डोंबिवली – पोलीस चौकीसमोरील मेडीकल दुकान चोरट्यांनी फोडलं
डोंबिवलीत चोरट्यांनी आता थेट पोलिसांनाच आव्हान दिलं आहे. मानपाडा मुख्य रस्त्यावरील शिवाजी नगर पोलीस चौकीसमोरील मेडीकल दुकानाचं शटर वाकवून चोरट्यांनी रोखरक्कम आणि दुकानातला माल लंपास केला आहे. पोलीस चौकीच्या समोरच दुकानात चोरी झाल्यामुळे व्यापारी वर्गात चिंतेचं वातावरण आहे. डोंबिवली शहरातील दुधनाथ यादव यांच्या शिवम मेडीकल या दुकानाचं शटर वाकवून चोरट्यांनी ५ वाजता आत प्रवेश केला. […]
ADVERTISEMENT
डोंबिवलीत चोरट्यांनी आता थेट पोलिसांनाच आव्हान दिलं आहे. मानपाडा मुख्य रस्त्यावरील शिवाजी नगर पोलीस चौकीसमोरील मेडीकल दुकानाचं शटर वाकवून चोरट्यांनी रोखरक्कम आणि दुकानातला माल लंपास केला आहे. पोलीस चौकीच्या समोरच दुकानात चोरी झाल्यामुळे व्यापारी वर्गात चिंतेचं वातावरण आहे.
ADVERTISEMENT
डोंबिवली शहरातील दुधनाथ यादव यांच्या शिवम मेडीकल या दुकानाचं शटर वाकवून चोरट्यांनी ५ वाजता आत प्रवेश केला. दुकानाच्या बाजूला ऑप्टीलाईफ हॉस्पिटल हे २४ तास सुरु असतं. या भागात रुग्णांची आणि त्यांच्या नातेवाईकांची नेहमी वर्दळ सुरु असते. त्यामुळे अशा भागात चोरी करत चोरट्यांनी थेट पोलीस यंत्रणेलाच आव्हान दिलं आहे.
दुकानातील १५ हजार रुपये आणि कॉस्मेटिकच्या काही साहित्यावर हात साफ करत चोरटे पसार झाले आहेत. मात्र सीसीटीव्हीमध्ये त्यांचा चेहरा साफ दिसत असून पोलीस त्या आधारावर चोरट्यांचा तपास करत आहेत.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT