Pahalgam Attack: 28 निष्पापांना ठार करणारे हेच ते नराधम... फोटो आणि स्केच आलं समोर
Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवाद्यांना हुडकून काढण्यासाठी सुरक्षा एजन्सींनी शोध मोहीम सुरू केली आहे. नुकतेच दहशतवाद्यांची चित्रं देखील समोर आली आहेत. त्याआधारे आता त्यांचा शोध घेतला जात आहे.
ADVERTISEMENT

पहलगाम (जम्मू-काश्मीर): जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील एका हल्लेखोराचा पहिला फोटो समोर आला आहे. हा फोटो घटनास्थळाचा आहे, ज्यामध्ये तो हातात रायफल घेतलेला दिसत आहे. पण हा त्याचा पाठमोरा फोटो असल्याने दहशतवाद्याचा चेहरा दिसत नाही. दरम्यान, आता 3 दहशतवाद्यांचे स्केचेस समोर आले आहेत. प्रत्यक्षदर्शींनी केलेल्या वर्णनाच्या आधारे तीन दहशतवाद्यांचे स्केचेस तयार करण्यात आले आहेत.
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवाद्यांसाठी शोध मोहीम राबविण्यात येत आहे. या हल्ल्यानंतर NIAचे पथक हे तात्काळ श्रीनगरमध्ये पोहोचले आहे. तसेच घटनास्थळी फॉरेन्सिक पथके देखील उपस्थित आहेत. लष्कर, सीआरपीएफ, एसओजी आणि जम्मू पोलिसांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला आहे. हेलिकॉप्टर आणि ड्रोनच्या मदतीने दहशतवाद्यांचा शोध घेतला जात आहे. तर दुसरीकडे मुघल रोडवर सीआरपीएफ आणि जम्मू-काश्मीर पोलीस तैनात करण्यात आले आहेत.

तीन दहशतवाद्यांचे स्केच जारी

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, साधरण सहा दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये हा भ्याड हल्ला केला होता. ज्यामध्ये त्यांनी निष्पाप लोकांचे बळी घेतले.
हे ही वाचा>> "जा..मोदीला जाऊन सांग...", दहशतवाद्यांनी पतीला मारलं ठार, पत्नीने सांगितला हल्ल्याचा A टू Z थरार!

काही प्रत्यक्षदर्शी पर्यटक आणि स्थानिकांच्या मते या हल्ल्यात दोन पाकिस्तानी दहशतवादी देखील सहभागी होते. कारण हल्ल्यावेळी ते एकमेकांशी पश्तूमध्ये बोलत होते.