'तो' होता Navy अधिकारी.. नुकतंच झालेलं लग्न, पत्नीसोबत आलेला हनिमूनला अन्...

मुंबई तक

Pahalgam Terror Attack: नौदलाचे अधिकारी लेफ्टनंट विनय नरवाल यांचा दहशतवादी हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला. नुकतंच लग्न झालेल्या विनय यांची कहाणी तुमचंही काळीज पिळवटून टाकणारी आहे.

ADVERTISEMENT

Navy अधिकाऱ्याचा दहशतवादी हल्ल्यात मृत्यू
Navy अधिकाऱ्याचा दहशतवादी हल्ल्यात मृत्यू
social share
google news

पहलगाम (जम्मू-काश्मीर): पहलगाम दहशतवादी हल्ल्यात भारतीय नौदलाने आपला एक तरुण अधिकारी गमावला आहे. लेफ्टनंट विनय नरवाल कोची येथे तैनात होते. 16 एप्रिल रोजी त्यांचे लग्न झाले होते आणि ते हनिमूनसाठी काश्मीरला आले होते. पण दुर्दैवाने लग्नाच्या काही दिवसातचच विनय नरवाल यांनी दहशतवादी हल्ल्यात आपले प्राण गमावले. लेफ्टनंट विनय नरवाल आणि त्यांची पत्नी हे काही दिवसांपूर्वी श्रीनगरला पोहोचले होते आणि नंतर अत्यंत निसर्गरम्य असलेलं पहलगाम पाहण्यासाठी गेले होते. पण इथेच त्यांचा घात झाला. कारण दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, या घटनेनंतर पतीच्या मृतदेहाशेजारी बसलेल्या पत्नीची फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

विनय नरवाल हे 2 वर्षांपूर्वीच नौदलात भर्ती झाले होते. विनय हे पत्नीसोबत सोमवारी श्रीनगरला गेले होते. त्याचे कुटुंब कर्नालच्या सेक्टर 7 मध्ये राहते. 

पहलगाम शहराजवळील एका प्रसिद्ध पर्यटन स्थळाजवळ दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात दोन परदेशी नागरिकांसह एकूण 26 जणांचा मृत्यू झाला. 2019 मध्ये झालेल्या पुलवामा हल्ल्यानंतर काश्मीर खोऱ्यातील हा सर्वात भीषण हल्ला आहे.

हे ही वाचा>> Terror Attack: पतीच्या मृतदेहाशेजारी पत्नी अन्... 'हा' फोटो तुमचं काळीज टाकेल पिळवटून!

पत्नी आणि मुलांसमोर गोळीबार

दरम्यान, मंगळवारी दुपारी काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात हैदराबादच्या इंटेलिजेंस ब्युरो (आयबी) चे सेक्शन ऑफिसर मनीष रंजन हे त्यांच्या पत्नी आणि मुलांसमोर दहशतवादी हल्ल्यात ठार झाले. 

'आम्ही भेळपुरी खात होतो...तेव्हाच त्यांनी माझ्या नवऱ्याला मारली गोळी'

या घटनेबाबत एका प्रत्यक्षदर्शी महिलेने सांगितलं की, 'आम्ही फक्त भेळपुरी खात होतो.. आणि मग त्याने माझ्या नवऱ्याला गोळी मारली. दहशतवाद्याने माझ्या पतीला विचारलं की तुम्ही मुस्लिम आहात का? ते नाही म्हणताच त्यांनी त्याच्यावर गोळी झाडली.'

हे ही वाचा>> Kashmir Terror Attack: कुटुंबासह काश्मीर फिरायला गेले अन्... दहशतवादी हल्ल्यात डोंबिवलीतील तिघांचा मृत्यू

महाराष्ट्रातील 6 जणांचा मृत्यू

जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात एकूण 26 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. ज्यामध्ये सहा महाराष्ट्रातील पर्यटकांचा समावेश असून तीन जण डोंबिवलीतील आहे. संजय लेले, अतुल मोने आणि हेमंत जोशी अशी या तीन पर्यटकांची नावं आहेत. हे तिघेही एकमेकांचे नातेवाईक आहेत.

महाराष्ट्रातील मृतांची नावं

  1. अतुल मोने, डोंबिवली
  2. संजय लेले, डोंबिवली
  3. हेमंत जोशी, डोंबिवली 
  4. दिलीप डिसले, पनवेल
  5. कौस्तुभ गनबोट, पुणे
  6. संतोष जगदाळे, पुणे   

हे वाचलं का?

    follow whatsapp