विदर्भ-मराठवाड्याच्या सीमेवर 3 कोटी 45 लाख रुपयांचा गांजा जप्त; चौघे पोलिसांच्या ताब्यात

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

– ज़का खान, वाशिम प्रतिनिधी

ADVERTISEMENT

देशात आणि राज्यात सध्या अंमली पदार्थांची जोरात चर्चा सुरू आहे. अंमली पदार्थ विभागाकडून अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांविरोधात कारवाई केली जात असून, महाराष्ट्रातील वाशिम पोलिसांनी केलेली कारवाई बघून एनसीबीच्या अधिकाऱ्यांनाही आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. वाशिम पोलिसांनी एक-दोन किलो नव्हेत तर एक टनापेक्षा अधिक गांजा जप्त केला आहे.

वाशिम जिल्ह्यातील रिसोड पोलिसांनी गांजाचा मोठा साठा जप्त केला आहे. रिसोड शहर पोलिसांना आयशर ट्रकमधून गांजा घेऊन जात असल्याची माहिती मिळाली. आयशरमधून हिंगोलीकडे गांजा नेण्यात येत होता. पोलिसांनी मिळालेल्या माहितीनुसार आयशर ट्रक ज्या मार्गाने हिंगोलीकडे जाणार होता. त्या मार्गावर सापळा लावला.

हे वाचलं का?

सोमवारी दुपारी जवळपास 1 वाजेच्या सुमारास समोरून एक आयशर ट्रक आल्यानंतर पोलिसांनी ट्रक थांबवला. ट्रक थांबवल्यानंतर पोलिसांची झाडाझडती घेतली. यावेळी त्या गांजा भरलेली 56 पोती पोलिसांना आढळून आली.

ADVERTISEMENT

आयशरमधून जवळपास 11 क्विंटल 50 किलो इतका गांजा जप्त करण्यात आला असून, त्याची बाजारातील किंमत जवळपास 3 कोटी 45 लाख रुपये इतकी आहे. पोलिसांनी ट्रकमधील गांजा आणि ट्रक दोन्ही जप्त केले असून, आयशरमधील चार जणांना ताब्यात घेतलं. चौघेही बुलढाणा जिल्ह्यातील असून, त्याची चौकशी केली जात आहे.

ADVERTISEMENT

गोटीराम गुरद्याल साबळे (वय 52, रा. कुऱ्हा, ता. मोताळा, जि. बुलढाणा), सिद्धार्थ भिकाजी गवांदे (रा. निमगाव, ता. नांदुरा, जि. बुलढाणा), प्रविण सुपडा चव्हाण (रा. हनवतखेड, ता. मोताळा, जि. बुलढाणा), संदीप सुपडा चव्हाण (रा. हनवतखेडा, ता. मोताळा, जि. बुलढाणा) अशी आरोपींची नावं आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT