यांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे त्यांच्यावर ओमिक्रॉन व्हेरिएंटचा फारसा परिणाम होताना दिसत नाही असंच चित्र आहे. त्यामुळेच लवकरात लवकर कोरोना प्रतिबंधक लस घ्यावी असं आवाहन WHO नेही केलं आहे असंही डॉ. चॅटर्जी यांनी स्पष्ट केलं.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in