नागपूरच्या ब्राह्मणी गावात अश्लीलतेचा कळस! डान्स हंगामा कार्यक्रमात सेमी न्यूड नृत्य
नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यातील गावांमध्ये डान्स हंगामाच्या नावावर अश्लील केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यातील ब्राह्मणी या गावात नुकताच एक डान्स हंगाम कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यामध्ये डान्स हंगामाच्या नावाखाली स्टेजवर नाच करणाऱ्या तरूण-तरूणींचा विविस्त्र, अर्धनग्न अवस्थेत नाचतानाचा व्हीडिओ व्हायरल झाला आहे. डान्स हंगामाच्या नावावर अश्लील नृत्याचा व्हिडिओ नागपूर जिल्ह्यात वेगाने […]
ADVERTISEMENT

नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यातील गावांमध्ये डान्स हंगामाच्या नावावर अश्लील केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यातील ब्राह्मणी या गावात नुकताच एक डान्स हंगाम कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यामध्ये डान्स हंगामाच्या नावाखाली स्टेजवर नाच करणाऱ्या तरूण-तरूणींचा विविस्त्र, अर्धनग्न अवस्थेत नाचतानाचा व्हीडिओ व्हायरल झाला आहे. डान्स हंगामाच्या नावावर अश्लील नृत्याचा व्हिडिओ नागपूर जिल्ह्यात वेगाने व्हायरल झाला आहे.
योगेश पांडे, प्रतिनिधी, नागपूर
नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यात हॉट हंगामा, इलेक्स जुली के हंगामे, सिम्पल हंगामे या नावांनी डान्स हंगामा कार्यक्रमाचे आयोजन गावोवावी केले जात असल्याची माहिती समोर आली आहे. नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यातील बाम्हणी गावातील डान्स हंगामाच्या नावावर अश्लील नृत्याचा व्हिडियो व्हायरल झाल्यानंतर आता अन्य आजू बाजूच्या गावातील डान्स हंगामाचे कार्यक्रम रद्द करण्यात आले असल्याची माहिती उमरेड तालुक्यातील काही ग्रामस्थांनी मुंबई तक ला दिली आहे.
काय आहे व्हायरल व्हीडिओमध्ये?
या डान्स हंगामा कार्यक्रमाचे दोन-तीन व्हीडिओ व्हायरल झाले आहेत. त्यामध्ये दोन तरूण आणि तरूणी स्टेजवर नाच करत आहेत. नाच करतानाच ते अंगावरचे कपडे काढून टाकत आहेत. अर्धनग्न अवस्थेत अत्यंत अश्लील हावभाव आणि कृती करत बीभत्सपणे नाचत आहेत. डान्स हंगामाच्या नावाखाली हा सगळा प्रकार पाहून उपस्थित असलेले लोकही मोठमोठ्याने ओरडत आहेत. असं सगळं असणारा हा व्हीडिओ नागपूरमध्ये चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हीडिओत एक तरूणी अंतर्वस्त्रांवरच नाचत असल्याचंही दिसतं आहे. त्यामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे.
चंद्रशेखऱ बावनकुळेंचा पोलिसांवर हप्तावसुलीचा आरोप
नागपूर जिल्ह्यात ग्रामीण भागात अश्लील आणि बीभत्स नृत्याचे प्रकार उघडकीस होत आहेत. बेकायदेशीररीत्या सुरु असलेले धंदे, सट्टापट्टी याकडे पालकमंत्र्यांचं मुळीच लक्ष नाही. पोलिसांना या सगळ्याबाबत माहिती आहे मात्र हप्तेवसुली करून ते गप्प बसले आहेत. शहरात आणि शहराबाहेरच्या फार्महाऊसवर असे प्रकार सुरू आहेत असा आरोप भाजप नेते आणि माजी उर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.
पोलिसांचं काय म्हणणं आहे?
या संपूर्ण प्रकरणावर नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विजय मगर यांनी सांगितले की या गावामध्ये आयोजित करण्यात आलेल्या डान्स हंगामामध्ये अश्लील नृत्य केल्याची माहिती आम्हाला प्राप्त झालेली आहे. त्यानुसार आम्ही आयोजकांवर गुन्हे दाखल करणार आहे. तसेच या कार्यक्रमाची कुठलीही परवानगी स्थानिक पोलिसांमार्फत आयोजकांनी घेतलेली नसल्याचंही त्यांनी मुंबई तकशी बोलताना सांगितलं.