पहलगाम दहशतवादी हल्ल्याची 'ही' आहे Inside स्टोरी, तुम्हीही जाल हादरून!

मुंबई तक

Pahalgam Terrorist Attack Inside Story : पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 28 पर्यटकांचा मृत्यू झाला. पर्यटकांना निशाणा बनवणारा आतापर्यंतचा हा सर्वात मोठा हल्ला असल्याचं बोललं जात आहे.

ADVERTISEMENT

Pahalgam Terrorist Attack Inside Story
Pahalgam Terrorist Attack Inside Story
social share
google news

बातम्या हायलाइट

point

पाकमध्ये मसूद अजहर सक्रिय

point

POK मध्ये टेरर कॅबिनेटची मीटिंग

point

TRF दहशतवाद्यांनी केला हल्ला 

Pahalgam Terrorist Attack Inside Story : पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 28 पर्यटकांचा मृत्यू झाला. पर्यटकांना निशाणा बनवणारा आतापर्यंतचा हा सर्वात मोठा हल्ला असल्याचं बोललं जात आहे. या हल्ल्याच्या मागे पाकिस्तानचा हात असल्याचं समजते. चार दहशतवाद्यांपैकी दोन दहशतवादी पाकिस्तानी असल्याची माहिती समोर आलीय. याशिवाय दहशतवादी संघटना लष्कर-ए-तयबाचा चेहरा समजल्या जाणाऱ्या 'द रेसिस्टेंस फ्रंट' म्हणजेच टीआरएफने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. 

दहशतवाद्यांनी पूर्ण प्लॅनिंक पर्यटकांना निशाणा बनवला. पंतप्रधान नरेंद्र मोदी सौदी अरबच्या दौऱ्यावर असताना दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये मोठा हल्ला केला. गेल्या काही दिवसांत पाकिस्तानमध्ये मजूद अजहरचं सक्रीय होणं, वेगानं वाढणारं टेरर नेटवर्क आणि जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवादी कारवाया पाहता पहलगाम हल्ल्याची क्रोनोलॉजी नेमकी काय आहे? जाणून घ्या.

पाकमध्ये मसूद अजहर सक्रिय

जैश संघटनेचा म्होरक्या मसूज अजहर पाकिस्तानमध्ये पुन्हा सक्रिय झाला आहे. तो एका लग्नसोहळ्यात सामील झाला होता, अशीही माहिती समोर आली होती. मसूद मृत किंवा आजारी झाल्याचं माध्यमांद्वारे समोर आलं होतं. परंतु, जैश-ए-मोहम्मदचा (जेईएम) म्होरक्या मसूद अजहर पाकिस्तानमध्ये बिंधास्त फिरत आहे. ही माहिती इंडिया टुडेच्या ओएसआयएनटी टीमने जैश संघटनेशी जोडलेल्या मल्टीमीडिया क्लीपच्या फॉरेन्सिक विश्लेषणातून समोर आली होती.

हे ही वाचा >> पहलगाममध्ये 28 निष्पापांचा घेतला जीव, 'हा' नराधम आहे मास्टरमाईंड... त्याच्यावर पाक लष्कर उधळतं फुलं!

POK मध्ये टेरर कॅबिनेटची मीटिंग

इंडिया टुडेने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानमध्ये एक नवीन टेरर सिंडिकेट अॅक्टिव्ह होणार असल्याचं सूत्रांकडून समजलं होतं. मागच्या वर्षीच्या सुरुवातीला पाकिस्तानच्या बहावलपूरमध्ये अनेक कुख्यात दहशतवाद्यांचे गट एकत्र आले होते. यामध्ये जैशचा प्रमुख मसूद अजहर, अल बद्र कमांडर बख्त जमीन, हिजबूल मुजाहिदीन प्रमुख सैयद सलाहुद्दीन आणि इतर दहशतवाद्यांच्या समावेश होता. यापैकी अनेक दहशतवादी POK मध्ये अॅक्टिव्ह आहेत.

हे वाचलं का?

    follow whatsapp